अश्विनी, आर्द्रा, पुनर्वसु, उत्तराफाल्गुनी, हस्त, ज्येष्ठा, मूळ, शततारका व पूर्वाभाद्रपदा या नक्षत्री जन्म असता प्रथम नाडी होय. भरणी, मृग, पुष्य, पूर्वाफल्गुनी, चित्रा, अनुराधा, पूर्वाषाढा, धनिष्ठा व उत्तराभाद्रपदा या नक्षत्री मध्यनाडी होय. कृत्तिका,रोहिणी, आश्लेषा, मघा, स्वाती, विशाखा, उत्तराषाढा, श्रवण, रेवती या नक्षत्री जन्म असता अंत्य नाडी होय, वधूवरांची एक नाडी असेल तर मृत्यु होतो. भिन्न नाडी असेल तर आठ गुण. एक नाडी सर्वथा वर्ज्य करावी. शूद्र वगैरेंना पार्श्वनाडी आणि एक नाडी संकट असेल तर शुभ होय. वर्णकूट, वश्यकूट, नक्षत्रकूट व योनिकूट यांचे गुण अल्प आहेत आणि त्यांचे योगाने विवाहाला बाध येत नाही म्हणून येथे सांगितली नाहीत. सर्व मिळून वीस गुण होत असतील तर मध्यम होय. विसांपेक्षा जास्त होतील तर अतिशुभ होय. विसांपेक्षा कमी गुण असतील तर अशुभ होय. याप्रमाणे नक्षत्रादि घटिताचा विचार झाला.