भारुडे - कुळवाडी
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
९०५.
( राग-बरवा; ताल-धुमाळी )
कडकड वाहो करुनि भवरीण फेडा देतां घेतां दिसतो हाचि ।
हे दिस गेलियां मग तुझा तूंचि भोईसी खर्डसी रे रे ॥ध्रु०॥
आपुले इच्छेस्तव कुळवाडी केली भवमाळा सूति घेतली ।
सरकतीचे ढोर संकल्प येक विकल्प तयासी जाळी ।
दोहीचेनि भागे तिरडफांकी जाली पांचा घरी गोष्ट केली ।
काम क्रोध दोघे राबते आपुले बंडरिणाची पाटी तेहीं केली रे रे ॥१॥
भवरीण फेडावया उदीम आरंभिला ज्ञान हा इक्षु पेरिला ।
अज्ञान-तृण काढिले खुरपून वेदांतउदके जोपिला ।
अभिमानाची पोरी पडली तयावरी तेणे तो वाळुनि गेला ।
उदीम करितां हानी उपचार कायसा रिणाचा पर्वत जाला रे रे ॥२॥
कासी तयासी शरण गेलो तेणे अभय दिधले करे ।
तयाचेनि कौले स्वानंद पिकला चांचरल्या सुख न सरे ।
रामीरामादास मिळोनि गेला तेणे पिकामाजी रिण विरे रे रे ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 10, 2013
TOP