नंतर मणि, कुंडले, दोन, वस्त्रे, छत्री, जोडा, दंड, माळ, अभ्यंग, उटी, काजळ आणि पागोटे हे जिन्नस आपल्याकरिता एकेक व आचार्याकरिता एकेक मिळवावे. दोघांना न मिळतील तर आचार्याकरितांच मिळवावे. नंतर देशकालादिकांचा उच्चार करून
"मम ब्रह्मचर्यनियमलोपजनित संभावितदोषपरिहारेन समावर्तनाधिकारसंपादनद्वारा
श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थमाज्यहोमपूर्वकं कृछत्रयं महानाम्न्यादि व्रतचतुष्टयलोपजनितप्रत्यवायपरिहारार्थं
प्रतिसंस्कारमेकैकं कृच्छ्रं च गायरयाज्यहोमपूर्वकं तंत्रेणाहमाचारिष्ये"
याप्रमाणे संकल्प करून अग्निस्थापन इत्यादि केल्यावर
"चक्षुषी आज्येनात्र प्रधानं अग्निं वायुं सूर्य प्रजापति च चतुसृभिराज्याहुतिभिः
अग्निं प्रुथिव महान्तमेकयाज्याहुत्या वायुमन्तरिक्षं महातमेकया०
आदित्यं दिवं महांतमेकया० चन्द्रमसं नक्षत्राणि दिशो महांतमेकया०
अग्निं द्विः विभावसुं शतक्रतुं अग्निं अग्निं अग्निं वायुं सूर्य प्रजापतिं चे
त्यष्टावेकैकयाज्याहुत्या शेषेणेत्यादि"
याप्रमाणे अन्वाधान करावे. आज्यभागापर्यंत कर्म झाल्यानंतर समस्तव्याह्रतिमंत्रांनी होम करून पुनः होम करावा. त्याचे मंत्र
"भूरग्नये च पृथिव्यै च महते च स्वाहा ॥
(अग्नये पृथिव्यै महते इदं न मम इत्यादि अन्वाधानाप्रमाणे त्याग करावा.)
भुवो वायवे चान्तरिक्षाय च महते च स्वाहा ।
सुवरादित्याय च दिवे च महते च स्वाहा ।
भुर्भुवः सुवश्चन्द्रमसे च नक्षत्रेभ्यश्चदिग्भ्यश्च महते० ।
चन्द्रमसे नक्षत्रेभ्यो दिग्भ्यो महत इ० ।
पाहि नो अग्न एनसे स्वाहा ।
पाहिनो विश्ववेदसे स्वाहा ।
यज्ञं पाहि विभावसो स्वाहा ।
सर्वं पाहि शतक्रतो स्वाहा ।
पुनरूर्जनिवर्तस्व पुनरग्न इहायुषा ।
पुनर्नः पाह्यंहसः स्वाहा ।
सह रय्या निवर्तस्वाग्नेपिन्वस्वधारया ।
विश्वप्सिनया विश्वतस्परिस्वाहा ।"
यानंतर पुन्हा व्यस्त समस्त व्याह्रतिमंत्रांनी चार आहुति द्याव्या. नंतर चार व्रतांकरिता गायत्रीमंत्राने आज्यहोम करावा. तीन कृच्छ्र गाईची किंमत दान करून होमशेष समाप्त करावा. महानाम्नी इत्यादि व्रतांचा लोप झाला असेल तर प्रत्येक व्रताबद्दल एकशे आठ, अठ्ठावीस अथवा आठ घृताच्या आहुतीचे गायत्रीमंत्राने हवन करून कृच्छ्र प्रायश्चित्त करावे. याप्रमाणे प्रायश्चित्ताचा प्रयोग सांगितला.