भारूड - ठकडे
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
९४५.
दिवसां पडे चांदणे । रात्री पडे ऊन हो ॥ध्रु०॥
शेळी सेवी लांडगा व्याला । गाईने व्याघ्रा भक्षिले हो ।
आंधळा काढी मार्ग । पांगुळा धांवण्या धांवला हो ॥१॥
गाय व्याली व्याघ्र झाला । चार तोंडे त्याला हो ।
चहुं तोंडी भांडण हे । जनांसि पडले ठकडं हो ॥२॥
तळे उडाले गगना गेले । गगने चि ग्रासिले हो ।
रामीरामदास म्हणे हे गुज । संतांनी निवडले हो ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 10, 2013
TOP