मुंज, लग्न वगैरे कार्यांत निर्विघ्नता येण्यासाठीं आणि संकटाचा प्रसंग टळण्यासाठीं किंवा सपिण्डाच्या मरणादिकांची निवृत्ति व्हावी म्हणून विनायकशान्ति करावी. या शान्तीला शुक्लपक्ष, चतुर्थी, गुरुवार हा काल, आणि पुष्य, श्रवण, उत्तरा, रोहिणी हस्त अश्विनी व मृग हीं नक्षत्रें शुभ होत. मुंज वगैरे कर्मांच्या मुख्य (मागें सांगितलेल्या) कालाच्या अनुरोधानें जसा मिळेल तसा शान्तीला काळ घ्यावा.
’अमुककर्मणो निर्विघ्नफलसिद्धयर्थं’ किंवा ’उपसर्गनिवृत्त्यर्थं’ अथवा ’अमुकसपिण्डमरणनिमित्तकाशुचित्वप्रातिकूल्यनिरासार्थं’
याप्रमाणें जसा प्रंसग असेल त्याप्रमाणे संकल्प करावा. बाकीचा प्रयोग इतर ग्रंथांत पहावा.