जा गडे त्याला तूं घाल माझी आण ॥ध्रु०॥
जाउनि माग बाई सख्या तुझि दासी ।
तुझ्यामुळें चैन नाहीं उगा रुसलाशी ।
आज न जाशी तरि देईल ती प्राण ।
जा गडे त्याला तूं घाल माझी आण ॥१॥
काय मी झालें त्याची अशी अपराधी ।
करावी तुवा माझ्या ठायीं कधिं न अपराधी ।
नावाची मी साळु नव्हे ठकि चिमी राधी ।
भोंदाव्याच्या रांडा घेऊ नको रान, जा गडे त्याला० ॥२॥
तुटेना की चंडाळ हें डोळियांचे पाणी ।
अबोल्यातें काय घेरि जरा बोल वाणी ।
दीनावाणी जालें मोठ्या सुखाची मी खाण ।
विरहाचा मारुं नको कविराया बाण ।
जा गडे त्याला तूं घाल० ॥३॥