मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
झाला पहा हो मानव कीं ...

रामजोशी - झाला पहा हो मानव कीं ...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


झाला पहा हो मानव कीं सोडा धना तुम्ही कामिनी

भक्ति ही लागो हरिपदीं ॥ध्रु०॥

भाग्याच्या पडता भरीं आधि अंतरी कासयाला धरशी ।

विषयाची न सुटे आशा वाटे यश्या घालवाया करशी ।

तारुण्य नटशी किती दिवसांची रती मानवा कां मरशी ।

अरे कांही सुजाण व्हा । झाला पहा ० ॥१॥

दैवाने मानव जणूं त्यातही तनु साधनाला फ़ुटकी ।

मोहाने धन कामिनी आणिता मनीं भावना ही लटकी ।

वंदाया पुरुषोत्तमा मानसिं रमा जाणुनि घ्या कुटकी ।

मदनाचे संगती ॥ झाला पहा ॥२॥

या रामा अति बापड्या मानिता वड्या साखरेच्या स्वमनीं ।

होता भवसंगमी वाउगें श्रमी कल्पनेच्या भ्रमणी ।

संसारी कविराय हा वाटतो पहा वासनेच्या दमनी ।

भवपाशी गुंतला ॥ झाला पहा हो ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP