मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग| पाळणा विविधविषयपर अभंग श्रीसंप्रदाय लक्षणें नरदेह नरदेह कलिवर्णन कलिवर्णन निंदक तीर्थयात्रा एकादशी देव षड्रिपु. षड्रिपु. कर्मकांड कर्मकांड कर्मकांड गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरु-शिष्य गुरुपरंपरा संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग संतसंग करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना करुणा प्रार्थना वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य वैराग्य भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग. भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग भक्तिपर अभंग नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नवविधा भक्ति. नामस्मरण. नामस्मरण. नामस्मरण नामस्मरण पादसेवन. अर्चन सख्य आत्मनिवेदन उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर उपदेशपर पंचीकरण पंचीकरण पंचीकरण अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अध्यात्म अंजन उंदीर कानफाट्या कापडी कुंटण कुत्रे कुळवाडी कोंडे खेळिया गाय गोंधळ जोगी झडपणी टिपरी ठकडे डवरी. डांका दिवटा नवल पांगुळ पांडे पिंगळा फूल बहुरुपी बाळसंतोष. बिजवर बीर बैरागी रजक लपंडाव वाघ्या वासुदेव वृत्ति वोसाण शिलंगण सावज सौरी सर्प स्वप्न हंडिबाग होळी मंगलाचरण गणपति शारदा श्रीराम न्हाणी पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा पाळणा दृष्ट दृष्ट दृष्ट मारुती श्रीकृष्ण मुरली गवळणी काला विठ्ठल व्यंकटेश नरसिंह सूर्य देवी भैरव देवताविषयक पदे - पाळणा श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे. Tags : gathasamarthaगाथासमर्थ पाळणा Translation - भाषांतर १०६१.( राग-बिलावल; ताल-झंपा )प्रभू रामराजा प्रभू रामराजा । प्रभू रामराजा कपी भार फौजा ॥ध्रु०॥लागली रणतुरे । भार भारी भरे । मारिती नीकुरे एकमेकां ।सकळ निर्जरबळे । बंदजर्जर सळे । कोंडिले कूटिले रावणाने ॥१॥उठावले भार । मांडला भडमार । होतसे संव्हार समरंगणी ।खवळली कपिदळे । चालिली तुंबळे । एकमेकां बळे झोडिताती ॥२॥दैत्य काळे कडे । चालिले मेहुडे । भार भारी भिडे स्वामीकाजा ।हस्त उठावेल । स्वार चौताळले । पायिंचे धांवले लखलखाटे ॥३॥चालिले अचळ । मेरु मंद्राचळ । रीस गोलांगुळ तैशापरी ।एक हुंकारती । एक भुभुःकारती । एक ते थारती अंतराळी ॥४॥थोर हलकालोळ । कपीवीर कल्लोळ । टाकिती अचळ शृंगसीळा ।होतसे चकचूर । श्रोणितांचे पूर । धुरेवरी धूर । गांठि घाली ॥५॥करर करर करर । भरर भरर भरर । सरर सररसरर बाण जाती ।दोही दळी घात । मांडला कल्पांत । धुकट ज्वाला जात धुंद जाली ॥६॥धिमिकी धिमिकी नभी । दाटल्या दुंदुभी । रणदेवता उभी ग्रासितसे ।हे मही डळमळी । सागरु खळबळी । दाटली पोकळी बाणजाळी ॥७॥कडकड कडीत । कडकड कडीत । कडकड कडीत कटक कापे ।बाण ते पसरती । रिपुदळे घसरती । अद्भुते कसरती देव दैत्य ॥८॥लखलख लखीत । लखलख लखीत लखलखीत भाली ।तेज हेलावले । ब्रह्मांड बिंबले । चकित चाकाटले कटक कांपे ॥९॥शंकराच्या वरे । मस्त रजनीचरे । निर्जरे दैन्यवाणी ।देव जाजावले । रघुराज पावले । दास उठावले मारिताती ॥१०॥१०६२.मंचकभंगा पाहुनी प्लवंगा । आनंद बहु जाला मानसी ॥ध्रु०॥रामचरण ठेवितां कडकडे । साध्वीहृदय तेव्हांचि गडबडे ।दाशरथी ते पाहुनी मुरडे । व्याकुळ ती जाहली अबला ॥१॥अरे मर्कटा खुटिया केला । घात मंचक हा कोरविला । सच्चितसुख रघुविर हा आला । स्वपतिमृत्युते कथिते तुजला ॥२॥रामरतिसुख या शरीराला । घडेल पतिचा घातचि केला ।पात्रचि नरकाला जाहले हो । परि नाही की मनोरथ पुरला ॥३॥शापे भस्मचि करिते आतां । जाळीन रविला तुझी काय कथा ।जाळीन रविला तुझी काय कथा । रामदास म्हणे सरले आतां ।रघुवीर हा अंतरला मला की रे ॥४॥१०६३.( राग-तिलककामोद; ताल-धुमाळी ) रामराजा चालिल्या फौजा । कितीएक बोलती पैजा ।लंकेमध्ये तो गाजावाजा असंख्यात ॥१॥पहाड पर्वत उठिले जैसे । रीस वानर चालिले तैसे ।दैत्यकुळा कल्पांत भासे ॥२॥दशग्रीव उणेंचि लक्षी । बंदिशाळे सकळ रक्षी ।देव म्हणति आला कैपक्षी ॥३॥लंकेवरी घातला घाला । हुडहुडा पताका ढाला । समरंगणि संहार जाला ॥४॥दैत्य आले बहुत भांडले । किती वेळ जिंकोनि गेले ।किती वेळ जिंकोनी गेले । काळ आला सेखिं निमाले ॥५॥सकळांसहित रावण रणी । प्रेतरुपी समरंगणी ।देव मुक्त घाव निशाणी ॥६॥सुरवर नर वानर । ऋषीश्वर नारद तुंबर । आनंदाचे जयजयकार । ॥७॥बिभीषणाते राज्य दिधले । सौख्य जाले त्रैलोक्य घाले ।लोटांगण दासे घातले ॥८॥१०६४.( राग-धनाश्री; चाल-मनु हा वेधला हो । )लंका घेतली हो ॥ध्रु०॥कांचनकोट अलोट लुटाया चालिला दळ भार ।वानरवीर गिरिवर जैसे देताति भुःभुकार ॥१॥काळकृतांत उभा रघुनंदन कंदन होत असे ।सीतशरांकित अंकित बाणी युद्धकळा विकळासे ॥२॥रिपुदळ आट विराट कराया चालिला जैसा ।कर्कश वेष उभा रणरंगी राघव हा तैसा ॥३॥बाण चपेट लपेटीत पुढे काळ चळाळितसे ।रविकुळटिळक अंतक जैसा भुवन जाळितसे ॥४॥घोष कडक तदक तडाडी जाला धुमधुमकार ।बाण झणाण खणाणित भाली होताहे भडिमार ॥५॥चाप करार भरारित पीछे भूमि थरारितसे ।शेष धाके थरके फणिमंडळ । कूर्म गरारितसे ॥६॥सुरवर किन्नर देव दुंदुभी आनंदे धडके ।दास म्हणे जयवंत निशाण रामाचे फडके ॥७॥१०६५.( राग-कानडा; ताल त्रिताल )लोक सकळ पीडिला । त्रिकुटाचळी रणी रावण पाडिला ॥१॥मोठा आनंद जाहला । दीनवत्सले बंद खलास केला ॥२॥बहुत पीडिले लोक । पडिला रणी रावण भुवनकंटक ॥३॥टाळ मृदंगध्वनी । लागल्या बळे देव दुंदुभी गगनी ॥४॥गाती नारद तुंबर । विद्याधर गीत संगीत किन्नर ॥५॥आनंदली जगती । विमानीहुंनि देव सुमने वर्षती ॥६॥दास म्हणे धन्य हा रघुवीर । कृपाळुपणे फेडिला भूमिभार ॥७॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2011 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP