मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
श्राद्ध

धर्मसिंधु - श्राद्ध

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


माता व पिता जिवंत असलेल्या गृह्याग्नियुक्त पुत्रानें पित्याचे पिता इत्यादिकांस पिंडदान करावें, असा तिसरा पक्ष स्वीकारुन पिंड पित्र्यज्ञ अष्टका अन्वष्टका इत्यादि आरंभिलेल्या श्राद्धांपैकीं अन्वष्टका श्राद्धांत पित्याची पितृत्रयी, मातृत्रयी व मातामहादि त्रयी यांस उद्देशून पिंडादिक द्यावें. नंतर माता मृत झाली असतां त्यानें अन्वष्टका श्राद्धांमध्यें स्वकीय मातृत्रयी व पित्याची पितृत्रयी यांस उद्देशून पिंडादिक द्यावें. जेव्हां जीवत्पितृक असल्यानें पिंड पित्र्यज्ञ अन्वष्टका इत्यादिकांचा आरंभ केला नसेल व पिता संन्यासी इत्यादि असेल तेव्हां दर्शादि श्राद्ध पित्याचे जे पित्रादिक त्यांच्या उद्देशानें व्यतिषंगाहून निराळा प्रयोग जो सांकल्पिक विधि त्यावरुन होतेंच.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP