मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
अध्ययन करण्याचे धर्म

धर्मसिंधु - अध्ययन करण्याचे धर्म

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.

 


वेदाध्ययनाला आरंभ करताना व समाप्ति झाल्यावर गुरूचे चरण धरावे. प्रारंभी प्रणवाचा उच्चार करावा. वेदाध्ययन झाल्यावर अंती प्रणवाचा उच्चार करून भूमीला स्पर्श करून समाप्ति करावी. रात्रीच्या पहिल्या व शेवटच्या प्रहरी वेदाध्ययन करावे. 'दुसरा व तिसरा प्रहर निद्रा घेणारा ब्रह्मत्वाला जातो.' गुरु, पिता व माता यांचा सन्मान ठेवावा, त्यांच्याशी कधी द्रोह करू नये. 'गुरूपाशी अध्ययन केलेले जे शिष्य वाचा, मन व कर्म यांनी गुरूला मान देत नाहीत ते गुरूने पालन करण्याला जसे योग्य नाहीत तसेच वेदही त्यांचे पालन करीत नाहीत.' याप्रमाणे अध्ययन करण्याचे धर्म सांगितले.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP