काशी खंड - अध्याय ३९ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्रीगणेशाय नमः ॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ सदाचार निरुपिला तुजप्रती ॥ आताम गृहम्थाश्रमीं जे नीती ॥ ते निरुपितों तुज ॥१॥
अगस्ति म्हणे गा षडानना ॥ माझे प्रश्नाचिया दाना ॥ क्षमा कीजे जी अनाथदीना ॥ मज रंकावरी ॥२॥
जैसा छत्रपति लोकपाळ ॥ तो जैसा जनईच्छेचा निर्मळ ॥ तैसा माझा वियोगवडवानळ ॥ शांत तुझिया शब्दामृतें ॥३॥
धुडोनियां मेळवी आहार ॥ अपत्या कवळ घाली पक्षीश्वर ॥ तैसा मी अनाथ किंकर ॥ तुम्हांआधीन स्वामी ॥४॥
मज काशीवियोग उद्भवला ॥ म्हणोनि स्वामीसी प्रश्न केला ॥ नव्हेचि तो औषधिसाध्य ज्वर चेतला ॥ असंभाव्य स्वामी ॥५॥
आतां तया ज्वराचा वैद्य पूर्ण ॥ तुम्ही मज भेटलेती षडानन ॥ मात्रा जाणता तूं शिवनंदन ॥ काशीकथा औषढी ॥६॥
तुझीं षड्वक्रें रत्नखाणी ॥ त्या भरलिया असती शिवनामरत्नीं ॥ तीं जडलीं माझिया मनहिरण्यीं ॥ परी तृप्ती नव्हेचि ॥७॥
आतां गृहस्थाश्रमाची कथा ॥ ती मज निरुपा स्वामिनाथा ॥ जेणें वंचिलें यमपंथा ॥ ते निरुपा स्वामिया ॥८॥
मग स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ तुजऐसा श्रोता न देखों कोणी ॥ जे श्रोते सांगीतले वेदपुराणीं ॥ त्यांमध्यें तूं मुख्य एक ॥९॥
सप्तद्वीपवतीमध्यें थोरु ॥ काय काशी तोचि क्षीरसागरु ॥ ते द्वीपांतरा होतें शरीरतारुं ॥ अगस्ति माझें ॥१०॥
तेथें अगस्ति बहुतां यत्नें ॥ भरलीं शिवनामकथारन्तें ॥ त्याम्सी केलीं होतीं गा यत्नें ॥ माझिये मनमांदुसेमाझारी ॥११॥
मग त्या रत्नांचा स्वभारु ॥ प्रमाण जाहालें शरीरतारुं ॥ मी उतरलों दक्षिण पारु ॥ काशीपुरीक्षीराब्धीचा ॥१२॥
तंव मित्रांवरुणांचा सुत ॥ ग्राहीक भेटलासी महाअद्भुत ॥ जेणें प्राशिला रत्नमुक्तांसहित ॥ महासमुद्र तो ॥१३॥
ऐसा तूं श्रोता थोर गा अगस्ती ॥ जें जें आवडे तुझें चित्तीं ॥ तितुकें कथीन तुज निश्चितीं ॥ ऐसा माझा मनोभाव ॥१४॥
तुवां प्रश्निली गृहस्थाश्रम नीती ॥ तरी एकाग्र परियेसी गा अगस्ती ॥ जे चतुर्वर्णाचारपद्धती ॥ ते कैसी आतां ॥१५॥
स्त्रीविण राहों नये द्विजासी ॥ दान संकल्पिजे न्यायिक द्रव्यासी ॥ तें किंचित परी पुण्यफळासी ॥ पाविजे सत्पात्रीं देतां ॥१६॥
अभिलाषाचें द्रव्य संपूर्ण ॥ तें वेंची जरी भारसुवर्ण ॥ तो दाता कृपण उभय जन ॥ यम दंडी जाणावें ॥१७॥
दुष्टाचे प्रतिग्रह जी अंगीकारिजे ॥ ऐसें ब्राह्मण सदाचारीं वर्तिजे ॥ दुष्टदान घेतां चंद्रार्कवरी ते ॥ भोगिती नरक ॥१८॥
षट्कर्मेविण नव्हे अग्निहोत्री ॥ पंचकर्मे न करी तो नव्हे गा क्षत्री ॥ त्रिकर्मेविण नव्हे जगत्रीं ॥ वैश्यवर्ण तो ॥१९॥
कुंभजं म्हणे षडाननासी ॥ क्षत्रियांचीं पंचकर्मे तीं कैसीं ॥ स्वामी म्हणे अगास्तिऋषी ॥ तीं परियेसीं आतां ॥२०॥
प्रथम कीजे सचैलस्नानं ॥ मग कीजे सत्पात्रीं दान ॥ सत्यार्थचि बोलिजे वचन ॥ असत्यासी वर्जूनी ॥२१॥
महासंतोष राखिजे भूतळीं ॥ नित्य गमन व्याहाळी ॥ युद्धीं शौर्य कीजे परदळीं ॥ हीं पंचकर्मे क्षत्रियें कीजे ॥२२॥
आतां वैश्यासी कर्मे कवण ॥ स्नान संध्या वैश्वदेव पूजन ॥ मग तृतीय प्रहरीं भ्रमण ॥ कीजे व्यापारार्थ ॥२३॥
हें त्रिकर्म कीजे वैश्यवर्णे ॥ आताम षट्कर्मै कवणें ॥ जीं नित्य आचरावीं ब्राह्मणें ॥ तीं परियेसी अगस्ती ॥२४॥
प्रथम शौच स्नान संध्या कीजे ॥ मग ध्यान अध्ययन आरंभिजे ॥ यजन याजन भिक्षाटन कीजे ॥ हीं षट्कर्मे ब्राह्मणें आचरावीं ॥२५॥
आतां चार कर्मे संन्यशासी ॥ तीं परियेसीं अगस्तिऋषी ॥ तीं आचरे तोचि गा संन्यासी ॥ येर उदरबैरागी ॥२६॥
स्वामी म्हणे गा अगस्तिऋषी ॥ आतां संन्यासकर्मे तीं कैसीं ॥ शौच स्नान संध्या भिक्षा एकांतासी ॥ हीं चार संन्यासकर्मे ॥२७॥
आश्रमाची जे नैऋति दिशा ॥ संन्यासियें जावें त्या दिक्प्रदेशा ॥ परी ते मर्यादा किती परियेसा ॥ दीर्घशंकेची ॥२८॥
योजनाचा आठवा भाग ॥ इतुका क्रमावा संन्यासियें मार्ग ॥ मग दीर्घशंकेचा मौनें पैं ॥३०॥
भूमि पाहावी चक्षुमंडळीं ॥ लिंग धरिजे करस्थळी ॥ मृत्तिका जरी भूतळी ॥ तरी जाय अधःपातासी ॥३१॥
ग्रामस्थळींची जे मृत्तिका ॥ ते असावी जवळिका ॥ सप्त वेळां लाविजे गुदीं मृत्तिका ॥ मग ऊठिजे तेथूनी ॥३२॥
महीपात्री घेऊनि जीवन ॥ सप्त पदें क्रमिजे तेथून ॥ त्रयें सप्तकें मृत्तिका लावून ॥ शौच कीजे ॥३३॥
मग पंच सप्तकें करस्थळीं ॥ मृत्तिका लाविजे सुनिळी ॥ ऐसें हें शौचकर्म प्रातःकाळीं ॥ संन्यासिये कीजे ॥३४॥
मग चरणक्षालन करुनी ॥ सप्त गोळे कीजे तिहींकरुनी ॥ कर क्षाळिजे कंठापासूनी ॥ मग निघावें स्नानासी ॥३५॥
ऐसें कीजे शोच-स्नान ॥ मग कीजे भिक्षाटन ॥ जंव दिनकर येतसे मध्यान्ह ॥ तंव भिक्षाकाळ ॥३६॥
भिक्षा कीजे उद्वस नगरीं ॥ धूम्र न दिसे ज्या घरीं ॥ भिक्षाकवळ घेइजे करीं ॥ करपात्रींचि भक्षिजे ॥३७॥
अधिक भिक्षा जे अन्नेविण ॥ जरी अभिलाषी द्रव्यदान ॥ अधःपाता जावया लांछन ॥ गोहत्या सहस्त्र नित्य ॥३८॥
स्त्री अभिलाष जरी मनीं ॥ गणितां सहस्त्र कल्प दोनी ॥ निरयादिक भोगी नाना योनी ॥ त्या दोष नाहीं निष्कृती ॥३९॥
पर्जन्यकाळी चतुर्मासवरी ॥ संन्यासियें न निघावें बाहेरी ॥ अंकुर निपजती पृथ्वीवरी ॥ भंग त्यांचा महादूषण ॥४०॥
शिष्य पाठविजे भिक्षेसी ॥ ऐसें क्रमिजे चतुर्मासीं॥ हा संन्यासाश्रम अगस्तिऋषी ॥ निरुपिला तुज ॥४१॥
आतां गृहस्थाश्रम सांगेन ॥ जयासी म्हणावें शुद्धाचरण ॥ नित्य नित्य कीजे स्नान ॥ गृहस्थें पैं ॥४२॥
दोषियांचे संगतीं बैसतां ॥ स्नान केलें पाहिजे गृहस्था ॥ चतुर्वर्णंमाजी नित्य वर्ततां ॥ कैसें असावें गृहस्थें ॥४३॥
स्तीविरहित राहों नये द्विजा ॥ न्यायिक द्रव्य वेंचिजे धर्मकाजा ॥ अभिलाषाचें वेंची जो ब्रह्मभोजा ॥ तो भागो निरय ॥४४॥
आतां ब्राह्मणशूद्र ते कवण ॥ जे वृषभपृष्ठीं घालिती पलाण ॥ अन्नविक्रय रसविक्रय ब्राह्मण ॥ करिती ते शूद्र जाणावे ॥४५॥
त्यांचे गृहीं शूद्रजातीनें जाण ॥ सर्वथा न कीजे उदकप्राशन ॥ तरी सत्याचे घडे सुरापान ॥ आणि अधःपातासी जाय ॥४६॥
धान्य लवण शर्करा ॥ ब्राह्मण इच्छिती यांचिया व्यापारा ॥ तरी सुरापान गोमांसविकरा ॥ केला त्था अन्ययाती ॥४७॥
त्यांचिया दोषा नाहीं निष्कृती ॥ चंद्रार्कवरी ॥ निरये भोगिती ॥ पडती अधःपाती ॥ भोगिती चौर्यायशीं लक्ष योनी ॥४८॥
भलिया षट्कर्मीं ब्राह्मणें ॥ न घेइजे तयाचें धान्यदान ॥ घे तरी गोमांसमक्षण ॥ घडलें सत्य पैं ॥४९॥
रसविक्रय वणिज वानप्रस्थ ॥ वृषभपृष्टीं पालाणिती वाहाती शेत ॥ ते नव्हेति ब्राह्मण शूद्रयात ॥ म्हणावें निश्चयें ॥५०॥
आतां भल्या गृहस्थें असत्य ॥ कवणाठायीं अव्हेरिजे सत्य ॥ स्थयंवरी पर्णितां जाण अपत्य ॥ आणि द्विज नागवितां ॥५१॥
आणि गौखाय कवणाचें कांहीं ॥ आणि कवणाचे गृहीं द्रव्य जाय सर्वही ॥ इतुके ठायीं गृहस्थ्ये पाहीं ॥ बोलूं नये सर्वथा ॥५२॥
क्षीर घृत लवण स्नेह पाणी ॥ इतुकें न दीजे हस्तीं भल्यांनी ॥ घेइजे भूमीवरी ठेवूनी ॥ तें निर्दोष जाण ॥५३॥
भल्या सत्पात्रासी दीजे अन्न ॥ तें जीर्ण करी वेदपठणेंकरुन ॥ तेणें गृहस्था विजय पूर्ण ॥ ऐहिके पारत्रिक जोडे ॥५४॥
अन्न देतां अपात्रासी ॥ तें अन्न शापीतसे गृहस्थासी ॥ या अधममूर्ग्वउदरीं आम्हांसी ॥ घातलें कवणें ॥५५॥
जोशी मुळ्या ग्रामयाजीचें अन्न ॥ भक्षूं नये भलिया श्रीमंते जाण ॥ भक्षी तरी घडे भोजन ॥ अमंगळ कृमींचे ॥५६॥
कंदर्प गाजरकंद देखा ॥ गोराडकंद शेवगा मूळशाखा ॥ हे ब्राह्मणें भक्षितां विशेषा ॥ तरी भक्षिलें गोमांस ॥५७॥
आतां कोठें कीजे ब्राह्मणें मौन ॥ संध्या साधितां आणि सारितां भोजन ॥ मातृ-भगिनीसी अनुग्रहवचन ॥ यापरतें काय सांगूं ॥५८॥
स्वामी म्हणे गा ऋषि अगस्ती ॥ परियेसी चतुर्वर्णांची गृहस्थिती ॥ स्त्रियोविरहित महाश्रीमंती ॥ असों नये परम दूषण ॥५९॥
गृहस्थासी महत्त्व ऐश्वर्या ॥ या सर्वांचे भूषण भार्या ॥ भार्येविण सर्व गुणगांभीर्या ॥ निंद्यता जाण जगत्रयीं ॥६०॥
भार्या गृहस्थाश्रमाचें मूळ जाण ॥ भार्या सुखाचें अधिष्ठान ॥ भार्या संतानाचें मूळ पूर्ण ॥ धामाधिपत्य मूळ ते ॥६१॥
भोजनसमयीं भार्येचा सुगुणु ॥ जैसी वत्सावरी ममता करी कामधेनु ॥ भार्येपुढें दिसे भाव भिन्न ॥ मातेचा पैं ॥६२॥
शयनस्थळीं भार्या ते दासी ॥ भार्या संकल्पी शरीरप्राणेंसी ॥ जैसा व्योमीं प्रकाशतां शशी ॥ आनंदें कुमुदिनी ॥६३॥
रणांगणचें ठायीं भार्य ते शक्ती ॥ आपुल्या स्वामीसी जय कल्पिती ॥ जैसा उभा असे शस्त्र घेऊनि हातीं ॥ साह्यासी बंधू ॥६४॥
देहान्त झालिया स्वामीसी ॥ संकल्प करी स्वशरीरासी ॥ म्हणोनि भार्येविरहित पुरुषासी ॥ नसे गृहस्थाश्रम ॥६५॥
भार्येविरहित नाहीं धर्माधिकार ॥ जैसें तें दग्ध बीज न करी विस्तार ॥ भार्या ते जाणावी सर्व श्रुंगार ॥ धर्मपद्धतीचा ॥६६॥
म्हणोनि चतुर्वर्णांहीं भार्या कीजे ॥ भार्येविण सुकृत न पाविजे ॥ तप दान यजन जाणिजे ॥ व्यर्थ स्त्रियेविण ॥६७॥
अग्निहोत्र असे ब्राह्मणासी ॥ आणि स्त्रिवियोग होय त्यासी ॥ तरी वैश्वदेवआचरण-सामर्थ्यासी ॥ अप्राप्त भार्येविण ॥६८॥
यास्तव दर्भाची भार्या करुनी ॥ ते वामांगी बैसविजे ब्राह्मणीं ॥ मग पुढें वैश्वदेवार्चनीं ॥प्रवर्तिजे कर्मासी ॥६९॥
क्षत्रिय वैश्य आणि ब्राह्मण ॥ यांसी भार्या नाहीं स्वयंवरेंविण ॥ शूद्रासी भार्यावियोग होय तरी तेणें ॥ राहूं नये दूषण ॥७०॥
त्रयवणीं कीजे स्वयंवराची ॥ शूद्रें स्वयंवरी द्वितीय संबंधाची ॥ स्त्रिया निर्दोष म्हणोनियां ॥७१॥
भार्यावियोग झालियावरी ॥ क्रमूं नये पक्ष मासवरी ॥ भार्येविण गृहस्थे माता-कुमरी ॥ यांसी अनवाचा असावें ॥७२॥
त्रिभुवनीं भार्या शोभे पुत्रप्रजा ॥ भार्या मीद्रकळसाग्रींची ध्वजा ॥ भार्येविण पूर्वजां ॥ अलभ्य श्राद्धपिंड ॥७३॥
म्हणोनि स्त्रियेसमान नाहीं मित्र ॥ भार्येविण निष्फळ मंत्र ॥ भार्या सर्व गृहाचें छत्र ॥ अनुपम जाणिजे ॥७४॥
पुरुषाहूनि अष्टगुण अधिकत्वें ॥ स्त्रियांची प्रकृती कामित्वें ॥ म्हणूनि आवंगिजे मौनित्वें ॥ प्रकृती जाणोनि ॥७५॥
महादेवाचिया चंडांशासी ॥ धेनूसी पान करितां वत्सासी ॥ आणि लावण्य तारुण्य स्त्रियेसी ॥ इतुकें इष्टीं पाहों नये ॥७६॥
वृषभ वाहाती करितां शेत ॥ सर्व विक्रय करुं इच्छीत ॥ ते ब्राह्मण नव्हेति अन्य यात ॥ बोलिजे शास्त्रीं ॥७७॥
आतां सप्तात्र ते कवण कवण ॥ उत्तम मध्यम कनिष्ठ जाण ॥ ऐसीं पात्रें असती त्रिवर्ण ॥तीं परियेसीं अगस्ती ॥७८॥
नित्य षट्कर्में पंचयज्ञ करी ॥ तो उत्तम पात्र ब्राह्मणांमाझारीं ॥ आतां संन्यासकर्मी वर्ण चारी ॥ ते महाउत्तम पात्र ॥७९॥
पुढें क्षत्रियाची बिरुदें ॥ क्षत्रियाची स्तुती करिती शब्दें ॥ तीं कनिष्ठ बोलिजे पात्रवृंदें ॥ बंदीजन देवांछे ॥८०॥
वैश्य ब्राह्मणांचा प्रतिग्रहो ॥ हा न घेइजे दानसंग्रहो ॥ बिरुंदे पढोनि पोषण करी जो देहो ॥ क्षत्रियांची निंद्य तो ॥८१॥
क्षत्रियाविरहित त्रयवर्ण ॥ प्रतिग्रह घेई जो बंदीजन ॥ तो कल्पवरी कृपण ॥ होईल पिशाच ॥८२॥
म्हणोनि क्षत्रियाचें दान ॥ तें अंगिकारिजे बंदीजन ॥ आणिक इच्छी तरी तो साधन ॥ अधःपाता होय ॥८३॥
द्विज वैश्य क्षत्रियांची ॥ ब्राह्मणे दानें घेइजे त्यांचीं ॥ दानें घे जरी अन्य यातीचीं ॥ तो ब्राह्मण गोमांस भक्षी ॥८४॥
मांसविक्रयीचें द्रव्यदान ॥ प्रतिग्रहाचें घे जरी ब्राह्मण ॥ तरी त्यासी घडे रक्तपान ॥ सर्व मांसांचें ॥८५॥
त्यासी प्रायश्चितें नाहीं गा निष्कृती ॥ तो महादोषी जाय अधःपाती ॥ जंववरी शेष धरी क्षिती ॥ तोंवरी नरक पूर्वजांसी ॥८६॥
अन्नावांचूनि आणिक दानासी ॥ जरी अंगिकारी संन्यासी ॥ तो चंद्रार्कवरी जाय नरकासी ॥ परी निष्कृती घडेना ॥८७॥
आताअं गृहस्थे कैसें दान कीजे ॥ सत्पात्र असे तेंचि पूजिजे ॥ येर अपात्र वंचिजे ॥ भल्या गृह्यस्थें ॥८८॥
अवघेंचि द्रव्य दे जो ब्राह्मणा ॥ तो मूर्खांमाजी श्रेष्ठ जाणा ॥ वरपडा होय यमगणा ॥ नरकप्राप्त होय तयासी ॥८९॥
स्त्रियाअ पुत्र आणि बंधुवर्ग ॥ कीजे आश्रितांचा विभाग ॥ मग चालविजे दानमार्ग ॥ आपुलिया विभागाचा ॥९०॥
अवघेंचि द्रव्य दे तो अधम ॥ निष्फळ जाणावा तयाचा धर्म ॥ नव्हे मोक्ष तयासी हा श्रम ॥ बांधला दोषाचा ॥९१॥
नव पोष्यवर्ग गृहस्थासी ॥ ते कवण कवण गा अगस्तिऋषी ॥ पुत्र मित्र आणि अतीतासी ॥ पाहिजे पोषिलें ॥९२॥
स्त्रिया बंधु आणि गुरुमाता ॥ आश्रित आणि जनकपिता ॥ हे नव पोष्यवर्ग गृहस्था ॥ पाळिले पाहिजेती ॥९३॥
आतां नव तीं भद्रें बोलिजे ॥ या बैसा अन्यत्रासी म्हणिजे ॥ शांति क्षमा दया सन्मान कीजे ॥ भक्ष्य दीजे शयन आसन उदक ॥९४॥
आतां नव करावीं तीं कवण ॥ बैसकार कीजे दीजे बैसावया आसन ॥ पूजिजे मानिजे कीजे पादार्चन ॥ सुग्रास भोजन उदक शयन दक्षिणा ॥९५॥
निंदा चाहाडी लावालावी पूर्ण ॥ द्रोह माया अप्रिय भाषण ॥ दंभ क्रोध परद्वारलंपटपण ॥ हीं नवही न करावीं ॥९६॥
शौच स्नान संध्या जप हवन दान ॥ श्रद्धा भिक्षा आणि वेदपठण ॥ हीं नवही ब्राह्मणें संपूर्ण ॥ आचरावीं पैं ॥९७॥
आपुलें आयुष्य गृहच्छिद्र वित्त आणि दान ॥ मैथुन मंत्र मान अपमान ॥ आणि भेषज नववें जाण ॥ ही नव गोप्य करीं पैं ॥९८॥
चावटी आणि संभेत हास्य करी ॥ कुविद्या कुतर्कवादी करी चोरी ॥ हिंसक कुसंगी मलिन जुवारी ॥ हे नवही निष्फळ ॥९९॥
पुत्र मित्र आणि बंधु अतीत ॥ स्त्री माता पिता गुरु दैवत ॥ आणि असती आपुले जे आश्रित ॥ या नवांसही मान दीजे ॥१००॥
आतां दोष नाहीं कवणांकरणें ॥ हें तंव बोलिजे गृहस्थाकारणें ॥ कुंभजासी सांगीतला षडाननें ॥ गृहस्थाश्रम हा ॥१०१॥
चितळ वाजीअजा सूकर जाण ॥ यांचें निर्दोष गा आनन ॥ फलपाकीं लागे मुखं दर्शन ॥ तें निर्दोष भक्षिजे ॥१०२॥
आतां मांसें निर्दोष ती कवण कैसीं ॥ श्वान मृग मुख लावितां निर्दोषी ॥ मांस भक्षूं नये मत्स्याअदृरियासी ॥ तीं कवण कवण ॥१०३॥
पारवे बक हसं टिटवी ॥ ससानी भास कुक्कुट न भक्षावी ॥ भक्षी त्या दोषीं देवीं उरावी ॥ दोषनिष्कृता पैं ॥१०४॥
नित्य नित्य जो मत्स्यआहारी ॥ तो जरी जळमत्स्य भक्षण करी ॥ जो जाणावा जी पूर्ण आहारी सर्व मांसांचा ॥१०५॥
ब्राह्मणें कैसें भक्षिजे मांस ॥ यज्ञयागीं भक्षावें गा निर्दोष ॥ क्षत्रिया पूजेविण प्रयास ॥ न कीजे भक्षितां ॥१०६॥
जरी मांस न करिती भक्षण ॥ तरी तें निष्फळ यागहवन ॥ मग दाता आणि कृष्णा ॥ अधःपाता जाता पैं ॥१०७॥
आतां लक्षणें पाहातां स्त्रियांसी ॥ सर्वथा दोष नाहीं तयांसी ॥ स्वामी म्हणे गा अगस्तिऋषी ॥ तें कैसें परिसावें ॥१०८॥
त्या नित्य नित्य निर्दोष गा असती ॥ मासपर्यंत होय रजोवती ॥ तियेसी नित्य शुद्ध करिताती ॥ ते कवण आतां ॥१०९॥
चंद्र असे तयांचे आननीं ॥ मुखवातें चंद्र करी हननी ॥ म्हणोनि निर्दोष गा कामिनी ॥ अगस्तिऋषी ॥११०॥
म्हणोनि लांछन नाहीं गा स्त्रियांसी ॥ जी मातीं मासीं रजोवती होय तिसी ॥ संचलें पाप जाय संचयेंसी ॥ त्या रजःकाळाअंतीं ॥१११॥
म्हणोनि स्त्रिया शुद्ध गा आननीं ॥ आणि ब्राह्मण शुद्ध आचरणीं ॥ अजा अश्व चितळ आननीं ॥ हेही मुखीं पैं ॥११२॥
आतां चतुर्वर्णांचे श्रेष्ठ जाणा ॥ परदळविध्वंसीं आहवांगणा ॥ तो क्षत्रियामध्यें थोर शहाणा ॥ श्रेष्ठ बोलिजे ॥११३॥
ब्राह्मण श्रेष्ठ अध्ययनमंत्री ॥ वैश्यवर्ण श्रेष्ठ अग्निहोत्रीं ॥ शूद्रवर्णाचा बोलिजे शास्त्रीं ॥ वृद्ध म्हतारा पुरुष ॥११४॥
अगस्तीसी वदे षडानन ॥ हें चतुर्वर्णांचें श्रेष्ठत्व जाण ॥ आतां ज्या पात्रीं भक्षिजे अन्न ॥ तें शुद्ध पात्र कैसेनी ॥११५॥
कांस्यपात्रशुद्धि विभूतीनें ॥ अबळा शुद्ध अलंकारभूषणें ॥ दुधा शुद्धत्व एकाचि फेणें ॥ सरिता महापूरें शुद्ध ॥११६॥
शिवसुत म्हणे गा ऋषी अगस्ती ॥ परियेसीं सदाचारनीती ॥ गृहस्थाश्रमीं वर्ततां जे जाणती ॥ ते सावधान परिसावे ॥११७॥
शयन यानें उपानह पात्रें ॥ अलंकारभूषणें नाना वस्त्रें ॥ हीं एकमेकाचीं नेइजे मित्रें ॥ नाहीं दूषण सर्वथा ॥११८॥
आतां स्त्रियांसी श्रेष्ठ दूषणें ॥ ती परियेसीं अगस्ती कवणकवणें ॥ परपुरुषाचें आलोचन करणें ॥ दुसरें परद्वार ॥११९॥
परगृहीं जाय निद्रेसी ॥ रुसोनि जाय सांडूनि स्वामीसी ॥ मद्य भक्षी भांडे अहर्निशीं ॥ हीं षट् दूषणें स्त्रियांसी ॥१२०॥
हिंसाकर अष्ट तीं कवण आतां ॥ विक्रीत घेता घेवविता भक्षिता ॥ पाहे मारी मौळें अनुमंता मारविता ॥ हे अष्टही हिंसक पैं ॥१२१॥
गोगाठेणीं करस्थळीं ॥ फेण उद्भवे सरिताजळीं ॥ स्मशानभूमि स्त्रिया रजस्वली ॥ आतळू नये पुरुषें ॥१२३॥
मार्ग सांडूनि न धरिजे अनध्वा ॥ देवद्वारीं रुद्रतरु वंदावा ॥ भूमिकंद आणि विष्णुवृक्ष हा घ्यावा ॥ दक्षिणांगी पुरुषें ॥१२४॥
आतां मूळ मघा रेवतीसी ॥ प्रतिपदा आणि नवमीसी ॥ अमावास्या आणि एकादशीसी ॥ स्त्रियांसे ऋतु न दीजे ॥१२५॥
त्याचि तिथि-नक्षत्रीं ब्राह्मणें जाण ॥ सर्वथा न कीजे तैलभक्षण ॥ जो ब्राह्मण करी तो दोषिया पूर्ण ॥ मत्यआहारी बोलिजे तया ॥१२६॥
याचि तिथि-नक्षत्रीं ब्राह्मणासी ॥ दंतधवन वर्ज बोलिलें त्यासी ॥ अगस्ती म्हणे स्वामीसी ॥ तरी कैसी मुखशुद्धी ॥१२७॥
कुंभंजासी म्हणे षडानन ॥ हें दिवसाचि असे बंधन ॥ निशि वर्तल्या दंतधावन ॥ सुखेंचि मुक्त असे ॥१२८॥
कुंभजे प्रार्थिला षडानन ॥ मुख शुद्धीविण् कर्म हीन ॥ तरी काय करी गा तो ब्राह्मण ॥ कैसी मुखशुद्धी ॥१२९॥
स्वामी वदे अगस्तिऋषी ॥ दिवसा मुखशुद्धी ते ऐसी ॥ तरी चोवीस गुळण्या मुखासी ॥ होतसे मुखशुद्धी ॥१३०॥
ऐसा क्रमिजे दिनमान ॥ मग रात्रीं कीजे दंतधावन ॥ तें चतुर्वर्णा कवण कवण ॥ कीजे गा कैसें ॥१३१॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ या दंतधावनाच्या वनस्पती ॥ उमेसी पशुपंती ॥ त्या कवण कवण परिसा आतां ॥१३२॥
बदरी नारिंगी खर्जूरी ॥ आम्रवृक्ष जांबळी अवधारी ॥ अपामार्ग औदुंबर ऐशा प्रकारीं ॥ कीजे दंतधावनं ॥१३३॥
स्थूळ तरी पादांगुष्ठ जैसें ॥ दीर्घ तरी अंगुळें द्वादशें ॥ दंतधावन निर्मिलें ऐसें ॥ ब्राह्मणासी ॥१३४॥
आतां तर्जनीप्रमाण तें स्थूळ ॥ दीर्घ बोलिलें द्वादशागुळ ॥ हें बोले जाश्वनीळ ॥ क्षत्रियासी ॥१३५॥
आतां स्थूळ अनामिका ऐसी ॥ दीर्घ अंगुळें परियेसीं ॥ तें दिधलें वैश्यवर्णासी ॥ दंतधावन पैं ॥१३६॥
कनिष्ठिका ऐसें स्थूळिक ॥ दीर्घ तरी अंगुळें षष्ठक ॥ तें दंतधावन निर्मळ ऐक ॥ शूद्रवर्णासी पैं ॥१३७॥
ऐसीं दंतधावनें चतुर्वणी ॥ अगत्य कीजे अगस्तिमुनी ॥ शुल्के न करितां होतसे दशनीं ॥ अधर्म देखा ॥१३८॥
आतां जाणावें कैसें यज्ञोपवीत ॥ देववृक्षाचें गर्भसुत ॥ तें विधि वर्णूं शुभ्र जैसें श्वेत ॥ घेइजे ब्राह्मणें ॥१३९॥
ब्रह्मवृक्षाचे चक्र करुन ॥ कर्मनिष्ठ असे अग्निहोत्री ब्राह्मण ॥ तयाचेनि हातें करावें पूर्ण ॥ जानव्याचें सुत ॥१४०॥
तीनशतें चौर्यायशीं अंगुळें दोरा ॥ मग तो त्रिसुती कीजे पुरा ॥ पंचाग्निकारका द्विजवरा ॥ हस्तें कीजे मंत्रेंसी ॥१४१॥
ते पंचयज्ञ कीजे ब्राह्मण ॥ न करी तो म्हणिजे शूद्रवर्ण ॥ केलियाविण घेई अन्न ॥ तो म्लेंच्छ जाणिजे ॥१४२॥
तरी पंचयज्ञ कैसे आतां ॥ ब्राह्मणासी नित्याचारीं वर्ततां ॥ शौच स्नान संध्या नित्य करितां ॥ हे त्रय यज्ञ बोलिजे ॥१४३॥
अर्धबिंबोदयीं सूर्यार्घ्य दीजे ॥ अष्टघटिका वेदाघ्ययन कीजे ॥ मग माध्यान्हकाळीं घालिजे ॥ वैश्वदेव-आहुती ॥१४४॥
मग स्वामीसी वदे ऋषि उत्तम ॥ हा निरुपिला गृहस्थाश्रम ॥ आतां वानप्रस्थ आश्रमनेम ॥ कैसा निरुपा मजलागीं ॥१४५॥
आतां सावधान श्रोते सर्वज्ञ ॥ कथेसी अर्पावे श्रवण ॥ अगस्तीनें प्रार्थिला षडानन ॥ ते कथा परिसा अनूपम ॥१४६॥
शिवदास गोमा श्रोतयांप्रती ॥ भिवोनिं प्रार्थीतसे बद्धहस्तीं ॥ आश्रम कथावयाची युक्ती ॥ तो अगस्तिस्वामी जाणे ॥१४७॥
इति श्रीस्कंडपुराणे काशीखंडे गृहस्थाश्रमवर्णनं नाम एकोनचत्वारिंशाध्यायः ॥३९॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ इति एकोनचत्वारिंशाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : September 29, 2011
TOP