धरि हरिचरण तरि तरी ।
होईल तुज वरी राया मानवा ॥ध्रु०॥
याविण सारा व्यर्थ पसारा ।
कसें तरी करी भवाचे भय हरी ।
फ़जिती संसारीं कशाला मानवा ॥१॥
भजशिल काळा अहा रे कपाळा ।
पोटासाठी चोरी करिशी काय थोरी ।
पोषिशी रांडा पोरी । कोणाची गाढवा ॥२॥
लटकी हे माया पुस कविराया ।
दिवसही चारी मरशि काय भारी ।
करिशी नित्य घरी दिवाळी पाडवा ॥३॥