कुंदरदन तनु शाम सुलोचन कोण ताई मज हा नित्य हाटकी ॥ध्रु०॥
मोर मुगुट शिरि करी धरी वेणु । पीत वसन वनीं चारित धेनु ।
कोण कोठिल गाई मी तर नेणू । धीट खुणाउनि वाजवी चुटकी ।
कुंदरदन तनु शाम सुलोचन ॥१॥
काल मला चुचकारुन ओढी । ठावि नसे मजही कांहीं गोडी ।
आरडतां कुच रगडून सोडी । आण तुझी बाई मी नव्हे लटकी ।
कुंदरदन तनु शाम सुलोचन कोण बाई ॥२॥
याची माझी कधिं ओळख नव्हती । काय पिडा ही मज भोंवता ।
हा परवर आग लागो माझी नवती । काय तर्हा कविराय उध्दवली ।
कुंदरदन तनु शाम सुलोचना कोण बाई ॥३॥