मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
मंदा किती करशिल हा घर...

रामजोशी - मंदा किती करशिल हा घर...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


मंदा किती करशिल हा घरधंदा । विसरुन सुखकंदा ॥ध्रु०॥

सारा संसृतीचा हाच पसारा । सुत कैची दारा ।

पारावारांतील जैशा गारा । घेऊनि विचारा ।

नारायणा रे हा विश्वचि तारा । भज जगदाधारा ।

कुंदा शंकुनि रसन मिलिंदा । करशिल विजय कुंदा ॥१॥

रांडा मोहुनि तुज करतील बंडा । रचुनिया कुभांडा ।

चांडाळा बुडविसील सुकृतकरंडा । हे अपयश पिंडा ।

गुंडा म्हणविशी यमाच्या दंडा । कां घेसी वितंडा ।

सुंदा कां नेणसी ह्या उपसुंदा । किती विजयी धुंदा ॥२॥

बापा कां धरसिल या भव तापा । किती जोडसी पापा ।

ज्या पाहुनि धरसी मन्मथ कोपा । मग करिसी विलापा ।

चापापरि होऊनि नत अनुतापा । घरी शांति कलापा ।

छंदा या कृतिने कविता नंदा । कविराया मुकुंदा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP