मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|रामजोशी|
केशवकरणी अदभुत लीला ना...

रामजोशी - केशवकरणी अदभुत लीला ना...

रामजोशांनी लिहिलेली कविता मोठी मधुर, अर्थसंपन्न व प्रासअनुप्रासांची पैंजणे घालून ठुमकणारी अशी आहे. शृंगारपर, उपदेशपर व देवदैवतविषयक अशा अनेक प्रकारच्या लावण्या रामजोशांनी लिहिल्या.


केशवकरणी अदभुत लीला नारायण तो कसा ।

तयाचा सकळ जनावर ठसा ।

माधवमहिमा अगाध गोविंदाच्या रसा ।

पी जा जीव होइल थंडसा ।

विष्णू म्हणतां विकल्प जाती मधुसूदनाने कसा ।

काढिला मंथनसमयी जसा ।

वेश धरुनि कापट्य मोहिनी भाग करुनि महिनिमा ।

गायिल्या उध्दरतील आधमा ॥१॥

त्रिविक्रमाने त्रिताप हरिले भक्तदोष सर्वहि ।

वामने दान घेतली मही ।

श्रीधर सत्ता असत्य हरती दुष्टांचे सर्वही ।

वंदिती ह्रषीकेशाचारही ।

पद्मनाभें धरिले तेथुनि जाले देव ब्रह्मही ।

की दामोदरें चोरिलें दही ।

संकर्षण म्हणतां षड्रिपु नाशातें पावती ।

शरण जा वासुदेवाप्रती ॥२॥

प्रद्युम्नाचा करितां धांवा गजेंद्र मोक्षाप्रती ।

अनिरुध्दाने वर्णिली श्रुती ।

क्षीरसागरीं पुरुषोत्तम हा दाता लक्ष्मीपती ।

स्मरणे अधोक्षजे आकृति ।

गाती मुनिजन नारद तुंबर वसिष्ठादि गौतमा ।

गाइल्या उध्दरती आधमा ॥३॥

प्रल्हादासाठी नरहरी स्तंभी प्रकटला ।

अच्युते कालयवन मर्दिला ।

जनार्दनाची अघटित लीला कीर्तन ऐकूं चला ।

उपेंद्रा शरण म्हणविती भला ।

हरिहर म्हणतां त्रिवारवाचें सर्व दोष हरियला ।

गोकुळीं कृष्णनाथ खेळला ।

रामलक्ष्मण यांची नांवे निस्तारती हे भ्रमा ।

गाइल्या उध्दरती आधमा ॥४॥

अनंत भगवंताची नांवे त्यांतुनी हे उत्तमा ।

गाईल्या उध्दरती आधमा ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP