यानंतर पुंडरीकाला वरप्रदान देणार्या श्रीभगवंताचे चरण, श्रीगुरु आणि मातापिता यांना वंदन करून विवाहनिर्णय सांगण्याला मी उद्युक्त होतो.
द्विजाने आपल्या जातीची, सुलक्षणी, अवयवांनी अव्यंग, सौम्यनांवाची, मृदु अवयवांची, सुंदर अशी स्त्री वरावी. पुढे होणार्या शुभाशुभाचे ज्ञान होणार्या लक्षणांचा विचार "मृत्तिकेचे आठ पिंड करावे" इत्यादि आश्वलायन सूत्रांमध्ये सांगितला आहे. ज्योतिःशास्त्रामध्ये सांगितलेला राशी, नक्षत्रे इत्यादिकांच्या घटिताचा विचारही शुभाशुभाचे ज्ञान होण्याला कारण आहे. तो येथे संक्षेपाने सांगतो. त्यामध्ये मेषादि बारा राशींचे स्वामी अनुक्रमाने मंगळ, शुक्र, बुध, चंद्र, सूर्य, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनि आणि गुरु हे आहेत