मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
लपंडाव

भारूड - लपंडाव

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९७२.
( राग-श्रीराग; ताल-धुमाळी )
लपंडाई आणि डाई । दिसेना की ठाईंचे ठाई ।
डाई येतां होते भंडाई ॥ध्रु०॥
आहे आहे आहे की नाही । नाही नाही विवेके पाही ।
सावधानपणे तूं राही ॥१॥
जवळीच परी आडळेना । अनुमाने ठाई पडेना ।
ज्ञानदृष्टीवीण कळेना ॥२॥
घरामधे बाहेरी येतो । येतो जातो परी दिसेना तो ।
देतो घेतो परी कळेना तो ॥३॥
खेळ मोडा पिंपळ तोडा । म्हातारीचे डोचके फोडा ।
फोडीना तो जाणावा वेडा ॥४॥
जाणतया डाई चुकली । नेणतया ठाकुनि आली ।
गैब दास डाई बिडाली ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP