कसें करुं एकांतींचि गांठ पडेना ॥ध्रु०॥
मनामध्यें हौस माझ्या सारी पुरवीते ।
शृंगारांचा रंग कांहीं नवा दाखवितें ।
अनंगाच्या संगे बाई सुखा मुरवीते ।
योजिला म्यां आनंदाचा घाट घडेना ।
कसे करुं एकांतीचिं गांठ० ॥१॥
असा कांहीं आहे मनांतील काम ।
खरें म्हणावें किं जेव्हां घडवील राम ।
उगा हातां येतो कैसा प्रभू घनश्याम ।
याजपुढें कोणाचीही सीग वडेना ।
कसे करुं एकांती० ॥२॥
त्याची म्हणवीतें माझा धनी अभिमानी ।
लोळतें मी एथें जाणें सारी राजधानी ।
कधिं तरि बाई त्याच्या लागेन मी कानीं ।
कसोटीला कविराय कोणी जडेना ॥कसें० ॥३॥