मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
अपराण्हदिविशेष

धर्मसिंधु - अपराण्हदिविशेष

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


तीन मुहूर्ताचा एक भाग याप्रमाणे दिवसाचे पाच भाग करावे. त्यात पहिला भाग प्रातः संज्ञक, दुसरा भाग संग व तिसरा भाग मध्याह्न, चौथा भाग अपराह्ण व पाचवा भाग सायाह्न. दिवसाचा पंधरावा भाग तो मुहूर्त यात सातवा मुहूर्त गंधर्वसंज्ञक, आठवा कुतुपसंज्ञक; व नवा मुहूर्त होहिण संज्ञक. दर्शादिश्राद्धाचा निर्णय बहुधा पूर्वीच्या दोन परिच्छेदात सांगितला आहे. त्याहून विशेष निर्णय सांगतो. साग्निक असे कात्यायन इत्यादिकांनी अन्वाधान पिंड, पितृयज्ञ व दर्शश्राद्ध ही तीनही एके दिवशी करावी, असा नियम सांगितला आहे. म्हणून दिवसाचे तीन भाग करून तिसरा भाग जो अपराह्ण काल तदव्यापिनी अमावास्येत दर्शश्राद्ध करावा.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP