काय म्हणावे मुलगा दिसतो फार कठिण हा कर्म करी ।
मै तो जमुना चली नहानेको बीचमें आय मोरी बाह पकरी ॥ध्रु०॥
काय करुं मेला कपटी ग बाई । कुंज गहनमों धूम मचाई ।
जावे उठून कुठें याचे पायीं ।
हाय ठरा जशामतको कान्हा के ते बार बार मैं तो पावमरी ॥१॥
काय वदूं सारी अकीर्ति केली । संग सहेलिया मैं न अकेली ।
कोण अशा कर्मास भुकेली ।
सास बुरी परधर नाग दिया ऐसी गुजपर आना परी ॥२॥
रांड कुणी कुळबुडवी खोटी । मै न सोऽहं ब्रह्म भान की बेटी ।
शील बुडवू नये हे भय पोटीं ।
काई कहूं कविराय की लोण बात मीठी बहु भूल परी ॥३॥