भारूड - सावज
श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.
९८८.
मानवसावज वो माय । वावजींच जाय बैसोनीयां ॥ध्रु०॥
तीन मुखे तया चारी श्रवण । त्यासि जाणे तो चि सुजाण ॥१॥
सकळांपुढे अकरा येते । रामी देखिजेते रामदासी ॥२॥
९८९.
चारी पाय दोनी पाउले । नागर दो चरणी चाले ॥१॥
दोनी कान तया दोनी शरीरे ॥ध्रु०॥
रामीरामदास सांगतो खूण । श्रवण आधी करावे मनन ॥२॥
९९०.
पक्ष नाही परी मान उडे । आकाश थोडे गतीलागी ॥१॥
न कळे वो माये पाखरुं सावज । रुपाचे विवज जाणवेना ॥ध्रु०॥
९९१.
सहा पाय ते दोहींच जाय । दोनी हात परी चौही वाहे ॥१॥
एक पुंस तया दोनी शरीरे । सावज मानव न कळे निर्धारे ॥२॥
वनींचे नव्हे परी वनींच वसे । रामीरामदास देखियेले ॥३॥
९९२.
दोनी पोटी दोनी पाठी वाहे । चारी पाय चरणाविण जाये ॥१॥
दोनी शरीरे एक चुची । सावज संती ओळखावे ॥ध्रु०॥
रामीरामदास विनवीतसे । मनन करी तया पावे ऐसे ॥२॥
९९३.
जाले अजन्माचे पोटी । मिथ्या म्हणतां फोडी घाटी ॥१॥
नवल नवल सावज रे । काय सांगुं मी चोज रे ॥२॥
तया मारुं जातां पाहे । जीवहानि होत आहे ॥३॥
रामीरामदासी वर्म । कळेना तयाचे कर्म ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 10, 2013
TOP