आतां काय आम्ही हरिवांचून राहूं । प्राणसख्याला कधी पाहु ॥ध्रु०॥
आतां काय मुरलिचा ध्वनि साहूं । कुंजवनींची गेली हाहु ॥१॥
आतां काय यमुनेमध्यें नाहूं । कृष्णपदीचें सुख लाहूं ॥२॥
प्राण चालला गे साजणी । आतां मेलो सोसेना जाचणी ॥३॥
झाली बहुत जिवाला जाचणी । कविराया भेटीची मागणी ॥४॥