आचमन केल्यावर पूर्वी धारण केलेले दर्भ टाकून देऊन दुसरे दर्भ हस्तांत धारण करावेत. तसेच, श्राद्धाचे आरंभी धारण केलेले दर्भ पाद्याच्या अंती टाकावेत, त्यानंतर देवांची पूजा केल्यावर, पितरांची पूजा केल्यावर, पिंडाचे शेष अवघ्राण केल्यावर, विकिर दिल्यावर व श्राद्धाच्या अंती पुर्वी धारण केलेले दर्भ टाकावेत. श्राद्धसागरादि प्रयोगग्रंथात पितृपूजेनंतर दर्भ टाकावे असे आढळत नाही. यावरून क्वचित आचमनीही दर्भाचा त्याग करावा, असे वाटत नाही.