मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
गुरु-शिष्य

विविध विषय - गुरु-शिष्य

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा रचून इतिहास घडविला आहे .


२४९ .

ज्याचेनि जितोसी त्यासी चुकलासी । व्यर्थ कां जालासी भूमिभार ॥१॥

भूमिभार जिणे तुझे गुरुविणे । वचने प्रमाणे जाण बापा ॥२॥

जाण बापा गुरुविणे गति नाही । पडसी प्रवाही मायाजाळी ॥३॥

मायाजाळी व्यर्थ गुंतलासी मूढा । जन्मवरी ओढा ताडातोडी ॥४॥

कांही तडातोडी कांही राम जोडी । आयुष्याची घडी ऐसी वेंची ॥५॥

ऐसी वेची बापा आपुली वयसा । दास म्हणे ऐसा काळ घाली ॥६॥

२५० .

विषयी विरक्तपण इंद्रियेनिग्रहण । गुरुकृपेवांचुनि नव्हे नव्हे ॥१॥

चंचळपणे मन न करी विषयध्यान ॥गुरु०॥२॥

बुध्दिबोधक जाण ब्रह्मानुभव पूर्ण ॥गुरु०॥३॥

भक्तिज्ञानपूर्ण सप्रेम संपूर्ण । गुरुकृपे० ॥४॥

रामीरामदास म्हणे निर्गुणसुख लाधणे ॥गुरु०॥५॥

२५१ .

प्रपंची असोनी परमार्थ करावा । बरा विवरावा निरंजन ॥१॥

निरंजन देव प्रगटे अंतरी । मग भरोवरी कारीना कां ॥२॥

करीना कां परी संसार बाधीना । परी तो साधेना काय करुं ॥३॥

काय करुं देवा लोकांसी उपाय । ठाकवेना सोय विश्रांतीची ॥४॥

विश्रांतीची सोय समाधान होय । मोक्षाचा उपाय सद्गुरुची ॥५॥

सद्गुरुसंगती चुके अधोगती ॥ दास म्हणे मति पालटावी ॥६॥

२५२ .

करावे ते काय तेणे होते काय । अनुमाने काय प्राप्त होते ॥१॥

प्राप्त होते काय ऐसेही कळेना । नये अनुमाना सर्व कांही ॥२॥

सर्व कांही एका आत्मज्ञानेविण । दिसताहे सीण वाउगाचि ॥३॥

वाउगाचि लाभ प्रचीतीवेगळा । उगाचि आगळा दिसताहे ॥४॥

दिसताहे फळ लोकचि म्हणती । आपुली प्रचीती कांही नाही ॥५॥

कांही नाही पूर्वजन्माचे स्मरण । होय विस्मरण सर्व कांही ॥६॥

सर्व कांही मागे जाहले कळेना । म्हणोनि फळेना केले कर्म ॥७॥

केले कर्म कोणे कोणासी पुसावे । आनुमाने व्हावे कासावीस ॥८॥

कासावीस जाला कर्मे जाजावला । व्यर्थ भ्रमे गेला अंतकाळी ॥९॥

अंतकाळी गेला सर्व सांडुनीयां । भ्रमला प्राणीया विस्मरणे ॥१०॥

विस्मरण जाय सद्गुरु करीतां ॥ दास म्हणे आतां गुरु करी ॥११॥

२५३ .

रत्नपारखिया रत्नेचि परिक्षी । अलक्षाते लक्षी ऐसा नाही ॥१॥

ऐसा नाही कोणी देवाचा पारखी । आपुली ओळखी ठायी पाडी ॥२॥

ठायी पाडी निजस्वरुप आपुले । असोनि चोरले जवळीच ॥३॥

जवळी ना दुरी पाताळी ना वरी । सबाह्य अंतरी कोंदाटले ॥४॥

कोंदाटले असे परी ते न दिसे । जवळीच कैसे आढळेना ॥५॥

आढळेना आंगी पाहतां सर्वांगी । जयालागी योगी धुंडताती ॥६॥

धुंडताती कडाकपाटी शिखरी । समागमे हरी चोजवेना ॥७॥

चोजवेना एका सद्गुरुवांचोनी । निश्चयो हा मनी पाहिजे तो ॥८॥

पाहिजे निश्चयो दृढ स्वरुपाचा । तिही प्रचीतींचा ऐक्यभाव ॥९॥

ऐक्यभावे भक्ति रामीरामदासी । विभक्ति विश्वास दुरी ठेली ॥१०॥

२५४ .

सगुण हा देव धरावा निश्चित । तरी नाशिवंत विश्व बोले ॥१॥

विश्व बोले एका भजावे निर्गुणा । परी लक्षवेना काय कीजे ॥२॥

काय कीजे आतां निर्गुण दिसेना । सगुण असेना सर्वकाळ ॥३॥

सर्वकाळ गेला संदेही पडतां । कोणे वेळे आतां मोक्ष लाभे ॥४॥

मोक्ष लाभे एका सद्गुरुवचने । आत्मनिवेदने रामदासी ॥५॥

२५५ .

गुरुविणे प्राणी त्या होय जाचणी । सत्य माझी वाणी मिथ्या नव्हे ॥१॥

मिथ्या नव्हे सत्य सांगतो तुम्हांला । अंती यमघाला चुकेना की ॥२॥

चुकेना की यमयातना या जना । वेगी निरंजना ठाई पाडा ॥३॥

ठाई पाडा वेगी देव निरंजन । लावा तनमन सद्गुरुसी ॥४॥

सद्गुरुची नाही जयाला ओळखी । तया झोंकाझोंकी यातनेची ॥५॥

यातनेची चिंता चुके एकसरी । वेगी गुरुं करी दास म्हणे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP