मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
नका हरि हा दंगा करुं ...

रामजोशी - नका हरि हा दंगा करुं ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


नका हरि हा दंगा करुं या कर्मे नाही बरें, रयत ही धन्याचें लेकरुं ॥ध्रु०॥

आम्ही पुर गवळ्याच्या सती ।

छी: म्हणतो तुझी खोड जाईना अजून ही श्रीपती । सोसावे दुर्गुण किती ।

दैवाने दिली सुजन भोगितो रितीने संपत्ति । ही सोडून दे दुर्मती ।

तूं म्हणशील मी धनी नगराचा, वाईट आमुचे पती ।

कर जोडितो तुझी हे वस्ती पुरे पुरे बापा ।

सारी रयत सुखाची कोण तुझ्या सोशि अशा तापा ।

या छंदामध्यें नको शिरुं । सांगतसो इतक्यावर तुजला

मारुं किंवा आम्ही मरुं ॥

तुज न्याय नसे चोरटा । जारपणादिक वाईट कर्मे तुजपाशी ॥१॥

सोरटा काय चांगट तरि गोरटा ।

पुरुषाएवढा पुरुष असुनि तूं खेळसी काय पोरटा ।

नव्हे तान्हा शिशु पारटा ।

नित्य रमविशी स्त्रिया दिससी तूं तरी एवढासा कारटा ॥

पोर म्हणों तरी सार्‍या गोकुळ नगरांत भोगिसी रमा ।

थोर म्हणो तरी नित्य यशोमतीचा घेसी मुखामध्यें आमा ।

किती अभिनव सांगत फ़िरुं । या नगरीमध्यें अशा रितीने

राहिना पांखरुं ॥२॥

तुझी संगत ही भोवली ।

या सार्‍या रडतात गरतीच्या बाटविल्या त्त्वा मुली ।

काय वाढविसील हा कली ।

काय वदूं ही किर्ती तुझी बा जगतामध्ये फ़ांकली । कांहीं रीत नच राखली

पाप उघड करुं नये भ्रमाची मूठ बरी झांकली ॥

उदम्यावरता कोणि हुकमाचा लोक करितसे जोरा ।

आम्ही तुझ्या जरी भरीं भरुं । तूं मोठा कविराय म्हणविशील ।

आज उद्या तुज धरुं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 16, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP