(म्हणजे गुरुचा आशीर्वाद) प्रत्यहिवादनांत शेवटचा स्वर प्लुत (दीर्घ) असावा तो असा :- आयुष्मान् भव, सौम्य देवदत्ता ३ (हे देवदत्ता, आयुष्यवान् हो.) नावाच्या शेवटीं जर एकार व ओकार हे असतील तर हरा ३ इ, शम्भा ३ उ (हे हर, हे शम्भो, ). सन्धीच्या अक्षराच्या वियोगानें होणारा जो पूर्वभागाचा आकार तो प्लुत होय. अनुप्रवचनी होण्यासाठीं भिक्षा मागताना
’भिक्षा भवान्ददातु’ किंवा ’भिक्षां भवती ददातु’
असा भिक्षावाक्याचा प्रयोग ’भवत्’ शब्द ज्यात असेल तो करावा. इतर भिक्षा मागण्यांत ’भवत्’ शब्द आरंभीं किंवा शेवटीं योजावा.