मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ७६ वा

काशीखंड - अध्याय ७६ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ अगस्ति वदे जी षड्‍वक्रा ॥ मज अनाथासी तुळाया सूत्रा वियोग महातमीं जातां मित्रा ॥ काढिलें मज तुवां ॥१॥
वियोग ज्वाळां चिया आंत ॥ शरीर माझें होय हुत ॥ तंव तूं आचार्य  सिद्ध मंत्र शक्त ॥ शिंपिलें शिवनामा मृतें ॥२॥
आतां एक पृच्छा असे जी स्वामिनाथा ॥ मज निरूपितां शिवकथा ॥ परी अद्यापि तृप्ति नाहीं सर्वथा ॥ माझिया मानसीं ॥३॥
म्हणोनि प्रश्न करीतसे तुम्हां ॥ झणीं कोपाल मज करा क्षमा ॥ मुक्त मंडपाचा महिमा ॥ तो मज निरूपा स्वामी ॥४॥
स्वामी म्हणे गा अगस्ति ब्राह्मणा ॥ कैंचा ताप ज्वर त्या चंदना ॥ कैंचा अंधकार त्या ब्रन्ध ॥ स्वाप्नीं नाहीं ॥५॥
जेथें प्रवर्ते शिव कथा मृत ॥ तेथें कैंचा शीण कैंचें ताप पतित ॥ तरी तुवां प्रश्निलें तें उचित ॥ निरूपूं आतां ॥६॥
मुक्त मंडप ऐसें नाम त्यासी । तेथें निर्वाण होतसे सर्व जीवांसी ॥ त्या मंडपीं बैसोनि त्रैलोक्य जंतूंसी ॥ देतसे मुक्तिदानें ॥७॥
तरी परियेसीं गा मैत्रावरुणी ॥ या मुक्त मंडपाचें भविष्य पुराणीं ॥ दाक्षा यणी प्रति शूलपाणी ॥ अनुवादला होता ॥८॥
तें शिववाक्य भविष्य पुराणींचें तुज प्रती । निरूपण करूं गा अगस्ती ॥ या मुक्त मंडपाचें नाम स्मरलिया अंतीं ॥ होईल कुक्कुट मंडप ॥९॥
तें भविष्य करवूं तुज श्रवण ॥ जें अनागत जाणिलें पंचाननें ॥ ऐसें भूत भविष्य सांगावया कारण ॥ असे पुढें ॥१०॥
लवण समुद्राचा पार ॥ तेथें जो सेतुबंध रामेश्वर ॥ तो अहो रात्र भागी रथीचें नीर ॥ इच्छी तसे स्नानासी ॥११॥
त्यासी भागी रथीजळें करील जो तृप्ती ॥ त्यासी करील तो पृथ्वी पती ॥ ऐसा वर वेद पुराणांतीं ॥ सत्यचि असे ॥१२॥
त्य सेतुबंधीं जो अंत्यजजात ॥ पुरु नामें महा बंधनवंत ॥ तो शिव नामीं भक्त अतिनेमस्त ॥ नीतिवंत पैं ॥१३॥
नित्य शिव पूजा केल्या विण ॥ सर्वथा न स्वीकारी अन्न ॥ काशी करावया उत्कंठित मन ॥ जाहालें असे तयाचें ॥१४॥
मग पुरु म्हणे स्त्रियेसी ॥ गृह व्यवसाय समर्पूनि पुत्रांसी ॥ आपण उभयतां वाराणशीसी ॥ क्रमिजे आतां ॥१५॥
मग बोले ते पुरुची कामिनी ॥ म्हणे परिसा माझी विनवणी ॥ आपण क्रमिजे आनंदवनीं ॥ तें महा समर्थ ॥१६॥
तेथें जाइजे परी शिव दर्शन ॥ आपणासी होईल कैसेन ॥ कवण अंगिकारितील दान ॥ आपुलें तेथें पैं ॥१७॥
आपणासीं द्रव्य सामग्री बहुत ॥ सत्पात्रीं दान ॥ कीजे किंचित ॥ तरी तें काशी केलियाचें सुकृत ॥ अपार होय ॥१८॥
ग्राम मुळियासी देतां दान ॥ तरी तें निष्कारण जाण ॥ जैसें त्या दग्धबीजांचें प्रमाण ॥ उद्भवेना क्षिति भुवनीं ॥१९॥
मग कैंचें पत्र पुष्प आणि फळ ॥ म्हणोनि आमुचे गृहींचें दान सकळ ॥ जैसें पांगार वृक्षाचें कमळ ॥ न ये कवणा उपयोगा ॥२०॥
म्हणोनि ग्राम मुळियासी देतां दान ॥ तें फळित नव्हे भोगवी पतन ॥ जैसें सरितापूरजळीं वोसण ॥ पृथ्वीचि प्रवाहिली ॥२१॥
म्हणोनि भला ब्राह्मण पूजिजे ॥ शुद्ध षट्‍कर्मी ओळखिजे ॥ परी तोही प्राप्त न होइजे ॥ महातीर्था वांचुनी ॥२२॥
म्हणोनि ग्राम मुळियासी न दीजे ॥ आणि गृह स्थेंही त्यासी वंचिजे ॥ घेत्या देत्या बोलिजे ॥ सहस्त्र वर्ष पर्यंत ॥२३॥
आतां हें दान द्यावयाची नीती ॥ वेदपुराणें ऋषि वाक्यें बोलती ॥ ऐसें त्या अंत्यज पुरूची युवती ॥ वदली प्रत्युत्तर ॥२४॥
तरी त्या काशी मध्यें द्विजवर ॥ षट्‍कर्मी जे नित्याचार ॥ ते प्रति ग्रह न घेती साचार ॥ अंत्यज ज्ञातीचा ॥२५॥
म्हणोनि आपुलें द्रव्य निष्कारण ॥ सत्पात्रीं न पडेचि दान ॥ तरी काशी केल्याचा स्वगुण ॥ विशेष काय ॥२६॥
तंव पुरु म्हणे प्राणेश्वरी ॥ आपण द्रव्य नेऊं काशी पुरीं ॥ तेथें कोणीचि दान न अंगीकारी ॥ तरी टाकूं गंगे मध्यें ॥२७॥
जरी नव्हे विश्वेश्वराचें दर्शन ॥ तरी करूं गंगेचें आचमन ॥ घेडल काशी पुरीचें अवलोकन ॥ तेणेंही मुक्ति असे ॥२८॥
ऐसा विचार केला उभयतां ॥ त्यांहीं गृह स्थिती निरविली सुतां ॥ मग तो पुरु आणि त्यांची कांता ॥ निघालीं काशीसी ॥२९॥
हिरण्य घेतलें वृष भभरीं ॥ एक वृषभ भरिला दिव्यांबरीं ॥ मग तीं काशी मार्गें बरवियापरी ॥ क्रमितीं झालीं ॥३०॥
त्रिवेणीसी केलें माघ स्नान ॥ परी प्रति ग्रह न घेती भले ब्राह्मण ॥ मग क्रमिती पंचक्रोशीचें स्थान ॥ तीं अंत्यजें पैं ॥३१॥
उभयतां आलीं भागीरथीचे तीरीं ॥ द्दष्टीं अवलोकिली काशी पुरी ॥ स्नान करूनि गेलीं देव द्वारीं ॥ शिव नमस्कारा वया ॥३२॥
मग शिवा नमस्कारू नियां जाती गंगातीरासी ॥ द्रव्य देऊं पाहाती ब्राह्मणांसी ॥ तंव ते म्हणती वेदाध्ययनी ब्रह्म ऋषी ॥ त्या अंत्य जांसी ॥३३॥
असे काशीचे ठायीं तुमचें ठायीं तुमचें दान ॥ प्रति ग्रह घे जरी ब्राह्मण ॥ तरी त्यासी पंचक्रोशी जाण ॥ अप्राप्त होय ॥३४॥
तो ब्राह्नण योनी पावे अमंगळीं ॥ जरी दान घे तुमचें अन्यत्र स्थळीं ॥ तो चौर्‍यायशीं भोगी परी कोणे काळीं ॥ प्रायश्चित्त नाहीं ॥३५॥
ऐसें परिसोनि अंत्यजजाती ॥ मौनेंचि राहिलीं आपण चित्तीं ॥ शिव गुणांचें स्मरण निश्चित्तीं ॥ नित्य करिताती ॥३६॥
मग स्त्रियेसी म्हणे अंत्यज ॥ दान न अंगीकारी कवण द्विज ॥ कासया प्रसन्न जाहाला वृष भध्वज ॥ दिधलें बहुसाल द्र्व्य ॥३७॥
लक्ष्मी निरर्थक सर्वही ॥ कवण अंगीकरीत नाहीं ॥ ऐसे आम्ही अंत्यजजाती द्रोही ॥ जाहालों या दाना विषयीं ॥३८॥
आम्हीं ऐकिली काशीची मात ॥ जे येथें उद्धरताती अन्य जंत ॥ तरी आमुचें दान उमाकांत ॥ कां न संकल्पी द्विजांसी ॥३९॥
ऐसा त्रिमासवरी तो पुरू ॥ स्त्री आणि आपण जाहाला चिंतातुरू ॥ तंव सामवेदी एक द्विजवरू ॥ आला गंगा स्नानासी ॥४०॥
तंव तो अंत्यज देखिला ब्राह्मणें ॥ अंजळी भरो नियां सुवर्णें ॥ ब्राह्मण बोलिला प्रतिवचनें ॥ त्या अंत्यजासी ॥४१॥
बहुकाळ जाहाला तुजसी ॥ अंगीकारीन तुझिया दानासी ॥ परी तुवां प्रकट मात कवणासी ॥ न सांगावी येथें ॥४२॥
अल्प देसील तरी घेईल कवण ॥ स्वल्पास्तव कोण भोगील पतन ॥ जरी अवघेंचि करिसी समर्पण ॥ तरी देईं तत्काळ मज ॥४३॥
जंव असे रात्रीचा समय ॥ द्वयघटिका असे अरुणोदय ॥ प्रातःकाळ जंव न पावे सूर्य ॥ तंव संकल्पीं मज ॥४४॥
तंव अंत्यज म्हणे ब्राह्मणा ॥ द्र्व्य मी ठेवूं कोण्या कारणा ॥ जें आणिलें असेल मी काशी भुवना ॥ तितुकें संकल्पूं तुज ॥४५॥
मग तो अंत्यज आणि कामिनी ॥ उभयतां ठाकलीं कर जोडोनी ॥ संकल्पा घेतलें पाणी ॥ घातलें द्विजकरीं ॥४६॥
दोहींचे भार तुळिलें सुवर्ण ॥ ब्राह्मणें अंगीकारिलें तें दान ॥ कवणा न देखतां मौन ॥ घेऊनि गेला गृहासी ॥४७॥
ब्राह्मण आनंदला मनीं ॥ तंव गृहीं पुसती जाहाली ब्राह्मणी ॥ म्हणे कवण भेटला महा दानी ॥ फेडिलें आजि दुर्भिक्ष ॥४८॥
येरू म्हणे तुष्टला पंचानन ॥ तेणें पाठविला एक यजमान ॥ येरी म्हणे तो ऐसा कवण ॥ श्रुत करा मजालागीं ॥४९॥
येरू म्हणे तो अंत्यज सेतुबंधींचा ॥ कोणीचि प्रति ग्रह न घेती तयाचा ॥ तो म्यां अंगीकारिला आतां वाचा ॥ न सांगिजे कोणासी ॥५०॥
येरी म्हणे मी न बोलें प्रत्युत्तर ॥ मज करा तुम्ही भूषणें अलंकार ॥ मज नेसावया दिव्यांबर ॥ आणावें बरवें ॥५१॥
मग त्या ब्राह्मणें पुत्र आणि दुहिता ॥ तत्काळ श्रृंगारिली कांता ॥ त्यांसी भक्ष्य भोजनाची वार्ता ॥ स्वन्पींही नव्हती ॥५२॥
त्या गृहीं जाहालें सघृत भोजन ॥ द्विज बैसे चौबारां जाऊन ॥ म्हणे अमुक तो कायसा मजहून ॥ वेदाध्ययनी असे ॥५३॥
तंव ब्राह्मणीनें घट घेऊनि स्कंधीं ॥ तिनें मेळविली शेजारिणींची मांदी ॥ त्यांसी मात करीतसे भेद बुद्धी ॥ गेल्या उदकासी ॥५४॥
ऐसें क्रमिले पंचदश अर्क ॥ तंव जनांसी मात जाहाली ठाऊक ॥ मग उघडचि बोलती लोक ॥ त्या ब्राह्मणासी पैं ॥५५॥
म्हणती अधर्माचा प्रति ग्रह ॥ या ब्राह्मणें केला संग्रह ॥ आतां प्रायश्चित्तें शुद्ध करील देह ॥ कैसा ब्राह्मण ॥५६॥
तंव श्रुत जाहालें वेदाध्ययनिकां ॥ महा षट्‍कर्मी याग कारिकां ॥ म्हणती भ्रष्टविलें वेदश्लोकां ॥ अंत्यजजाति स्पर्शें ॥५७॥
त्या वेदव्याख्यानी ब्राह्मणीं केला पण ॥ जाति भ्रष्ट केला तो ब्राह्मण ॥ मग तो लज्जावंत होऊन ॥ गृहासी गेला ॥५८॥
गंगा तीरीं घट फोडिला ब्राह्मणीं त्याचा ॥ म्हणे येथें कूप असे अन्यजा तीचा ॥ तोचि रे यजमान तुमचा ॥ दरिद्र भंजन ॥५९॥
ऐसा ज्ञाति भ्रष्ट केला त्या ब्राह्मणासी ॥ तंव दिन अस्त जाहाला प्रवर्तली निशी ॥ ब्राह्मण विचारी कुटुंबिनीसी ॥ प्रति ग्रही तो ॥६०॥
कैसें द्रव्य जोडिलें आपणांसी ॥ सुखें राहूं न देती वाराण शीसी ॥ द्रव्यलो भोचिया वळसीं ॥ विपत्ती मांडली आम्हां ॥६१॥
नातरी जैसा महार्णव क्षीर भारें ॥ कोटरीं सुखें असतां पांखरें ॥ कैंचा क्रूर तरूवरी संचरे ॥ त्यांसी पीडा करा वया ॥६२॥
मृगे शाचा आहार देखोनी ॥ द्वेषें जंबुक विटती मनीं ॥ जैसा पौर्णिमेचा चंद्र देखोनि मनीं ॥ निंदिती निशाचर ॥६३॥
कीं सरोबरीं क्रीडतां राजहंस ॥ तें सुख देखों न शकती वायस ॥ कीं मिष्टान्न देखोनि पितृग्रास ॥ भक्षूं पाहाती जैसे ॥६४॥
हे वाराण सीचे ब्राह्मण महा द्वेषी ॥ क्रूरद्दष्टीं पाहाती आपणांसी ॥ जैसा मूषक सांपडे विखारासी ॥ तो प्राणें स्वस्थ कैंचा ॥६५॥
आतां विचारावें एकादें स्थान ॥ जेथें आपणासी द्र्व्य हें होय जीर्ण ॥ येर्‍हवीं या काशीचे ब्राह्मण ॥ दुष्ट गृह जैसे ॥६६॥
तरी कांते विलंब न करी आतां ॥ सूर्योदय न करीं आपणांसी जातां ॥ पुत्र कलत्रेंसीं निघता ॥ जाहाला तो ब्राह्मण ॥६७॥
तेणें द्र्व्याचे विभाग केले ॥ सून पुत्रां पाशीं दोन दिधले ॥ आपण दोन अंगीकारिले ॥ स्त्री पुरुषीं ॥६८॥
निशी क्रमोनि तृतीय प्रहरीं ॥ तो ब्राह्मण अव्हेरी काशी पुरी ॥ कीं त्यासी विमुख जाहाला त्रिपुरारी ॥ अप्राप्त केली काशी ॥६९॥
कीं भोजनीं टाकिजे हरळ ॥ कीं वस्त्रासी लांछीत जैसा मळ ॥ तो काशी बाहेरी काढिला विटाळ ॥ शिवा चिये दूती ॥७०॥
चंद नाचिया वृक्षी ॥ केवी तो कुठार वाय सपक्षी ॥ दिव्य रत्नमण्यांचा सुलक्षीं ॥ केवीं तो लोहतंतु ॥७१॥
तैसा तो अंत्यजज्ञा तीचा प्रति ग्रही ॥ काशी बाहेरी घातला महा द्रोही ॥ पुत्रक कलत्रेंसीं सर्वही ॥ निघाली दक्षिण मार्गें ॥७२॥
खांदियावरी वाहोनि द्रव्य भार ॥ अरण्य दुर्घट लागलें थोर ॥ तंव तेथें अकस्मात तस्कर ॥ उठावले तये वनीं ॥७३॥
ब्राह्मण धरिला त्या निशाचरीं ॥ चौघें नेलीं त्या गिरिकंदरीं ॥ सर्वही द्र्व्य हरिलें चोरी ॥ चौघां केला घात शस्त्रें ॥७४॥
म्हणोनि अंत्यजजा तीचें दान । जो अंगीकारी भला बाह्मण ॥ तयासी या वेदीं पुराणीं पतन ॥ बोलिलें आहे ॥७५॥
पुढें कैसें वर्वलें आतां ॥ एकाग्र परिसा जी श्रोतां ॥ दुष्ट दानाचा प्रति ग्रह घेतां ॥ मृत्यु जाहाला चोघांतें ॥७६॥
द्रव्यास्तव जाहाले प्राणघात ॥ तंव तेथें आले यमदूत ॥ त्यांनीं कृतांतासी जाणविली मात ॥ म्हणती परिसा स्वामिया ॥७७॥
अंत्यजजीताचा दान प्रति ग्रह ॥ केला षट्‍ कर्मिकें संग्रह ॥ काशी माजीं असोनि तो देह ॥ भ्रष्टविला तेणें ॥७८॥
कृतांत म्हणे गा किंकरा परियेसीं ॥ क्षणमात्र न लागतां आणावा दोषी ॥ दोषदंड करूनि गुणेंसीं ॥ पूजन आम्हां ॥७९॥
तंव यमगण धांविन्नले वेगें ॥ लिंग शरीरें बांधिलीं चतुर्वगें ॥ आणिलीं यमपुरी चिया मार्गें ॥ कृतांता जवळी ॥८०॥
भद्रासनीं बैसला धर्मराज ॥ जो चतुर्द शकोटि सैन्यध्वज ॥ तो सर्वज्ञ मार्तंडाचा आत्मज ॥ पाचारी चित्र गुप्त ॥८१॥
मग ते चतुर्विध खाणींचे लेखक ॥ शब्दाधार आणि पुण्य श्लोक ॥ त्यांहीं नमस्कारिला सभानायक ॥ धर्मराज तो ॥८२॥
मग तो धर्म पुसे चित्र गुप्तासी ॥ म्हणती आणा ते कवण कैसा दोषी ॥ यमगणीं उभे केले सभेसी ॥ त्या चौघांजणां पैं ॥८३॥
तंव चित्र गुप्त म्हणे कृतांता ॥ हा बाह्मण आणि याची कांता ॥ पुत्र आणि सून यांतें आतां ॥ बाधला संसर्ग ॥८४॥
येणें अंगीकारिलें अधर्माचें दान ॥ हा पुण्य शील परी हेंचि लांछन ॥ जे पंचक्रोशी मुक्ति स्थान ॥ तेथींचा निवासी हा ॥८५॥
तेथें भवानी शिव भुक्ति मुक्तिदाता ॥ तीं यानें अव्हेरिलीं न स्मरतां ॥ तेथें जो राहे आपुलिया मता ॥ तो घालिती बाहेरी ॥८६॥
यानें वेद मुख्यांचा अव्हेर केला ॥ आणि चित्त सरितेसी प्रवाहला ॥ मग कल्पनेच्या डोहीं बुडाला ॥ पडिला दोष भोंवरीं ॥८७॥
म्हणोनि अप्राप्त झाली वाराणसी ॥ आतां एकचि जन्म दीजे यासी ॥ हीं कुक्कुट होतील कीकट देशीं ॥ चौघेंही जण ॥८८॥
मग तीं कीकट देशीं क्रौंचनामीं ॥ कुक्कुट जन्मीं घातलीं चारी ॥ स्वामी म्हणे गा हे कथा पुढारी ॥ वर्तली ऐकें अगस्ती ॥८९॥
ऐसे ते कुक्कुट जन्मीं वर्ततां ॥ त्या क्रौंच नाम नगरीं असतां ॥ तंव पूर्व पंथीं ते कापडी जातां ॥ देखिले तिंहीं ॥९०॥
महा पुण्य शील देखिले कापडी द्दष्टीं ॥ त्यां चिया संगतीं लागली कुक्कुटी ॥ अगस्ति म्हणे स्वामी क्षितितटीं ॥ महा आश्चर्य वर्तलें ॥९१॥
जेथें कापडियां होय विश्रांती ॥ ते स्थळीं तीं कुक्कुटे तीं कुक्कुटे बैसती ॥ कापडी तयां भक्षा वया घालिती ॥ किंचित धान्य ॥९२॥
ते कापडी आले वारणसीं ॥ त्यांहीं प्रयत्नें आणिलें कुक्कुटांसी ॥ मुक्त मंडपीं आणोनि सोडिलें त्यांसी ॥ कापडि यांनीं ॥९३॥
मग तेथें पूज्य पूजन ॥ शिव शास्त्रें होती श्रवण ॥ क्षुधेसी भक्ष्य अन्न जीवन ॥ देवपूजेचें त्यांसी ॥९४॥
विश्वनाथाचे सन्मुख ॥ कुक्कुट बैसती एक मुख ॥ ऐसे एक संवत्सर विशेष ॥ क्रमिलें त्यांही ॥९५॥
शिव शास्त्रें श्रवण झाली रात्रंदिन ॥ नित्य शिवाचे द्दष्टीं आसन ॥ म्हणोनि शिव त्यांसी जाहाला प्रसन्न ॥ पूर्व र्जितास्तव ॥९६॥
तंव अकस्मात कैलासींच्या वाटा ॥ विमानें उतरलीं क्षितितटा ॥ दीर्घ ध्वनीं दिव्य घंटा ॥ त्या मुक्त मंडपीं ॥९७॥
वाद्य ध्वनींचा होतसे घोका ॥ गायनें नृत्यें करिती नायिका ॥ हेमदंड गोदंडी चंपिका ॥ महा सुंदर ॥९८॥
ऐसी उतरली भूमंडळी ॥ शिवा लयी मुक्ति मंडपी आली ॥ गणांसी आज्ञा करी चंद्र मौळी ॥ कर्पूर गौर तो ॥९९॥
मग काय केलें तेथें शिव गणीं ॥ कुक्कुट चारी घातले विमानीं ॥ मग ती नेलीं कैलास भुवनीं ॥ निमिषमात्रें ॥१००॥
जैसा मुक्त मण्यांचा वरुणालय ॥ कीं शिव पूजा अधिक करी जय ॥ तैसा वेद शास्त्रांचा महा लय ॥ मुक्त मंडप तो ॥१०१॥
त्याचेनि अधिकारें कैलासी ॥ मुक्ति प्राप्त होय कुक्कुटांसी ॥ तेंचि गुण नाम होईल मंडपासी ॥ कुक्क्ट मंडप ऐसें ॥१०२॥
मग त्या मंडपासी वर झाला ॥ तो मज अकथ्य वर्णा वयाला ॥ आतां अगस्ति प्रश्न करिता झाला ॥ तो परिसा श्रोते हो ॥१०३॥
अगस्ति प्रार्थी स्वामीसी ॥ ते कुक्कुट कां आले वाराणसी ॥ तेणेंचि वेषें आम्हांसी काशी ॥ कां प्राप्त नव्हे ॥१०४॥
तंव स्वामी म्हणे गा महा ऋषी ॥ पूर्वीं ते होते काशी वासी ॥ म्हणोनि अन्यत्र स्थळीं शिव त्यांसी ॥ राहों नेदी सर्वथा ॥१०५॥
पूर्वीं जयासी वास जाहाला काशी पुरीं ॥ दिन एक संवत्सर तरी ॥ त्यांसी जन्मां तरीं त्रिपुरारी ॥ राहों नेदी अन्यत्र स्थळीं ॥१०६॥
काशी करूनि वसे आपुले देशीं ॥ द्वय जन्म मृत्यु होय स्वदेशीं ॥ तरी तृतीय जन्मीं वाराणसी ॥ प्राप्त करील शिव ॥१०७॥
तिसरे जन्मीं होय काशी निवासी ॥ मग मृत्यु अंती मुक्ति तयासी ॥ परी काशी यात्रेचें सामर्थ्य विलयासी ॥ न जाय कल्पांती ॥१०८॥
शिवाची आज्ञा होती कुक्कुटांसी ॥ म्हणोनि ती आलीं अविमुक्तीसी ॥ शिव आज्ञेविण प्राप्त नव्हे काशी ॥ ब्रह्म इंद्र पुरुषोत्तमां ॥१०९॥
स्वामी म्हणे गा ऋषी सागरारी ॥ हे कथा भविष्य पुराणांतरीं ॥ शिव वाक्य प्रवर्तलें पुढारी ॥ तें द्दश्य होईल तुज ॥११०॥
तंव अगस्ति वदे जी शिव सुता ॥ तुम्ही कथा मार्ग केला मुक्ता ॥ तरी प्रश्नितां शंका न बाधी आतां ॥ झालों असें धीट मी ॥१११॥
काशी मध्यें पंच गंगा संगम ॥ उत्तर मानसीं ॥ असे उत्तम ॥ बिंदु माधव पुरुषोत्तम ॥ जाहाला तेथें ॥११२॥
प्रथम ते किरणा सूर्य कुमरी ॥ धूपपापा नामें ते दुसरी ॥ गंगा यमुना पांचवी ते सुंदरी ॥ सरस्वती जे ॥११३॥
धूता पापा नाम जियेचें ॥ काशीच्या ठायीं दीर्घ सामर्थ्य तियेचें ॥ तरी मज निरूपा मूळ याचें ॥ आदि अंत जें ॥११४॥
स्वामी म्हणे गा अगस्ति मुनी ॥ ते परिसा धूतपापा काशी स्थानीं ॥ तियेचें मूळ तुझ्या श्रवणीं ॥ करूं निरूपण ॥११५॥
सुशीळ नामें होता ऋषीश्वर ॥ भृगुवं शींचा महा तपेश्वर ॥ आनंदव नाच्या ठायीं नित्या चार ॥ वर्तत होता ॥११६॥
अप्सरा लोकींहूनि देवांगना ॥ आलिया विश्वनाथा चिया दर्शना ॥ त्यांहीं देखिलें त्या ब्राह्मणा ॥ सुशीलासी पैं ॥११७॥
देवांगनांम मध्यें महा लावन्य पूर्ण ॥ उर्वशी देखिली त्या ऋषीनें ॥ विध्वंसिलें त्याचें अनुष्ठान ॥ सौंदर्यानें तियेच्या ॥११८॥
वीर्य द्रवला तो मुनिवर ॥ तपें तापला अति क्रूर ॥ मग तो उर्वशीसी ऋषीश्वर ॥ करी प्रत्युत्तर ते समयीं ॥११९॥
म्हणे सुंदर लावण्य तुझें ॥ तेणें तप विना शिलें माझें ॥ पडलें तुझिया मोहनाचें ओझें ॥ वेंचिली तप सामग्री ॥१२०॥
आतां माझें वीर्य हें भूमंडळी ॥ येथे पडूं नये क्षितितळीं ॥ हें तुवां अंगी कारावें तत्काळी ॥ नाही तरी पावसी खेद ॥१२१॥
तंव भय भीत झाली उर्वशी ॥ हा मज शाप देईल ऋषी ॥ हा नाश करील माझिया लावण्यासी ॥ मग होईल संकट ॥१२२॥
मग अंगीकार केला त्या वीर्याचा ॥ तिनें गर्म धरिला त्या ऋषीचा ॥ नव मास पर्यंत शुभ वाचा ॥ राहिली त्या ऋषी पासीं ॥१२३॥
येरी देवां गनांनीं गंगा स्नानें ॥ सारिलीं शिवाचीं पूजनें ॥ मग क्रमितीं जाहालीं विमानें ॥ अप्सरा लोकासी ॥१२४॥
मग ते महा लावण्य उर्वशी ॥ प्रसूत झाली नववे मासी ॥ तंव कन्यारत्न झालें तियेसी ॥ आनंदला ऋषिश्वर ॥१२५॥
ते ऋषि वीर्याची कन्या सुंदरा ॥ उर्वशी समर्पी त्या मुनिवरा ॥ मग ते क्रमिती झाली अप्सरा ॥ आपुल्या स्थाना ॥१२६॥
मग त्या कन्येचें पालन ॥ सप्तवरुषें केलें त्या ऋषीनें ॥ कन्येसी केलें नाम वारण ॥ धूतपापा ऐसें ॥१२७॥
मग ती कन्या जाहाली उपवर ॥ तेव्हां तिजला प्रश्न करी ऋषी श्वर ॥ म्हणे तुझें करूं स्वयंवर ॥ तरी सांग मनो भाव तुझा ॥१२८॥
मग वदती झाली धूतपापा ॥ म्हणे परियेसी गा पितया महा तपा ॥ मी कल्पी तसें जया साक्षेपा ॥ तें श्रुत करूं तुज ॥१२९॥
चहूं खाणींचे जे जीवजंत ॥ त्यांसी तरी उत्पत्ति प्रलय होत ॥ त्यांहूनि श्रेष्ठ असेल अमृत ॥ या त्रैलोक्य मंडळी ॥१३०॥
या सकळ जीवांसी सत्ता जयाची ॥ निमित्त जाणतसे सर्व जंतूंची ॥ पित्या मी कांता होईन त्याची ॥ हा संकल्प माझा असे ॥१३१॥
तरी ऐसा जो समर्थ कोणी ॥ विचारूनि पाहें त्रिभुवनीं ॥ ऐसाचि वर सुलक्षणी ॥ वरिजे मज ॥१३२॥
तंव कन्येसी बोलला सुशीळ मुनी ॥ बरवा साक्षेप इच्छिला मनीं ॥ म्हणे तरी पूर्ण धर्म गुणी ॥ यमराव तो ॥१३३॥
तरी कन्ये त्रिलोकींचे जे जंत ॥ नर मानवादि देव समस्त ॥ त्या सकळां दीडांकित ॥ यमराव तो पैं ॥१३४॥
यास्त कीजे तपा साधना ॥ भक्तीं संतोषा विजे पंचानना ॥ तेणें पाविजे त्या सूर्य नंदना ॥ धर्म राजासी ॥१३५॥
मग कन्या पितृ आज्ञा वंदुनी ॥ तप साधना बैसली अनुष्ठानीं ॥ तिनें अराधिला शूल पाणी ॥ शत संवत्सर ॥१३६॥
तंव शिवाज्ञा झाली ब्रह्म यासी ॥ विधि आला ऋषि कन्येपासी ॥ म्हणे इच्छावर दिधला तुजसी ॥ शिवा ज्ञेनें तप स्विनी ॥१३७॥
ऐसा वर देऊनि गेला ब्रह्मा ॥ मग ते कल्पिती झाली धर्मा ॥ तंव हे मात सुचली आगमा ॥ नारद मुनीसी ॥१३८॥
तो यमपुरा झाला निघता ॥ वृत्तांत जाण विला कृतांता ॥ म्हंणे जे सुशीळ ऋषीची दुहिता ॥ तपीं बैसली धर्मा तुजलागीं ॥१३९॥
शत वरुषें साधिलें अनुष्ठान ॥ नित्य ह्रदयीं तुमचेंचि स्मरण ॥ तियेसी ब्रह्मा जाहलासे पसन्न ॥ आज्ञा शिवाची पैं ॥१४०॥
तिनें मागी तला इच्छावर ॥ मग तथास्तु म्हणे सृष्टिकर ॥ म्हणे धर्मा ऐसा दिधला वर ॥ ऋषि कन्येसी पैं ॥१४१॥
नारदें जान वितां ऐसी मात ॥ तंव धर्म झाला कामें दुश्चित्त ॥ वेळो वेळां प्रश्न ब्रह्म सुता प्रत ॥ ऋषि कन्येचा पैं ॥१४२॥
धर्म म्हणे नारद मुनी ॥ अति सुंदर सगुण ते कामिनी ॥ बैसली माझा संकल्प धरोनी ॥ ते कैसी असेल ॥१४३॥
ऐसें धर्मरायाचें वचन ॥ अति उत्कंठित झालें मन ॥ कैसे तियेचे रूप गुण ॥ तें सांगतसे नारद ॥१४४॥
त्रैलोक्य लावण्य तें उर्वशीचें ॥ वीर्य तें सुशींळ ऋषीचें ॥ या दोहींच्या संभोगीं शरीर तियेचें ॥ निपजलें धर्मा ॥१४५॥
ते दिव्य कन्या सुकुमार सगुण ॥ तपे झालीसे अति संकीर्ण ॥ आतां जाईं मनोरथ करीं पूर्ण ॥ तया कामिनीचा ॥१४६॥
ऐसें अनुवादला ब्रह्म कुमर ॥ तंव यम जाहालासे कामातुर ॥ सर्व राज्याचा करूनि अव्हेर ॥ आला आनंदवना ॥१४७॥
जेथें अनुष्ठानीं असे ऋषी आत्मजा ॥ तेथें कामातुर आला धर्मराजा ॥ सुंदरी देखिली दिव्यतेजा ॥ ते महा सत्त्वाधिकारी ॥१४८॥
मग धर्म तियेसी बोले वचन ॥ म्हणे तुझें तप झालें संपूर्ण ॥ आम्हांसी सांगीतलें विरिंचीन ॥ जे तूं माझी कांता ॥१४९॥
तंव ते वर देखोनि सुंदरी ॥ लज्जावंत ठाके पाठिमोरी मग धर्मासी प्रत्युत्तर करी ॥ ऋषि कन्या ते ॥१५०॥
म्हणे तथास्तु आलासी वर ॥ तरी गुंफेसी असे माझा पितर ॥ तेथें जाऊनि कीजे विचार ॥ स्वयंवराचा पैं ॥१५१॥
येरू म्हणे गुंफेसी काय काज ॥ जे समद्दष्टी जाहाली तुज मज ॥ तेचि सुमुहूर्त सिद्धी सहज ॥ साध्य जाहाली ॥१५२॥
जेथें दंपतींची प्रीति उभयतां ॥ तेथें कायसी पितृ आज्ञेची योग्यता ॥ प्रिया पुरुषांची एकान्त जाण वार्ता ॥ वृथाचि काय ॥१५३॥
तंव वदली ते ऋषि कुमरी ॥ हें बोलणे अयुक्त पुराणां तरी ॥ जे वेदाज्ञेनें वर्तताती पूर्वा पारीं ॥ तोचि स्वधर्म ॥१५४॥
हेचि तुमचें नाम जें धर्म ॥ आणि तुम्ही केवीं योजितां अधर्म ॥ हें मनोमर्कट यासी पूर्वा गम ॥ न सुचे सर्वथा ॥१५५॥
तुम्ही बोलतां जी कामातुर ॥ परी हे महिमता नव्हे सार ॥ तरी पितृकरीं जेव्हां घडे स्वयंवर ॥ तेणें शुद्ध ऐहिकपरत्रीं ॥१५६॥
पित्यासी घडे कन्या दानाचा अधिकार ॥ सर्व गोत्र जांसी आनंद थोर ॥ पूर्व जांसी होय अप्रतिम आदर ॥ अत्यंत स्वर्गीं ॥१५७॥
अहो शिवें निरू पिलें गौरी ॥ त्रय आनंद दुर्लभ संसारीं ॥ तरी ते वेदाज्ञा त्रिलोकी माझारी ॥ कवण कवण ॥१५८॥
अहो जैं होतसे आपुलें स्वयंवर ॥ तैं पंच दिन महा आनंद थोर ॥ ऐसी ते वेदाज्ञा त्रैलोक्य समग्र ॥ न भासे कांहीं ॥१५९॥
आणिक सत्पुत्र होय संसारीं ॥ तो एक आनंद त्रैलोक्य भरी ॥ आणिक पुत्रासी पुत्र होय तरी ॥ विशेष चतुर्गुण ॥१६०॥
तरी प्रहरोनि ऐसा आनंद जय ॥ सर्वथा न कीजे महात्त्वाचा क्षय ॥ पितृ आज्ञा घेऊ नियां हा समय ॥ लग्न मुहूर्ताचा ॥१६१॥
येर्‍हवीं स्वयंवरा विण भोग विलास ॥ येणें उभय कुळीं लांछन विशेष ॥ शरीर स्वस्थ असतां पतन प्रयास ॥ कवणें भोगावे ॥१६२॥
तुम्हां वांचूनि मज आणिक नाहीं वर ॥ तरी धर्मासी कां कीजे अव्हेर ॥ स्वधर्म सांडी तो दोषिया नर ॥ भोगी रौख ॥१६३॥
यानंतर बोले यमराव ॥ म्हणे हा भार्ये न करीं संदेह ॥ रौरव भोग विता मीचि भाव ॥ न धरीं मानसीं ॥१६४॥
मीचि महा दोषांचा दंडकर्ता ॥ मीचि पुण्य फळासी भोगा विता ॥ मजवांचूनि त्रैलोक्य जंतां ॥ नाहीं उत्पत्ति प्रलय ॥१६५॥
मग ऋषि कन्या वदे धर्मासी ॥ जरी त्रैलोक्य भविष्य भासे तुम्हांसी ॥ परी हे विश्वं भराची काशी ॥ अगम्य तुम्हां ॥१६६॥
काशी मध्य़ें घडे दोषलां छन ॥ अथवा पुण्य सुकृत दान ॥ तें शिवचि जाणे परी कवणा आधीन ॥ नाहीं हे काशी ॥१६७॥
काशी मध्यें असावें पुण्य स्वार्था ॥ जरी कल्पिजे अनृत वृत्ति स्वमतां ॥ तरी प्राप्त होय महा व्यथा ॥ शिव गणां चिया हस्तें ॥१६८॥
ऐसी धर्मा प्रति बोधी ते सुंदरा ॥ परी शुद्धि नसे त्या कामा तुरा ॥ निर्मर्त्सना करी तिचिया प्रत्युत्तर ॥ कामार्थी तो ॥१६९॥
बलात्कारें म्हणे स्पर्श करीन ॥ येरी म्हणे नव्हे वेदाज्ञे विण ॥ तंव तो बोलिला शापदान ॥ ॠषि कन्ये प्रती ॥१७०॥
स्वामि आज्ञा मानिती ज्या स्त्रिया समर्थ ॥ स्वामीचे पूर्ण करिती मनोरथ ॥ त्या शुभांगनांसी वंदिती प्रथम ॥ अमरा दिक जे ॥१७१॥
तुवां तप हें साधिलें संपूर्ण ॥ तुज देव जाहालेती प्रसन्न ॥ तूं नव्हेसी जरी स्वामि शब्दा आधीन ॥ तरी घे तूं शाप माझा ॥१७२॥
म्हणे तूं होशील या कर्में शिळा ॥ तंव बोलती जाहाली ऋषीची बाळा ॥ म्हणे रे कामा तुरा अमंगळा ॥ शाप घेईं तूं माझा ॥१७३॥
दोषें विण शापिलें मजसी ॥ तरी तूंही ये स्थानीं निंद्य होसी ॥ मग तो धर्मराव यम पुरीसी ॥ क्रमिता जाहाला ॥१७४॥
तंव अनुष्ठान सारूनि ऋषी ॥ तो सुशीळ आला गुंफेसी ॥ तंव तेणें कन्या देखिली बीभत्सी ॥  उद्भेग वृत्ति ॥१७५॥
पित्यानें प्रश्नितांचि दुहिता ॥ निरू पिती जाहाली धर्माची वार्ता ॥ म्हणे येणें जाहालें कृतांता ॥ आपुलिये गुंफेसी ॥१७६॥
मी राहिलें वेदाज्ञे आधीन ॥ तो म्हणे कायसें मुहूर्त लग्न ॥ पितया तो वदला शापदान ॥ जे तूं शिळा होसी ॥१७७॥
हें परिसोनि कन्येचें उत्तर ॥ खेद पावला ऋषीश्वर ॥ म्हणे कां पां न करीचि स्वयवर ॥ सत्वार्थी धर्मराजा ॥१७८॥
जरी तयासी कक्पिजे अनर्थ ॥ तरी विधि आज्ञेचा असे पुरुषार्थ ॥ आणि कन्ये चाही मनोरथ ॥ जे कृतांत स्वाती ॥१७९॥
म्हणोनि कन्ये तेही धर्म सगुण ॥ परी तुवां दिधलें शापदान ॥ आतां अनर्थ तो निष्कारण ॥ नकी सर्वथा ॥१८०॥
आतां भंजन तुझिया शापासी ॥ वेंचीन जे तप सामग्री सरसी ॥ तूं शिळा होसी अहर्निशीं ॥ सोमकांत जे ॥१८१॥
मग त्या ऋषीनें ते बाळा ॥ ठेविली मंगळा गौरी जवळा ॥ ते वनीं होऊनि ठेली शिळा ॥ सोमकांत जे ॥१८२॥
त्या मंगळा गौरीच्या सख्या साजणी ॥ मतृका असती अष्टजणी ॥ त्यां मध्यें ते धूतपापा नंदिनी ॥ मेळविली ऋषीची ॥१८३॥
केलीं स्थावर जंगम दोनी रूपें ॥ सोमकांत सरिता स्वरूपें ॥ ऐसी त्या धर्मा चिया शापें ॥ प्राप्त झाली काशी ॥१८४॥
ऐसी ते शिळा होऊनि असतां ॥ व्योमीं चंद्र भासला संपूर्णता ॥ तें रूप देखोनि पूर्ण मन्मथा ॥ स्त्रवली जीवना ॥१८५॥
जे धर्मराज स्वामी व्हावया ॥ ऐसी कल्पित होती कुमारिया ॥ यास्तव चंद्र दर्शनें वीर्या ॥ स्त्रवती झाली जीवना ॥१८६॥
स्वामी म्हणे गा ऋषी तपोबळा ॥ ऐसी ते जाहाली सोमकांत शिळा ॥ मग ते चंद्र दर्शनें अबळा ॥ जळ स्त्रवली ॥१८७॥
तें जळ प्रवाहलें क्षितीसी ॥ मग ते धूतपापा नामें झाली ऐसी ॥ बिंदु माधवा समीप जन उद्ध्राव यासी ॥ आली ते गंगा ॥१८८॥
जेथें असे पंच गंगा संगम ॥ तेथें नंदी तीर्थ झाला तो धर्म ॥ तेथील स्नान इच्छितो पुरुषोत्तम ॥ ब्रह्मा दिकेंसी ॥१८९॥
मग तेथें जीं जीं तीर्थें असती ॥ तीं तीं मुक्ति दायक मी सांगों किती ॥ तेथींच्या स्नानदानें उद्धरती ॥ सप्तगोत्र पूर्वत्र ॥१९०॥
तुवां प्रश्निलें गा ऋषि महा तपा ॥ जे शाप दग्ध झाली धूतपापा ॥ मी तोषलों रे तुझिया साक्षेपा ॥ महा प्रश्चिका ॥१९१॥
शिव दास गोमा म्हणे श्रोतां ॥ मज न भासे स्वकृत्याची योग्यता ॥ अगस्ति प्रश्नील जें आतां ॥ तें क्षमावंतीं परिसावें ॥१९२॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे मुक्तमंडप धूतपापामाहात्म्यवर्णनं नाम षट्‍सप्ततितमाध्यायः ॥७६॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु  ॥

॥ इति षट्‍सप्ततितमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP