भारुड - खेळिया
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
९१६.
खेळिया नवल कैसे जाले रे । आपणासी आपण व्याले रे ॥ध्रु०॥
बाप ना माय आंगेचि होये । कर्णकुमारी पाहे रे । खेळिया ॥१॥
सदा बाळंतिणीपरी ते । आपण वांझचि होउनी राहे रे ॥२॥
वायोपोटी अगीन भाई रे । अगीनीपोटी पाणी रे ॥३॥
आंगड्याचे फेराडे म्हणाल झणी । जाणे अनुभवज्ञानी रे ॥४॥
कांही बोलिले नाही चालिले । वाईच आडळा आले रे ॥५॥
रामासी मिळतां रामचि जाले । कोडेंचि मोकळे केले रे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : November 10, 2013
TOP