मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
श्राद्ध शब्दाचा अर्थ.

धर्मसिंधु - श्राद्ध शब्दाचा अर्थ.

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


मृत पिता इत्यादिकांस उद्देशून विहितकालीं व देशीं पक्वान्न, आमान्न व हिरण्य यांतून कोणत्याही एका द्रव्याचें विधियुक्त दान करनें तें श्राद्ध होय. त्यांत अग्नौकरण, पिंडदान व ब्राह्मणभोजन हें प्रधान आहे. कारण होम, पिंडदान व ब्राह्मण भोजन या तीन कर्मांनीं मिळवून झालेल्या विशिष्ट कर्मास श्राद्ध असें म्हटलें आहे. क्वचित् स्थळीं वचनावरुन किंवा सामर्थ्य नसल्यामुळें पिंडदानादिक न केलें तरी ब्राह्मणभोजनादि मात्र करणें तें श्राद्ध होय. असा श्राद्ध पदाचा अर्थ सिद्ध होतो. याप्रमाणें चौथ्या पदाचा अर्थ सांगितला. तसेंच दुसरेंही वचन आहे तें असें :--- "पिंडदान हेंच यजुःशाखीयांचें श्राद्ध होय, द्विजांचें पूजन हेंच ऋक्‌शाखीयांचें श्राद्ध होय, व पिंडदान व ब्राह्मणपूजन हें सामवेदीयांचें श्राद्ध होय." पितर नाहींत असें अश्रद्धेनें मानून जो श्राद्ध करीत नाहीं त्याचे पितर रुधिरपान करितात.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP