भारूड - बिजवर
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
९६८.
या जोशाचे तळपट जाले । पोर बिजवरा दिधले ।
प्रथम वर म्हणोनियां । लटिके आम्हां चाळविले ॥ध्रु०॥
पाहतां हीनवर जाले । पोर पाठी लागले ।
नवरी दिसे जैसी माता । कैसे लग्न लाविले ॥१॥
नवरी परवांचे पोर । कां रे म्हणतां थोर ।
पाहतां दिसे जैशी लेकी । वर पाहतां बागोर ॥२॥
पांच तीन वर्हाडी आले । नवरीकरितां मिळाले ।
एकटा एकट वर । कांही चाले ना बोले ॥३॥
रामदासस्वामी येना । त्यासि वरपण साजेना ।
एकली नवरी मिरवते । नवरा मिरवतां दिसेना ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 10, 2013
TOP