अहा या हरिनें उध्दवारे काय केलें ॥ध्रु०॥
आतां काय कसें आम्ही गोकुळीं वसावें ।
असें त्याला एक वेळ जाउनी पुसावें ।
दासीपाशीं गुंतला आम्ही न रुसावें ।
आतां काय राहिलें सारें यश गेलें ॥अहा॥
आम्हा नाहीं वाटला हा घातुकी परावा ।
असा याणें बायकांचा घात न करावा ।
याच्या मनीं आज कांहीं स्नेह न उरावा ।
कसें दैव गोपिकांचें उभे ठाकलें ॥अहा॥
बटकीने आजी केला कीर्तीचा शिराडा ।
रंडकीने आमचा या हाडांचा चुराडा ।
अक्रुराने याचसाठी कविराय नेला ॥अहा॥