अगस्त्य, (हदगा), भृंगराज (माका) तुळसी, कमल, चंपक, तिळपुष्प व दूर्वा ही वित्रप्रिय होत. पिंडाच्या पूजेला तुलसीही विहित व प्रतिषिद्ध आहे, कोवळे पल्लव, यव, दूर्वांकुर, जलोत्पन्न पुष्पे, मोगरी, आंब्याचा मोहोर, मधुमाधवीचे पुष्प व तगरपुष्पे यांनी पितरांची पूजा सदोदीत करावी. जाईच्या पुष्पांनी ब्राह्मणाची पूजा करावी, पिंडाची पूजा करू नये.