मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ७९ वा

काशीखंड - अध्याय ७९ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ मग विमान क्रमितां गननोदरीं ॥ नैऋत लोक देखिला पुढारी ॥ तंव तो शिव शर्मा प्रश्न करी ॥ विष्णु गणांसी ॥१॥
तंव गण सांगती शुभ वाचा ॥ हा नैऋत अधिपति राक्ष सांचा ॥ हा पूर्वन्जमीं पालीनगरीचा ॥ होता राज्य धर ॥२॥
विंध्याद्रीचे पाठारीं जाण ॥ तेणें काशी करकाजीं वेंचिला ग्राण ॥ तैं पिंगाक्ष ऐसें होतें नाम धारण ॥ जातीचा कोळी पैं ॥३॥
मग प्रसन्न जाहाला शंकर ॥ केला नैऋति दिशेचा राज्य धर ॥ अक्षयगती दिधला नाभी कार ॥ दिक्पतीं मध्यें ॥४॥
तरी याचें आदि अवसान ॥ तुज समूळ केलें निरूपण ॥ तंव पुढें क्रमितां विमान ॥ देखिला वरुण लोक ॥५॥
तो चतुर्दश कोटि सेनेसीं ॥ परिघ करीतसे पृथ्वीसी । विरिंचिनाथा चिया सृष्टीसी ॥ होतसे वृद्धी ॥६॥
तो कर्दम ऋषीचा कुमर ॥ त्यासी प्रसन्न जाहाला काशी श्वर ॥ मग तो केला राज्य धर ॥ सर्व जळचरांचा ॥७॥
त्या वरुणाची कथा सविस्तर ॥ तुज निरूपिली पूर्वापार ॥ त्यासी प्राप्त केला गिरिवर ॥ गंधाद्रि पश्चिमेचा ॥८॥
ऐसा तो कर्दमाचा कुमर ॥ शिवें स्थापिला तैं भक्तवर ॥ पृथ्वी जनांसी दीर्ध उपकार ॥ करीतसे वृष्टि महा दीर्घ ॥९॥
विमान चाले जंव गगनोदरीं ॥ तंव पुढें देखिली रुद्र पुरी ॥ मग शिव शर्मा प्रश्न करी ॥ विष्णु गणां प्रती ॥१०॥
गण म्हणती गा द्विज मूर्ती ॥ येथें एकादश रुद्र असती ॥ यांसी प्रसन्न झाला पशु पती ॥ दिधली हे रुद्र् पुरी ॥११॥
यांहीं तप काशी मध्यें साधिलें पशुपती चिया प्रसाद बळें ॥ सर्व सिद्धींचें साधन केलें ॥ जो गणा धिपती भक्त वत्सल ॥१२॥
तरी आदि अवसान  मूळ ॥ तुज निरूपिलें सकळ ॥ यासी राज्य प्राप्त झालें अढळ ॥ ईशानी दिशेचें पैं ॥१३॥
निरूपिला अलका पुरीचा कुबेर ॥ तो पूर्व जन्मींचा जुगारी तस्कर ॥ काशी स्थळीं प्रसन्न केला काशी श्वर ॥ पावला हें पद ॥१४॥
ऐसा तो कुबेर शिव व्रती ॥ तो अलका पुरीचा अधिपती ॥ जेथ अष्ट सिद्धी नव विधी ओळंगती ॥ तो भांडारी शिवाचा ॥१५॥
तो पूर्व जन्मीं अग्नि दत्ताचा कुमरू ॥ शिवा लयीं प्रवर्तला नैवेद्य चोरूं ॥ त्यासी प्रसन्न झाला त्रिशू लधरू ॥ दिधलें अमित वरां ॥१६॥
मग तो विश्ववा ब्राह्मण ॥ तो पुल स्त्याचा नंदन ॥ महा तपस्वी तपें संपूर्ण ॥ महा ऋषीं मध्यें ॥१७॥
त्या पासूनि जन्मला कुबेर ॥ केला कलिंग देशींचा राज्य धर ॥ पुनरपि प्रसन्न झाला शंकर ॥ मग केला भांडरी ॥१८॥
गण म्हणती शिव शर्म्यासी ॥ ऐसा कुबेर अलका निवासी ॥ याचें आदि अवसान तें तुजसी ॥ निरूपिलें सविस्तर ॥१९॥
मग विमान जातसे गगनोदरीं ॥ तंव चंद्र लोक देखिला पुढारीं ॥ शिव शर्मा गणांसी प्रश्न करी ॥ मग सांगती गण ॥२०॥
या लोकींचा अधिपती शीत कर ॥ तेणें काशी स्थानीं पूजिला हर ॥ शतपद्में अनुष्ठान अध्वर ॥ केला त्या मृगांकें ॥२१॥
तो अत्रिऋषीचा कुमर ॥ यागीं तृप्त केला देववर ॥ मग प्रसन्न झाला जी शंकर ॥ धरिला मस्तकीं ॥२२॥
त्याची आदि अवसान मूळ कथा ॥ तुज कथिली गा द्विजनाथा ॥ जेणें पराभवे महा ताप व्यथा ॥ श्रोत यांची ॥२३॥
मग पुढें क्रमितां विमान ॥ तंव बुध लोक देखिला जाण ॥ शिव शर्म्यासी सांगती गण ॥ बुधाची कथा ॥२४॥
अरे तो अत्रि सुत शीत कर ॥ तेणें गुरु कांतेसीं केला व्यभिचार ॥ तो हा जन्मला क्षेत्री कुमर ॥ चंद्र गुरु कांतेचा ॥२५॥
यानें तप केलें काशी स्थळीं ॥ मग प्रसन्न जाहाला चंद्र मौळी ॥ तो हा स्थापिला या लोक मंडळीं ॥ महा देवें पैं ॥२६॥
तों विमान पुढें जातां शिव शर्मा ॥ तो प्रश्न करी गणोत्तमां ॥ म्हणे करा कृपानिधी क्षमा ॥ पुढें हा कवण लोक ॥२७॥
गण म्हणती गा द्विजा अवधारीं ॥ दक्ष राजा चिया साठ कुमरी ॥ त्यांहीं तप साधिलें काशी पुरीं ॥ स्थापिलीं महा लिंगें ॥२८॥
त्यांहीं आराधिला शशि मौळा ॥ शिव प्रसन्न जाहाला तयां अबलां ॥ मग व्योमीं स्थापिल्या नक्षत्र माला ॥ तो हा नक्षत्र लोक ॥२९॥
महा उग्र त्यांची तप साधना ॥ मग पुरुषा ऐसी केली नाम धारणा ॥ त्यांनीं संतुष्ट करोनि पंचानना ॥ पावल्या हा लोक ॥३०॥
मग विमान चाले शीघ्रगतीं ॥ तंव शुक्र लोक देखिला पुढती ॥ शिव शर्मा पुसे गणां प्रती ॥ सांगा जी हा कोण लोक ॥३१॥
गण सांगती शुद्ध ब्राह्मणा ॥ या लोकीं शुक्र अधिपति जाणा ॥ याची मूळ कथा महा सुजाणा ॥ परियेसीं गा द्विजा ॥३२॥
तो शुक्र भृगुचा नंदन ॥ तेणें प्रसन्न केला पंचानन ॥ त्यासी वर दिधला परिपूर्ण ॥ केला दैत्यु गुरु हा ॥३३॥
पुढें विमान जंव वेगेंसीं चाले ॥ तंव तेणें मंगळ लोकातें देखिलें ॥ तें शिव शर्म्यासी कथिर्लें ॥ सविस्तर कैसें ॥३४॥
हा महा देवाचा वीर्य गोळ ॥ पृथ्वी गर्भीं जन्मला मंगळ ॥ काशी मध्यें तप करोनि जाश्वनीळ ॥ प्रसन्न केला ॥३५॥
विमान चाले जंव पुढती ॥ तंव लोक देखिला दिव्य दीप्ती ॥ गण ते विष्णु गण निरूपिती ॥ शिव शर्म्यासी पैं ॥३६॥
हा अंगिराचा सुत देव गुरु ॥ यानें प्रसन्न केला विश्वेश्वरू ॥ त्यासी दिधला पूर्ण वरू ॥ देव गुरू मग केला ॥३७॥
यासी नाम ठेविलें बृह स्पती ॥ केला या लोकींचा अधिपती ॥ तो समूल वृत्तांत तुज प्रती ॥ निवे दिला शिव शर्म्या ॥३८॥
मग विमान क्रमितां व्योम पुटीं ॥ तंव शनि लोक देखिला द्दष्टीं ॥ यासी प्रसन्न जाहाला धूर्जटी ॥ परियेसीं द्विजोत्तमा ॥३९॥
हा शनि सूर्य संज्ञांचा सुत ॥ येणें आराधिला उमाकांत ॥ मग या लोकींचा अधिपती निवांत ॥ केला शंकरें ॥४०॥
येणें तप केलें काशी पुरीसी ॥ भावें पूजिला काशी निवासी ॥ मग शंकरें ग्रहां मध्यें यासी ॥ दिधली श्रेष्ठता ॥४१॥
विमान जातां त्वरेंसीं ॥ तंव देखिले सप्त ऋषी ॥ शिव शर्मा पुसे त्या गणांसी ॥ सांगा हा कवण लोक ॥४२॥
तंव बोलती सुशीळ पुण्य शीळ ॥ हें तंव बोलिजे सऋषींचें मंडळ ॥ याचें आदि अवसान जें मूळ ॥ तें सांगो तुज प्रती ॥४३॥
मरीचि वसिष्ठ दक्ष राजा ॥ जत्रि भृगु पुल स्त्य गा द्विजा ॥ सातवा अंगिरा वृषभध्वजा ॥ पूजिलें त्यांहीं ॥४४॥
तप साधिलें अविमुक्तीसी ॥ मग शिव जाहाला त्यांसी ॥ ते या लोकीं केले निवासी ॥ महादेवें पैं ॥४५॥
ऐसें हें सप्तऋषींचें मंडळ ॥ तुज निरूपिलें गा समूळ ॥ हे विरिंचिदेवाचे सकळ ॥ मानस पुत्र बोलिजे ॥४६॥
मग विमान व्योमीं उमपलें ॥ तंव पुढें ध्रुव लोकातें देखिलें ॥ मग शिव शर्म्यानें प्रश्निलें ॥ विष्णु गणांसी पैं ॥४७॥
गण म्हणती गा द्विजोत्तमा ॥ परियेसीं या ध्रुव लोकाचा महिमा ॥ येणें आराधिलें पुरुषोत्तमा ॥ हरि हरांसी पैं ॥४८॥
हा सूर्य वंशीं महा नृपती ॥ पिता उत्तान पाद माता सुनीती ॥ यासी प्रसन्न जाहाला कम लापती ॥ समर्पिलें हें पद ॥४९॥
यासी प्रसन्न जाहाला मुरारी ॥ मग घेऊनि आला काशी पुरीं ॥ तेथें लिंग स्थापिलें बरव्यापरी ॥ दिधलें नाम ध्रुवेश्वर ॥५०॥
ऐसा ध्रुवलोकींचा अधीश ॥ तुज निरूपिला गा सायास ॥ या पदीं कल्पवरी वास ॥ स्थापिला शिवें ॥५१॥
मग विमान जातां गगनोदरीं ॥ जन लोक देखिला पुढारी ॥ तो शिव शर्मियासी सविस्तरीं ॥ कथिला गणोत्तमीं ॥५२॥
मग जन लोका पुढें विमानीं ॥ महार्लोक सांगीतला गणीं ॥ जे जे पृथ्वीच्या ठायीं धूम्र पानी ॥ अष्टांगयोग अभ्या सिती ॥५३॥
ते वसती महार्लोकीं ॥ तप साधनार्थी अनेकीं ॥ तें शिव शर्मियासीं महा कौतुकीं ॥ कथिलें गणोत्तमीं ॥५४॥
मग त्या महा र्लोका पुढारी ॥ विमान जातां गगनोदरीं ॥ तपो लोक देखिला व्योम कोठारीं ॥ शिव शर्म्यानें ॥५५॥
मग त्याची जे समूळ कथा ॥ विष्णु गणीं सांगीतली द्विजनाथा ॥ जेणें पराभवे दुरितव्यथा ॥ श्रवण पठनें पैं ॥५६॥
मग त्या पुढें जातां विमान ॥ देखिलें विधीचें ब्रह्म भुवन ॥ तें सत्य लोक कथिती प्रमाण ॥ सप्त लक्ष पैं ॥५७॥
तेथें चतुराननाचा वास ॥ तो चतुर्विध खाणी सृष्टीचा अधीश ॥ त्यानें प्रसन्न केला महेश ॥ आनंद वनी ॥५८॥
केली ब्रह्मेश्वरनामें लिंग स्थापना ॥ पूर्ण आराधिलें पंचानना ॥ मग अधीश केला त्या ब्रह्म भुवना ॥ सत्य लोकीं ब्रह्मा पैं ॥५९॥
तेथें विमान करू नियां स्थिर ॥ मग वंदिला तो सृष्टीकर ॥ तो सर्व देव दिक्पतींचा पितर ॥ सत्य लोक वासी ॥६०॥
मग जो प्रयागीं त्रिवेणीचा महिमा ॥ त्यासी कथिता जाहाला तो ब्रह्मा ॥ जेणें महादोष महा कर्मा ॥ वेगळें होइजे ॥६१॥
मग ऊर्ध्व क्रमितां विमान पुष्पक ॥ पुढें देखिला कवण लोक ॥ गण कथिते जाहाले कौतुक ॥ शिव शार्म्यासी ॥६२॥
म्हणती गा द्विजा मथुरा निवासी ॥ पार नाहीं तुझ्या भाग्यासी ॥ जे तुज मृत्यु जाहाला माया पुरीसी ॥ भागी रथी मुळीं ॥६३॥
म्हणोनि विमान जाहालें प्राप्त ॥ स्वर्ग मंडळ तुज केलें श्रुत ॥ आतां भेटेल तो लक्ष्मी कांत ॥ वैकुंठ भुवनीं ॥६४॥
इतुकें सांगती ते विष्णु गण ॥ तंव देखिलें वैकुंठ भुवन ॥ मग प्रश्निता जाहाला तो ब्राह्मण ॥ विष्णु गणांसी पैं ॥६५॥
गण म्हणती गा मथुरा निवासी ॥ त्या लोकीं लक्ष्मी पती परियेसीं ॥ रहिवास करितो तुजसी ॥ द्दश्य करूं आतां ॥६६॥
इतुकें अनुवादले ते गण ॥ तंव तो लक्ष्मी सहित नारायण ॥ शिव शर्म्यासी दिधलें आलिंगन ॥ नेला वैकुंठा मध्यें ॥६७॥
हरीनें शिव शर्मा देखिला येतां ॥ मग उतरला सिंहा सनाखालता ॥ बद्धपाणी वंदिला उभयतां ॥ श्रीनारायण तो ॥६८॥
मग दहा सहस्त्र संवत्सर ॥ वैकुंठीं होता तो द्विजवर ॥ भोगी तसे विपुल श्रृंगार ॥ दिव्यां गना त्या ॥६९॥
मग वैकुंठ भोग सरला ॥ शिवशर्मा जन्मासी घातला ॥ तो वृद्ध काळ राजा जन्मला ॥ नेदि वर्ध नदेर्शीं ॥७०॥
तो नंदि वर्ध नींचा राज्य धर ॥ त्रिशत प्रसवला कन्याकुमर ॥ राज्य केलें लक्ष संवत्सर ॥ स्त्रिया दश सहस्त्र ॥७१॥
तेणें लक्ष वरुषें राज्य केलें ॥ काशीं कीजे ऐसें मनीं उद्भवलें ॥ मग राज्य पुत्रासी समर्पिलें ॥ जो समस्तांसो श्रेष्ठ पैं ॥७२॥
त्यासी पूर्व जन्मीं घड्ली काशी ॥ म्हणोनि गेला वाराणसीं ॥ मग काशी पुरीं आला सहस्त्रि यांसीं ॥ घेऊनि भांडार ॥७३॥
मग प्रासाद निर्मिला थोर ॥ लिंग स्थापिलें वृद्ध काळेश्वर ॥ त्यासी प्रसन्न जाहाला उमा सहित हर ॥ लय जाहाला त्याचि लिंगीं ॥७४॥
अगस्ति म्हणे जी स्वामीनाथा ॥ हे लोपा मुद्रेसी निवेदिली कथा ॥ यानंतरें भेट लासी समर्था ॥ मज अनाथासी ॥७५॥
मज काशीखंड निरूपिलें तुम्हीं ॥ ते वाराणसी तुमची जन्म भूमी ॥ हें महा शास्त्र षण्मुख स्वामी ॥ व्यक्त केलें तुम्हीं मज ॥७६॥
मग शैल शिखरीं केलें दर्श्न ॥ मल्लिकार्जुन पूजिला गंगा जीवनें ॥ तेथें साधूनियां पूजन ॥ मग आलों भेटी तुम चिया ॥७७॥
अगस्ति म्हणे गा ब्रह्मचारी ॥ जी तूं अत्यंत प्रिय शिव गौरी ॥ यानंतरें देखि लासी गिरिवरी ॥ षडानन स्वमी ॥७८॥
मज काशी वियोगाचा दीर्घ् तम ॥ तो शरीरासी करीतसे होम ॥ शांत जाहाला तुज देखो नियां श्रम ॥ सर्वही गेला माझा ॥७९॥
ऐसा तूं मज अनाथा चिया नाथा ॥ स्वामी भेट् लासी गा समर्था ॥ तुवां परा भविली वियोग व्यथा ॥ शिव नामा मृतें ॥८०॥
मग म्यां पृच्छो आंरभिली तुम्हां ॥ कैसी उत्पत्ति जाहाली पुरुषोत्तमा ॥ मग ते सविस्तर आम्हां ॥ निरूपिली स्वामी ॥८१॥
शिव इच्छेपा सूनि जन्मला चक्र पाणी ॥ तेणें तप साधिलें आनंद वनीं ॥ तीर्थ स्थापिलें चक्र पुष्करिणी ॥ महा कूप तो ॥८२॥
ऐसें तप करिता वैकुंठ नायका ॥ हरी जवळी येणें जाहालें त्र्यंबला ॥ यानंतरें जाहाली मणिकर्णिका ॥ शिव भूषणी ते ॥८३॥
मग प्रसन्न जाहाला गरुड्ध्वजा ॥ शिव सहवर्तमान दक्षात्मजा ॥ समर्पिली विष्णूसी कमळजा ॥ केला त्रैलोक्याधिपती ॥८४॥
यानंतरें कथा निरूपिली ॥ जे कन्या हेमाद्रीचा मेनका प्रसवली ॥ ते सिता भागीरथी नाम पावली ॥ सगरोद्धारिणी ते ॥८५॥
ते प्रवाहिली हिमाद्रीपासून ॥ चित्तीं धरोनि दिशा दक्षिण ॥ प्रयागासी आली जेथें चतुरानन ॥ होता ॥ अनुष्ठानीं ॥८६॥
तेथें कालिंदी ब्रन्धनंदिनी ॥ तेथें सरस्वती जाहाली विधीच्या आचमनीं ॥ ऐसी प्रयागीं जाहाली त्रिवेणी ॥ भागीरथी ते ॥८७॥
मग पूर्व पंथें चालिली ॥ शिवाची पंचक्रोशी पावली ॥ मणिकर्णी केसी मीनली ॥ जाहाली उत्तर वाहिनी ॥८८॥
मग कथिलें तें गंगा माहात्म्य ॥ ते कथा नाशी महा कर्म ॥ जैसीं अवदानें भक्षितां होम ॥ तैसी दोष वारी ते ॥८९॥
यानंतरें निरूपिली शिव धामिनी ॥ जे शिवाची काशी आनंद वनीं ॥ तेथींचें रहस्य माझे श्रवणीं ॥ श्रुत केलें स्वामिया ॥९०॥
कैसा अवि मुक्तीचा वास ॥ आणि कैसा तेथींचा प्रकाश ॥ तो मज समूळ वाग्विलास ॥ निरूपिला स्वामी ॥९१॥
यानंतरें निरूपिली कथा ॥ जें शास्त्रार्थज्ञान ॥ परमार्था ॥ तेणें पराभवे दुरित व्यथा ॥ दोषतापत्रय श्रोतयांचे ॥९२॥
शिवा चिया क्रोधा पासव जाण ॥ तो उग्र मूर्ति जाहालासे उत्पन्न ॥ जैं विवदिलें विरिंचि नारायण ॥ परस्परें पैं ॥९३॥
तैं काल भैरव जन्मला अति क्रूर ॥ तेणें प्राणान्त केला सृष्टिकर । यास्तव कोपला त्रिसूल धर ॥ घातली ब्रह्म हत्या ॥९४॥
तो निधाला करा वया दोष निष्कृती ॥ तीर्थें करणे योजिलें चित्तीं ॥ जीं त्रिभुवनींचीं अगाध असती ॥ शिव निर्मित जीं कां ॥९५॥
त्रिभुवनींचीं तीर्थी करूनी ॥ काळ भैरव आला आनंद वनीं ॥ तेथें देखोनि स्वर्ग तरंगिणी ॥ विना शिली ब्रह्म हत्या ॥९‍६॥
मग तो येऊनि काशी पुरीं ॥ अद्यापि राहिला उग्र शरीरी ॥ तरी ते न प्रहरिजे सुरीं ॥ शिव धामिनी ॥९७॥
यानंतरें जो गंधर्वाचा सुत ॥ हरि केश नामें शिव भक्त ॥ त्यासी प्रसन्न जाहाला उमाकांत ॥ तो जाहाला दंड्पाणी ॥९८॥
तो शिवाचा दंड्धारी ॥ जाहाला ॥ आपणां जवळी शिवें ठेविला ॥ त्याचा मूळ विचार निरूपिला ॥ षण्मुख स्वामी ॥९९॥
मग जे प्रसिद्ध ज्ञानवापी ॥ कलावती उद्धरली या कूपीं ॥ ते कथा निरूपिली साक्षेंपीं ॥ षडानना तुम्हीं ॥१००॥
यानंतरें कथा निरूपिली ॥ सदाचार षट्‍कर्में निवेदिलीं ॥ जीं भवानीनें शिवासी प्रश्निलीं ॥ चतुर्वर्णादिकें ॥१०१॥
मग निरूपिला गृह स्थाश्रम ॥ जो श्रीमंता दिकांचा आचारनेम ॥ जो परा भवी सर्वही श्रम ॥ श्रोतयां जनांचा ॥१०२॥
मग निरूपिलें ब्रह्मचर्य ॥ जें षडंग तप साधना धैर्य ॥ तें योगि यांचें परम गांभीर्य ॥ निरूपिलें स्वामी ॥१०३॥
मग षट्‍कर्मांचा जो न्यास ॥ तो मज निरूपिला संन्यास ॥ जो भवानी प्रती आदि महेश ॥ अनुवादला होता ॥१०४॥
यानंतरें निरूपिला वानप्रस्थ ॥ जे अरण्यवासी पूजिजे अतीत ॥ ऐसे स्वामी तुम्ही कृपावंत ॥ निरूपिले आश्रम चारी ॥१०५॥
यानंतरें स्त्रियां चिया जाती ॥ ज्या श्रेष्ठ वर्णा वर्ण असती ॥ तरी त्या दाक्षा यणीसी पशु पती ॥ सांगत होता ॥१०६॥
प्रथम निरूपिलें पद्मिनी गुणां ॥ जे अमर लोकींची दिव्यांगना ॥ ते स्वर्ग लोकीं हूनि मृत्यु भुवना ॥ येतेसे संत योगीं ॥१०७॥
यानंतरें निरूपिली मृगिणी ॥ जे मृगाक्षी बोलिजे हंस गामिनी ॥ ते मृत्यु मंडळीं शुभ गुणी ॥ बोलिजे सामुद्रिकीं ॥१०८॥
यानंतरें हस्तिनी सांगीतली ॥ जे पुत्र प्रजा सौभाग्यें मिरवली ॥ तरी ते शुभ गुणीं वाखाणिली ॥ सामुद्रिकीं पैं ॥१०९॥
मग वाखाणिली ती चित्रिण ॥ जियेसी प्रिय श्रॄंगा सुवर्ण भूषण ॥ सुरतीं प्रिया एकांत करण ॥ सांकडें वदन तियेचें ॥११०॥
मग सांगीतली ती वडवा समर्थ ॥ तियेसी प्रिय कठिण सुरत ॥ हे लंबोदरीं उल्लधी पंथ ॥ चंचळमन ते ॥१११॥
यानंतरें निरूपिली ते दुर्दशा ॥ जे शंखिनी नामें महाराक्षसा ॥ ते प्रहरिजे महाकर्कशा ॥ त्यागिजे श्रीमंता दिकीं ॥११२॥
ऐसीं स्त्रियांचीं लक्षणें निरूपिलीं ॥ अगस्ति म्हणे जी परियेसीं बोली ॥ या अध्यायाची जे फलश्रुति सांगीतली ॥ ते अनुपम कीं ॥११३॥
तरी हेचि फलश्रुति पावन ॥ हा अध्याय जया होय श्रवण पठन ॥ त्यासी मुक्त होय जी बंधन ॥ त्रैलोक्य मंड्ळी ॥११४॥
अवंति कापुरी ॥ द्वारावती ॥ मथुरा माया आणि कांची ॥ अयोध्या पुरीं पूजिला रघुपती ॥ आणि त्रिवेणीस्नान ॥११५॥
श्रीशैल शिखरीं जाहालें दर्शन ॥ सेतुबंध पूजिला भागीरथी जळें करून ॥ कुरुक्षेत्रीं केलें हिरण्यदान ॥ रवि ग्रहणीं ॥११६॥
शत एक दानें काशी मध्यें ॥ ईश्वर पूजिला कमळें शुद्धें ॥ द्वादश ज्योति र्लिंगें कपिला दुग्धें ॥ पूजिलीं तेणें जाणा ॥११७॥
अगस्ती वदे जी शिव सुता ॥ या अध्या याची फल श्रुती पाहातां ॥ जे मज तुम्हीं सांगीतली आतां ॥ ते सांगों तुम्हां प्रती ॥११८॥
महाराष्ट्र कीजे अष्टा दश पुराणें ॥ तें सामर्थ्य सांगों किती गुणें ॥ ये पृथ्वीसी जितुकीं गंगा संगमीं जीवनें ॥ तितुकीं स्नानें जाहालीं ॥११९॥
हा अध्याय श्रवण पठनें ॥ षट्‍शास्त्रें चतुर्वेद पुराणें ॥ सप्त सागर गंगा जीवनें ॥ तेथें दानें केलीं सत्पात्रीं ॥१२०॥
हा अध्याय श्रवण पठन जया प्रती ॥ तेणें गंगा संगमीं सत्पात्रीं केली तृप्ती ॥ पंच सहस्त्र गोदानें दिधलीं गणती ॥ रवि ग्रहणीं ब्राह्मणांसी ॥१२१॥
आणिक परिसा फल श्रुती ॥ एक लक्ष दिधले भद्र जाती ॥ तुरंगम दिधले शुभ्र कांती ॥ पांच लक्ष ॥१२२॥
या अध्यायाचीं जितुकीं अक्षरें जाणा ॥ तितुकिया ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा ॥ अष्टोत्तरशत स्वयंवरें केलीं जाणा ॥ ब्राह्मणांसीं पैं ॥१२३॥
सहस्त्र प्रदक्षिणा महा ब्रह्म गिरीसी ॥ तेथें समारा धना केली कोटी ब्राह्मणांसी ॥ तें पुण्य घडे हा अध्याय जयासी ॥ श्रवण घडे भावार्थें ॥१२४॥
कीं सिंहस्थीं द्वादश गंगा प्रदक्षिणा ॥ कीं सहस्त्र वर्षें काशी वास जाणा ॥ कीं ग्रहण कालीं शत भार सुवर्णा ॥ दिधलें ब्राह्मणांसी ॥१२५॥
कीं लक्ष एक मुंजी बंधनें ॥ कीं सह्स्त्र एक गोदानें ॥ सह्स्त्र वरुषें पंचाग्नि साधनें ॥ केलें पंचक्रो शीसी ॥१२६॥
कीं पॄथ्वी प्रदाक्षिणेचें पुण्य़ ॥ कीं सह्स्त्र वेळ रामे श्वर दर्शन ॥ कीं शत जन्म काशी वास जाण ॥ घडे तयासी ॥१२७॥
कीं लक्ष केलीं इच्छा भोजनें ॥ कीं सहस्त्र जन्मीं वस्त्रदानें ॥ कीं लक्ष केलीं विप्रलग्नें ॥ कन्या गतीं पैं ॥१२८॥
वेदीं फल श्रुति सांगीतली अपार ॥ तितुकी सांगतां होईल पसर ॥ जेथें साक्षात वक्ता ईश्वर ॥ श्रोत्री तरी भवानी ॥१२९॥
हें अनृत नव्हे जी श्रोतेजन ॥ स्वभुखें बोलिला व्यासनारायण ॥ तेंचि म्यां महाराष्ट्र करून ॥ सांगीतलें श्रोतयां प्रती ॥१३०॥
इतुकें गॄहींचि होईजे प्राप्त ॥ हा अध्याय घडे जया पठन श्रुत ॥ शिवदास गोमा म्हणे यथोक्त ॥ कथा परिसा पुढें ॥१३१॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे ग्रंथमाहात्म्यनिरूपणे गतकथासंक्षेपवर्णनं नाम एकोनाशीतितमाध्यायः ॥७९॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति एकोनाशीतितमाध्यायः समाप्तः ॥


N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP