याप्रमाणे सांगितलेले वचन असल्याने आच्छादन दिल्यावर पृथक् यज्ञोपवीत देऊन शक्ति असल्यास छत्रालंकारादिक द्यावे. तत्काली स्पर्श करण्यास जे अयोग्य असतील त्यांचा संकल्प करून 'पूजनं पूर्णमस्तु' 'संकल्पसिद्धिरस्तु' असे म्हणून प्रतिवचन दिल्यावर
'मंत्रहीनं क्रियाहीनं संपद्धीनं द्विजोत्तमाः । श्राद्धं संपूर्णतायातु प्रसादाद्भवतामम ॥ यस्यस्मृत्या० देवताभ्यः०'
असा जप करावा. याप्रमाणे आसनादिक सर्व पूजाकांड देवासंबंधी समाप्त करून पितृसंब्म्धी आसनादिक पूजाकांडास आरंभ करावा. कांडानुसमयक्रमच माधवास संमत आहे.