काशीखंड - अध्याय ६१ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्री गणेशाय नमः ॥ षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ ऐसी या गणपतीची उत्पत्ती ॥ तेणें सर्वांकारणी पशुपती ॥ संतोषविला असे ॥१॥
स्वामी म्हणे गा मुनिवरा ॥ शिव स्थिर जाहाले गंगातीरा ॥ अव्हेरूनि आले गिरिवरा ॥ मंदराचलासी ॥२॥
परी तो सर्वार्थीं गा शिवभक्त ॥ तोही शिवासवें आला पर्वत ॥ आतां असो त्या कथेचा वृत्तांत ॥ मागें राहिली शिवकथा ॥३॥
दिवोदासराजा वैकुंठासी नेला ॥ तेणें शिव अत्यंत संतोषला ॥ सर्व देवांमध्यें वंद्य केला ॥ ढुंढिराज तो ॥४॥
मग ढुंढिराजासी वदे हर ॥ तुज समर्पिला रे उरगहार ॥ अष्टसिद्धींचा जो पूर्ण वर ॥ तो म्यां अधिकार तुज दिधला ॥५॥
तुवां प्राप्त केली मज वाराणसी ॥ तो दीर्घ उत्साह जाहाला आम्हांसी ॥ तरी कोणतें उचित गणासी ॥ समर्पूं मी ये काळीं ॥६॥
जैसीं सर्व आभरणें शंकरासी ॥ तितुकीं समर्पिलीं गजेंद्रासी ॥ मग प्रवर्ते संगीत नृत्यासी ॥ शंकरापुढें गणेश ॥७॥
रंगीं ठाकला लंबोदर ॥ दावी नृत्याचा प्रकार ॥ काशीपुरीं आला विश्वंभर ॥ म्हणोनि शिवापुढें नाचे ॥८॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ रंगीं ठाण केलें गणपतीं ॥ प्रथम चरणीं केली संगती ॥ ते कैसी आतां ॥९॥
यम नारद आणि तुंबर ॥ यम मृंदगीं ठाकला यंत्रकार ॥ स्वरीं ठेविला वीणा सुस्वर ॥ सज्जिलीं उपांगें ॥१०॥
चित्रविचित्र हे गायनवृत्ती ॥ हनुमंतादिक आणि सरस्वती ॥ तिंहीं मौळीं स्पर्शोनियां क्षिती ॥ नमस्कारिला शिव ॥११॥
तंव गजेंद्रें वंदिला पशुपती ॥ मग प्रवर्तला कैसा नृत्यगीतीं ॥ सर्व गण-गंधर्व-सुर देखती ॥ थैथैकारीं मृगांकधर जैसा ॥१२॥
तंव रंगीं ठाकलिया निंतबा ॥ सरळा तरळा स्वयंभा ॥ बाला वज्रा भ्रमिता रक्तबिंबा ॥ ऐशा सप्तपाताळिका ॥१३॥
वाम दक्षिण प्रतिज्ञा कारका ॥ कटिमुष्टिजा नुस्तनदीर्घिका ॥ महा ज्ञानलक्षणिका ॥ सर्व शुभा पैं ॥१४॥
हस्तकरचरण चारी दृष्टियुक्ती ॥ मग केंवाडव सुकुमारगती ॥ ऐशी देवरंजना मनोवृत्ती ॥ उत्पलपदा चंचला ॥१५॥
प्रथम भाव चरण चलितां ॥ ह्रदयावरी हस्त विद्युल्लता ॥ कृशांगी अति उन्मत्तता ॥ प्रथम गुण लक्षणीं ॥१६॥
बिंबोष्ठी चारुभामिनी ॥ श्यामोदरी मुखपद्मिणी ॥ चक्षुपुटी षड्लक्षणीं ॥ ऐशा शुभानना ॥१७॥
तरी त्या जाणती षड्रागागमा ॥ तंव अगस्तीनें प्रार्थिलें षडानना नेमा ॥ या षडूरागांचे जन्मा ॥ सांगा जी स्वामी ॥१८॥
आणि हे सहा राग भार्या छत्तीस ॥ आणि पुत्रजाति कीं संयुक्तीस ॥ कवण मातृपितृनिर्मित ॥ कोठें जन्म यांचा ॥१९॥
स्कंदवचनीं षड्रागांचे जन्म सांगतां ॥ संस्कृतीं असे विस्तीर्णता ॥ परी कांहीं एक संकलित श्रोतां ॥ करूं निरूपण ॥२०॥
जैं अप्सरा नव्हत्या लावण्य सुंदरी ॥ तैं प्रथम सरस्वती ब्रह्म कुमर ॥ उद्भवली ब्रह्मयाचे मुखा माझारी ॥ जन्मली प्रयागीं ॥२१॥
तिणें तप केलें काशीपुरीं ॥ मग प्रसन्न जाहाला त्रिपुरारी ॥ तेणें राग माळिका ते अवसरीं ॥ दिधलीं तियेसी ॥२२॥
ते सहा राग कोणते नेमस्तु ॥ श्रीराग भैरव पंचम वसंतु ॥ आणिक मेघराग गर्जे वर्षाऋतु ॥ षष्ठ तो महादभुत ॥२३॥
जंबुद्वीपीं खांडवनस्थळीं ॥ बगबगयाध्वनि उदयाचळीं ॥ श्रीराग प्रसवला चंद्र मौळी ॥ तो दिधला शारदेसी ॥२४॥
तो मार्गेश्वरमासीं संभवला ॥ आणि पौष शुद्ध षष्ठीसी जन्मला ॥ तो जातीचा ब्राह्मण लेइला ॥ श्वेतांबरें ॥२५॥
आतां माघ मासीं संभवन ॥ आणि फाल्गुनीं जाहाला उत्पन्न ॥ उद्भवली समुद्र मथनाची ध्वन ॥ तो वसंत जन्मला ॥२६॥
सिंहलद्वीपीं त्रिकूटाचळीं ॥ फाल्गुन शुद्ध पौर्णि मेकाळीं ॥ वसंतासी प्रसवला चंद्र मौळी ॥ तो द्वितीय मान्य ॥२७॥
आतां चैत्र मासीं गर्भ जाहाला ॥ वैशाख शुद्ध एका दशीसी जन्मला ॥ शिव मुखीं उद्भवला ॥ तो भैरव राग ॥२८॥
तो क्रौंचद्वीपीं गंध मादन पर्वतीं ॥ उलूककंठीं ध्वनिवृत्ती ॥ प्रसवला पशुपती ॥ तया भैरव रागासी ॥२९॥
वसंत भैरव हे पीतांबर-आभरण ॥ आतां ज्येष्ठ मासीं संभवून ॥ आषाढ मासीं सप्तमी दिन ॥ तैं पंचम जज्मला ॥३०॥
जैसा मान्य सर्वा भरणीं सुरपती ॥ तैसी पंच मरागाची मूर्ती ॥ हाही वैश्य वर्ण ज्ञाती ॥ निर्मिला शंकरें ॥३१॥
श्रावण मासीं गर्भ जाहाला ॥ तो भाद्रपद चतुर्दशीसी जन्मला ॥ क्रौंचद्वीपीं गंधगिरीं प्रसवला ॥ शंकर तयासी ॥३२॥
तो मेघराग चक्र पाणी ॥ महा क्षत्रिय पीतांबर वसनी ॥ जन्मतां वरुण ध्वनी ॥ उद्भवला महा घोषें ॥३३॥
आतां गोमे दद्वीपीं खंड पर्वतीं ॥ शंख ध्वनि महा कीर्ती ॥ तो अरुण रंग दीप्ति ॥ प्रसवला शिव ॥३४॥
ऐसा षड्राग जन्म वृत्तांत ॥ प्रसवला तो उमाकांत ॥ महाक्षत्रिय लक्ष्मीमिश्रित ॥ नट नारायण हा ॥३५॥
रक्तप्रया श्वेतवस्त्रें ॥ कनक भूषणें कनक छत्रें ॥ ऐसा तो नीलोत्पल त्रिनेत्रें ॥ उद्भवला श्रीराग ॥३६॥
सुंदर मदन मूर्ति पाव कवर्ण ॥ श्रवणीं कमळ क्षत्रिय पूर्ण ॥ ऐसा तो वसंत त्रिनयन ॥ प्रसवला राग ॥३७॥
उग्र मूर्ति भस्मोद्धुळी ॥ जटाजूट विराज मान मौळीं ॥ ऐसा तो भैरव राग शशि मौळीं ॥ प्रसवला शिव ॥३८॥
रक्तकृष्ण वर्ण जांबळी ॥ शतपत्री पाटली छत्र मौळीं ॥ ऐसा तो पंच मराग शशि मौळीं ॥ प्रसवला शिव ॥३९॥
तमालनील घनश्या ममूर्ति वस्त्रें ॥ श्वेत सिंदूराग्नि शिरीं छत्रें ॥ ऐसा तो मेधराज पंचवक्रें ॥ उद्भवला स्वइच्छें ॥४०॥
रक्तांबर महाक्षत्री ॥ अरुण प्रभा नीलोत्पलगात्री ॥ ऐसा तो नट नारायण पंचवक्री ॥ प्रसवला महादेव ॥४१॥
आतां पश्चिमेसी गंध पर्वतीं ॥ हरि केशव नामें महा नृपती ॥ त्या चिया नगरा नाम गंधा वती ॥ तो तेथींचा नृप नाथ ॥४२॥
त्यासी प्रसन्न झाला शंकर ॥ संतति दिधला एक कुमर ॥ तयासी नाम विद्याधर ॥ तो प्रसवला षट्कन्या ॥४३॥
शंकर प्रसन्न जाहला त्यासी ॥ त्या दिधल्या नृप सुतांसी ॥ स्वामी म्हणे गा अगस्ति ऋषी ॥ त्या कवण कवणा ॥४४॥
मालती दिधली श्रीरागासी ॥ जयंती समर्पिली वसंतासी ॥ सुपणिंका दिधली भैरवासी ॥ पंचम देसी कारीसी वर ॥४५॥
ज्योतिका मेघ रागाची शक्ती ॥ आणि कमल विशालाक्षी नाम निरुती ॥ ते नट नारायणाची युवती ॥ महा प्रज्ञा ॥४६॥
मग श्रीरागासी जाहालिया षट्कुमरी ॥ त्या महा लावण्य सगुण सुंदरी ॥ त्या कवण कवण अवधारीं ॥ मैत्रा वरूणी ॥४७॥
गौडाग्री कोला हली आधावळी ॥ द्राविडी मंगल कौतुकी बाळी ॥ सहावी देवी ग्रह मंडळी ॥ श्रीराग उदरीं मालतीसी जाहाल्या ॥४८॥
धनाश्री वैराटकी रामाग्नी ॥ षण्मंजरी देव प्रसादा गौडाग्नी ॥ या वसंता चिया कुमरी सुलक्षणी ॥ जयंतीसी जाहाल्या ॥४९॥
भैरवी ललिता वेल्हाळी ॥ सुजरी कर्नाटकी रक्तिमा हस्त बाळी ॥ या भैरवाच्या गृह मंडळीं ॥ सुपर्णिकेसी जाहाल्या ॥५०॥
तोटकी मोटकी नाटपरी ॥ परात्परा सिद्धि मलारी ॥ या पंचमाच्या षट्कुमरी ॥ देशी कारीसी जाहाल्या ॥५१॥
कुमुदा मधुकरी बंगाली ॥ कासोळी सोरटी भूपाळी ॥ या मेघरा गकन्या महाबाळी ॥ ज्योति केसी जाहाल्या ॥५२॥
वल्लभा रंगाग्नि सांवरी ॥ वेगधा चतुर गांधारी ॥ जयंती या षट् कन्या मंदिरीं ॥ नट नारायणाच्या ॥५३॥
मेरुपाठारीं वायु कोणीं ॥ गंधावती पुरीं पुण्य स्थानीं ॥ तेथें जन्मली पुत्री कुरंगिणी ॥ विद्याधरा ज्या ॥५४॥
ऐसें हें राग कुटुंब सप्तकें ॥ निर्माण केलें जी त्र्यंबकें ॥ मग समर्पिले काशी निवासिकें ॥ ते रागांचे अवतार ॥५५॥
मग त्या राग-रागिणी पुत्रिका ॥ त्या राहिल्या स्वर्ग लोका ॥ ज्या प्रकटलिया मृत्यु लोका ॥ ते रागांचे अवतार ॥५६॥
सहा राग ते स्वर्ग मंडळीं ॥ उपराग ते असती ॥ या भूतळीं ॥ ते ऋषी श्वरीं राज मंडळीं ॥ ध्वनी मथूनि स्थापिले ॥५७॥
आतां एक पुराणां तरींची उक्ती ॥ स्वामी सांगे अगस्ती प्रती ॥ त्या चतु र्वेदां चिया मूर्ती ॥ हयग्रीवें नेलिया ॥५८॥
तैं राग सहवर्त मान वेद ॥ दैत्य उदरीं पावले खेद ॥ मग नारायणें केला छेद ॥ मत्स्या वतारीं दैत्यांचा ॥५९॥
दधि समुद्रीं घोर वनीं ॥ शंखा सुराचें उदर फोडूनी ॥ वेद काढिले चक्र पाणी ॥ त्या शंखा सुरापासाव ॥६०॥
पुत्र कलत्रेंसीं राग रागिणी ॥ त्या विजयी केल्या स्वर्ग भुवनीं ॥ मग राहिल्या होत्या रागध्वनी ॥ हयग्रीव शंखोदरीं ॥६१॥
मग त्या ऋषि आश्रमाचीं पक्षिवरें ॥ नानाविध मिळालीं मनोहरें ॥ मग त्या दैत्यांचीं मांसरुधिरें ॥ भक्षविलीं तयां ॥६२॥
दैत्यरुधीरें भरली क्षिती ॥ तेथें तृण उद्भवले वर्षा ऋतीं ॥ तें भक्षिलें जीवजतीं ॥ श्वापदीं पश्वादिकीं ॥६३॥
मग त्या राग ध्वनी त्या चिया उदरीं ॥ उद्भवल्या पृथ्वीवरी ॥ मग त्या मथूनि ऋषी श्र्वरीं ॥ धरिल्या राग धारणा ॥६४॥
स्वामी वदे गा कुंभजा ॥ त्या निरूपण करूं बरविया वोजा ॥ आतां श्रोत्तोत्तमा सहजा ॥ परिसा एकाग्र ॥६५॥
प्रथम श्रीरागाची ध्वनी ॥ वदे बग बगाया आननीं ॥ वसंताची जी कामिनी ॥ वदे सुग्रणी पक्षी ॥६६॥
अतां भैरव वदे उळुका ॥ पंचम रागासी उद्भवली पिका ॥ मेघरागाची टीका ॥ श्रीखंडपक्षी वदे ॥६७॥
सर्व विद्यांचा जो गुरू ॥ तो शुकनामें महागजरू ॥ नटनारायण धीरवीरू ॥ वदतसे सुख ध्वनीं ॥६८॥
चातक वदे गौडा ग्निमान ॥ देवाग्नि प्रसवे वाय सानन ॥ गौडी मानाची जे ध्वन ॥ चौग दुपक्षी वदे ॥६९॥
द्रावीड वदे ढोकपक्षी ॥ तुंडी पाणिया कुर्कुटिया मुखी पक्षी ॥ कुमुदिका बोले प्रतिसाक्षी ॥ वाजी वदताती ॥७०॥
अजा वदनीं वदे गांधारी ॥ ढोकपक्षी वदे आहेरी ॥ मृग वदे पदमंजरी ढोकपक्षी सावरी वदे ॥७१॥
कृशपक्षी वदे जातिका ॥ शुद्धा नट वदे पाराविका ॥ धनाश्रियेचा धोका ॥ वदे खराननी ॥७२॥
वैराटिका वदे कुरांगिणी ॥ माधवी कष्टपक्षी वदनीं ॥ कौस्तुभी कंकराधी आननीं ॥ वदतसे पूर्ण ॥७३॥
हुलकुर्कुट वदे मोटकीसी ॥ हुंबर वदे देशकारीसी ॥ आणि जे जाणती मानसीं ॥ तें संस्कृत भाषे ॥७४॥
मधुमाधवी वदे गोदावरी ॥ महिका वदे ते देवांगारी ॥ ऐसे राग रागिणी ऋषीश्वरीं ॥ प्रकट केले मृत्यु लोकीं ॥७५॥
आतां सप्त स्वरांचें मान ॥ कोणा मुखीं होतीं उच्चारण ॥ परिसा गोमुखें गुण ॥ स्कंदपुराणींचे ॥७६॥
षड्जस्वर वदे वारण ॥ धैवत वदे वडवानन ॥ गांधाराचे प्रमाण जें ज्ञान ॥ तें बेडूक वदे ॥७७॥
निषाद वदे कुरंगिणी ॥ प्रलंब राधियाच्या वदनीं ॥ तमाळुस्वर ॥ गर्जनीं ॥ पंचाननाची ॥७८॥
सातवा तो पंचमस्वर ॥ वदे शशीचा मित्र चकोर ॥ ऐसा वेदाचा बडिवार ॥ स्वामी सांगे अगस्तीसी ॥७९॥
ऐसा प्रथम उद्धरिला जो वेद ॥ परी त्रिविध केला भेद ॥ ऐसा शिवसभे होतसे आनंद ॥ त्रिग्रामीं त्रिस्वरीं ॥८०॥
प्रथम घोरनाभि उचिते ॥ द्वितीय ह्रदय मंदिरीं कीर्तिते ॥ तारस्वर शिरसा उचितो ॥ इति ते त्रिग्रायामिनी ॥८१॥
मग उभारूनि दक्षिण भुजा ॥ श्रीराम उभारी सारजा ॥ तेव्हां स्वरेंचि शिवात्मजा ॥ उद्धरिला वसंत ॥८२॥
मग पंचम उद्धरिला आननीं ॥ थोर केली भैरवाची उद्धरणी ॥ मग स्मरता जाहाला शिवस्थानीं ॥ मेघराग तो ॥८३॥
मग उद्धरोनि स्वर केला नीट ॥ हे स्त्रियांसी मिरवत राग स्पष्ट ॥ सर्व नादांचें मूळ तें लंबोष्ठ ॥ उद्धरिल्या रागिणी ॥८४॥
छत्तीस पुत्रिकां सहवर्तमान ॥ दाखविलीं सर्वही अंबरा भरण ॥ कथिलें षड्रागांचें वर्णन ॥ नानाविध जें ॥८५॥
श्रीराग वसंत हा वर्णश्वेत ॥ पंचम भैरव निर्मिला श्यामस्थ ॥ मेघराज वर्ण पीत ॥ दाखविले रंगीं ॥८६॥
ऐसी जाहाली रागरचना ॥ मिरवले आपुलिया जन्म स्थाना ॥ हे सहाही शिव पंचानना ॥ पासाव जन्मले ॥८७॥
येथें संतोषावया पंचानना ॥ लंबोदर प्रवर्तला जी पैखणा ॥ थै थै करीत मूर्च्छना ॥ दाखवी एकवीस तालें ॥८८॥
तान एकुणपन्ना सविध दाखविली ॥ बत्तीस श्रुतींची प्रवृत्ति केली ॥ सप्तही गमकें दाखविलीं ॥ शिवापुढें ॥८९॥
चारी छाया राग लीला दोनी ॥ पंच गती पंच आला पध्वनी ॥ नव रस दाखविले अष्टगुणी ॥ छत्तिसाधिकीं तें ॥९०॥
चतुर्दश संसार चारी ॥ चारी संप्रदाय कळा बहात्तरीं ॥ चौसष्टी ह्स्तक त्रिद्दष्टी भेदकरी ॥ छत्तिसादिकीं जे ॥९१॥
ज्या रसीं अत्यंत प्रिय शिव ॥ त्या सप्त रसांची उद्धरी ठेव ॥ अंतरीं भ्रमतां अंगभाव ॥ दाखविले नानाविध पैं ॥९२॥
उल्लाटादिकीं भ्रमण साधितां ॥ क्षितितळीं भंग जाहाला दंता ॥ परी कोटिकळीं राखिला निरुता ॥ तालबंद गजेंद्रें ॥९३॥
तेणें प्रसन्न जाहाला उमाकांत ॥ लंबोदर केला चतुर्दंत ॥ आणिक विश्वनाथ ॥ विद्या चतुर्दश ज्या ॥९४॥
प्रथम विद्या केल्या वेदाधिपती ॥ द्वितीय विद्या सवालक्ष जाती ॥ तृतीय विद्या महाप्रवृत्ती ॥ अष्टादश पुराणें ॥९५॥
चतुर्थ विद्येचा बोलिजे गीतमात ॥ पंचम विद्या नवरसादि नृत्य ॥ षष्ठ विद्या ते अष्टोत्तरशत ॥ नाना मंत्र जप तो ॥९६॥
सातवी ते छत्तीस दंडयोधी ॥ आठवी ते अष्ठ पाकसिद्धी ॥ नववी विद्या महासिद्धी ॥ गारुडविद्या ते ॥९७॥
दशवी तें घटितसूत्र सुंदर ॥ एकादशावी ते बहुलकीरकार ॥ द्वादशावी रूपर सशृंगार ॥ तेरावी धीरशूर पुरुषार्थ ॥९८॥
चतु र्दशावी ते महादान ॥ हे नव्हे त्रयोदशां समान ॥ ऐसा केला गजेंद्र महासंपन्न ॥ त्रिपुरांतकें ॥९९॥
ऐसा त्रिपुरांतक जाहाला प्रसन्न ॥ सर्व देवांमध्यें केला श्रेष्ठ गण ॥ काशी रक्षावया सप्तावरण ॥ षट्पंचाश स्थानीं ॥१००॥
ऐसा श्रेष्ठ केला लंबोदर ॥ अष्टादश पुराणां अगोचर ॥ वंद्यांसी वंद्य हा परात्पर ॥ आदिगण श्रेष्ठ श्रेष्ठ ॥१०१॥
अगस्ति वदे जी शिवकुमरा ॥ पूर्ण वृष्टी करितां जल धरा ॥ तेणें परम संतोष शरीरा ॥ होतसे चातकांसी ॥१०२॥
अंबूनें संतोष होतसे तयांप्रती ॥ अमृताची मज करितां बहुत प्राप्ती ॥ परी मी अति क्षुधाक्रांती ॥ नव्हे तृप्त ॥१०३॥
आतां शिव कैसा आला काशीमधीं ॥ ते कथा परमपद प्रापकसिद्धी ॥ मज निरूपा जी कृपानिधी ॥ स्वामिया स्कंदा ॥१०४॥
तंव स्वामी म्हणे गा कुंभजा ॥ शिवें स्थिर केलें वृषभ ध्वजा ॥ तेंचि तीर्थ जाहालें गा सहजा ॥ वृषभ ध्वज तीर्थ ऐसें ॥१०५॥
तेथींचा महिमा सांगों तुजप्रती ॥ तरी मज ऐसी कैंची गा मती ॥ आतां असो उमाशिव पाहावयाप्रती ॥ आले कवण कवण ॥१०६॥
आरोहण गरुड पृष्ठीवरी ॥ शंखचक्र आयुधें करीं ॥ त्वरावंत निघाला श्रीहरी ॥ शिवदर्शना ॥१०७॥
श्रीहरी निगाला सिद्ध करूनियां स्वभार ॥ जवळी पाचारिला तो सृष्टिकर ॥ तो हंसवहनी ब्रह्मा तत्पर ॥ आला हरी जवळिकें ॥१०८॥
तंव दिव्यदीप्ती आला सविता ॥ तेणें वंदिला हरि सृष्टिकर्ता ॥ तेथें योगिनी आलिया समस्ता ॥ वंदिले हरि-विरिंची ॥१०९॥
सर्व देव आले निजगण ॥ ऋषी महानु भाव ब्राह्मण ॥ जे होते ते क्षेत्रसंन्यास घेऊन ॥ निघाले शिवयात्रेसी ॥११०॥
तंव योगिनी म्हणती एकमेकां ॥ शिव कार्या आम्ही जाहालों वंचिका ॥ आतां दर्शना जातां त्र्यंबका ॥ काय मिरवूं श्लघ्यत्व ॥१११॥
तंव एकीं ऐसा विचार स्थापिला ॥ सविता पैज स्वीकारूनि आला ॥ तेणें शिव कार्यासी निश्चय केला ॥ तो गेला कोणीकडे पैं ॥११२॥
आपणा कोपेल त्रिनयन ॥ आपण राहिलों काशी सेवून ॥ विश्वनाथा विरहित स्मरण ॥ अंगिकारिलें नाहीं पैं ॥११३॥
तंव सविता विचारी मानसीं ॥ आम्ही शक्तिमंद जाहालों शिव कार्यासी ॥ आतां कवण पुरुषार्थ शिवासी ॥ दृश्य करूं आम्ही ॥११४॥
परी मी जाहालों काशीरक्षपाळ ॥ अहोरात्र स्मरतसें जाश्वनीळ ॥ आतां होणार असेल कैसा काळ ॥ जाऊं शिव दर्शना ॥११५॥
तंव ब्रह्मा विचारणा करी ॥ अतिक्रोधी तो त्रिपुरारी ॥ मी अव्हेरूनि काशीपुरी ॥ नेणेंचि आणिक स्थळ ॥११६॥
आतां कैसें असेल लिखितपत्रीं ॥ क्रोधयुक्त होईल पंचवक्री ॥ जरी तो दग्घील त्रिनेत्री ॥ तरी अत्यंत मुक्ति पैं ॥११७॥
ऐसे आपुलाले अन्याय विचारिती ॥ कैसी करावी पैं आतां युक्ती ॥ हरदर्शना जातसे श्रीपती ॥ उतावेळ चालिला ॥११८॥
अशक्त होऊनि शिव कामा ॥ आम्ही नाहीं वर्तलों अधर्मा ॥ आतां जैसा काळ पुरुषोत्तमा ॥ तोचि आपणासी ॥११९॥
मग श्रीहरि वंदिला समस्तीं ॥ पुढें करूनि आले श्रीपती ॥ योगिनी विरिंची गण गभस्ती ॥ निघाले विष्णूसवें ॥१२०॥
ऐसा निघाल चक्रपाणी ॥ शिवें येतां देखिला जी दुरोनी ॥ प्रणाम केला शिवचरणीं ॥ स्वभारेंसीं पैं ॥१२१॥
मग क्षितीं मौळीं ठेवूनि हरी ॥ साष्टांगें वंदिला त्रिपुरारी ॥ तंव देव ऋषींनीं जयजयकारीं ॥ वंदिला सदाशिव ॥१२२॥
जैसा महावाताचेनि झूंझुकारें ॥ क्षितीं लता स्पर्शिजे क्षीरभारें ॥ तैसीं सर्वांचीं साष्टांगें शंकरें ॥ देखिलीं चक्षूनें ॥१२३॥
मग श्रीहरि ठाकला करसंपुटीं ॥ तेणें विश्वंभर जाहाला संतुष्टी ॥ येर समस्त राहिले अधोद्दष्टी ॥ न देखवे शिवासी ॥१२४॥
तंव उदार भोळा चक्रवर्ती ॥ अनंत ब्रह्मांडें ज्याची मनोवृत्ती ॥ तरी हा प्रलय करी उत्पत्ती ॥ क्षणामाजी किती नेणों ॥१२५॥
जैसी माता जाय कार्या कारणें ॥ अपत्यें गृहीं ठेवी रक्षणें ॥ तीं राहातां मातृ आज्ञा प्रमाणें ॥ त्यांसी क्रोध केवीं करी ॥१२६॥
तैसे वाराणसीमध्यें जे आले ॥ ते सर्व दोषां अलिप्त जाहाले ॥ शिव स्तवीत तेथेंचि राहिले ॥ त्यांसीं न चले शिवाचें ॥१२७॥
जो वाराणसीचा पूर्ण वासी ॥ तो प्रत्युत्तरीं तुळिजे शिवासी ॥ ऐसा जो कवण समर्थ त्यासी ॥ दोष बाधेल ॥१२८॥
मग शिवें समस्तांसी आश्वासिलें ॥ आमुचें कार्य कोणीं नाहीं केलें ॥ तुम्हांसी अत्यंत बरवें सुचलें ॥ जे सेविली काशी ॥१२९॥
शिवें जे स्थानीं ध्वज स्थिर केला ॥ तेथें सर्व देव भार उतरला ॥ तितुकीं तीर्थीं अनुवादला ॥ भवानीप्रति ॥१३०॥
षण्मुख म्हणे गा महाऋषी ॥ तीं तीर्थीं श्रवण करूं गा तुजसी ॥ सह्स्त्र जन्मींचे किल्बिषासी ॥ दहन होय निमिषार्धें ॥१३१॥
प्रथम तें वृषभ ध्वज तीर्थ ॥ ऐसें मही मंडळी नाहीं समर्थ ॥ त्या तीर्थाचा जो परम पुरुषार्थ ॥ तो परियेसीं गा अगस्ती ॥१३२॥
वृषभ ध्वजर तीर्थीं पिंडदान ॥ कीजे द्रव्यशक्ती प्रमाण ॥ तरी पूर्वजां होय दीर्घमान ॥ शिवस भेसी कैलासीं ॥१३३॥
ज्यासी कैलास जाहाला पावन ॥ मग किमर्थ तें दीर्घ महिमान ॥ शिवसभेंत कैलासीं होय मान ॥ हें सार त्रिभुवनीं ॥१३४॥
सर्व देवांसीं सहस्त्रनयन ॥ अष्टदिक्पती नारायण ॥ वृषभ ध्वज तीर्थीं पंचानन ॥ पूजिला मंत्रविधीं ॥१३५॥
विश्वंभर आला वाराणसीं ॥ तेणें उत्साह जाहाला त्रैलोक्यासी ॥ त्रैलोक्य तीर्थें येती अविमुक्तीसी ॥ शिवदर्श नातें ॥१३६॥
गोलोकींहूनि आल्या कामधेनु ॥ नमस्कारावया पंचाननु ॥ अगस्तीसी वदे शिवनंदनु ॥ त्या कवण कवण ॥१३७॥
एक कोटी कामधेनु सुदोहा ॥ ज्या गोलोकीं आनंदोत्याहा ॥ त्या शिवें निर्मिल्या अगाध पाहा ॥ युगानुयुगीं ॥१३८॥
त्या महा सुंदर अमृताचिया खाणी ॥ त्यांमध्यें मुख्य ज्या षोडश जणी ॥ त्या निघालिया अगस्तिमुनी ॥ दधिसमुद्र मंथितां ॥१३९॥
गोलोकीं स्थापिल्या त्रिपुरांतकें ॥ त्या श्वेष्ठ केलिया काशीनिवासिकें ॥ तेथींचें आधिपत्य त्र्यंबकें ॥ प्राप्त केलें तयांसी ॥१४०॥
प्रथम कामधेनु जे सुमना ॥ जियेचें सत्त्व प्रसिद्ध पंचानना ॥ कीं त्रैलोक्यजंतूंसी अन्नपूर्णा ॥ प्रत्यक्ष भवानी ॥१४१॥
दुसरी कामधेनु ते सुनंदा ॥ ते अनादि तुळिजे आनंदकंदा ॥ तियेचें पीय़ूष प्राप्त नोहे कदा ॥ ब्रह्मादिकां सृष्टिकरांसी ॥१४२॥
तृतीय कामधेनु ती सुश्रीळी ॥ कीं ते त्रैलोक्यजंतूंचिये पयाळीं ॥ तयेचिनी अमृतें सकळीं ॥ तृप्ति ब्रह्मादिकांसी ॥१४३॥
चौथी ते सुरभिनाम स्थापिली ॥ कीं ते द्रोणाचळींची अमृतवल्ली ॥ ती सर्व देवां उपयोगा आली ॥ आत्मरक्षणपीय़ूषें ॥१४४॥
पांचवी कामधेनु ते कपिला ॥ जियेचे पीयूषें चंद्रमा निर्मिला ॥ तीतें ब्रह्मा सत्यलोकासी घेऊनि गेला ॥ चंद्रास्तव पैं ॥१४५॥
सहावी कामधेनु कपिला वरा ॥ तियेचें अमृत प्रिय सर्व सुरां ॥ आणिक यागीं प्रिय ऋषीश्वरां ॥ मर्त्य मंडळी ॥१४६॥
सातवी ते नामें कुमुदिनी उत्तम ॥ तियेचें अमृत त्रिलोकीं सप्रेम ॥ तेणे सिद्धी गेला विश्वामित्राचा होम ॥ केली दुसरी सृष्टी ॥१४७॥
आठवी ते नामें मधुगा ऐसी ॥ ते उपकरार्थ आली देवांसी ॥ ते आणिली अमरावतीसी ॥ सहस्त्रनयनें ॥१४८॥
नववी ते सिद्धी गौ सुंदरी ॥ तेही प्राप्त केली होती सुरेश्वरीं ॥ ते समर्पण केली होती ऋषीश्वरीं ॥ भवानीनें जमदग्नीसी ॥१४९॥
दहावी ते पूर्णभद्रा गवा ॥ तियेचें भरतें जातसें क्षीरार्णवा ॥ विष्णु नित्य स्नपी महादेवा ॥ तियेचेनि अमृतें ॥१५०॥
एकादशावी महासिद्धि योगी ॥ तियेचा लक्षावा अंश प्रकटला जगीं ॥ ते आणिली होती महायागीं ॥ कुरुक्षेत्रीं अगस्तीनें ॥१५१॥
द्वादशावी ते नामें कामभूता ॥ जिणें शापिली पार्वती दक्षतुहिता ॥ मग अवतरली ते जगन्माता ॥ द्रुपदगृहीं ॥१५२॥
त्रयोदशावी ब्रह्मघातना ॥ जिणें क्षय केला दधीचि-ब्राह्मणा ॥ जय प्राप्त केला पंचानना ॥ निक्षेपिला त्रिपुरारी ॥१५३॥
चतुर्दशावी ते नामें मोक्षावती ॥ ते आली होती हिमाद्रीप्रती ॥ तेथें दिलीप राजा महानृपती ॥ होता तपसाधनीं ॥१५४॥
तो सूर्यवंशी राजा नृपवर ॥ सत्त्व देखोनि मानवला शंकर ॥ तो महाराज भगीरथाचा पितर ॥ नेला मोक्षपदासी तिणें ॥१५५॥
पंचदशावी ते वारगर्भधारी ॥ ते होती शेषाचे फणेवरी ॥ हिरण्याक्षें प्रहरिली क्षीरसागरीं ॥ तिये नाम वसुमती ॥१५६॥
षोडशावी ते त्रैलोक्य आनंदा ॥ कींतें शिवाची इच्छा त्रिपदा ॥ ते प्रणवीनामें चतुर्वेदा ॥ षोडशावी श्रेष्ठ ॥१५७॥
अगस्तसी वदे शिवनंदनु ॥ ऐशा या गोलोकींच्या कामधेनु ॥ नमस्कारावया पंचाननु ॥ आलिया काशीपरीसी ॥१५८॥
त्यांहीं विधियुक्त पुजिलें पंचानना ॥ यथोक्त केल्या लिंगस्थापना ॥ तरी त्या लिंगांची नामधारणा ॥ परियेसींगा अगस्ती ॥१५९॥
शिवाचा ध्वज तो महासमर्थ ॥ तेंचि प्रथम बृषभ ध्वजतीर्थं ॥ तेथीं चिया स्नानें प्राप्त मोक्षार्थ ॥ मग फळश्रुति कासया ॥१६०॥
तेथें कामधेनूंहीं स्थापिला शंकर ॥ त्यालिंगा नाम कपिलेश्वर ॥ तें कपिलधारातीर्थ अगोचर ॥ ब्रह्मादिकांसी ॥१६१॥
तेथेंचि मधुकल्पतीथ असे महाशक्ती ॥ घृतकल्पतीर्थ सुर इच्छिती ॥ क्षीरकल्पतीर्थ परमयुक्ती ॥ दुर्लभ त्रिभुवनीं ॥१६२॥
तेथेंचि गणेशें तीर्थ निर्मिलें ॥ पितामहेश्वरलिंग स्थापिलें ॥ योगिनीतीर्थ पितृतीर्थ निरूपिलें ॥ स्वामी म्हणे कुंभजातें ॥१६३॥
जीं तीर्थें कामधेनूंहीं निर्मिलीं ॥ तेथें पंचामृतें वृष्टि केली ॥ तीं क्षीरघृतकुंडें पूर्ण जाहालीं ॥ ओघ मिळाले गंगेसी ॥१६४॥
त्यांसी वर दिघला उमाशंकरें ॥ तेथें कृतयुगीं प्रवहलीं क्षीरें ॥ त्रेतायुगीं होतीं मधु आकारें ॥ द्वापारीं घृतें पैं ॥१६५॥
जैं काळ कलियुगाचा संचरे ॥ मग तेथें कवण कैसें उरे ॥ क्षीर मधु अद्दश्य एकसरें ॥ मग मृगजळ प्रवर्ते ॥१६६॥
ऐसी त्या लिंगांची स्थापना करूनी ॥ तीर्थें निर्मिलीं आनंददवनीं ॥ ऐसा कपिलीं शिव पूजुनी ॥ मग क्रमिती जाहाली गोलोका ॥१६७॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ कामधेनु क्रमिली ऊर्ध्वगती ॥ जेथें बळें चरण रुपले क्षितीं ॥ तेथें लिंग उद्भवलें ॥१६८॥
तेथें वर्तलें आश्चर्य थोर ॥ त्या लिंगा नाम खुरकर्तरीश्वर ॥ खुरकर्तरीतीर्थ अगोचर ॥ ब्रह्माइंद्रविष्णूंसी ॥१६९॥
ऐशा त्या गंगातीरीं पंचानना ॥ समस्तीं केलिय़ा लिंगस्थापना ॥ त्या परियेसीं कवण कवणा ॥ अगस्तिमुनी ॥१७०॥
मांडव्यऋषि तपोनिधि भूतळीं ॥ परी तोही घातला होता शूळीं ॥ वस्त्रजंतूचें उसनें तत्काळीं ॥ घेतलें कृतांतें ॥१७१॥
तो मुनि गेला यमपरीसी ॥ तेथें उत्कर्षें शापिलें यमाची ॥ मग तो ऋषि आला वाराणसीं ॥ स्थापिला तेणें मांडवेश्वर ॥१७२॥
तें लिंग कपिलेश्वराजवळी ॥ तेथेंचि ज्येष्ठेश्वर चंद्रमौळीं ॥ तें लिंग पूजिलिया तत्काळीं ॥ पराभवती महादोष ॥१७३॥
शतकीर्ति ऋषीचा जो कुमरू ॥ मत्स्यगंधा भोगिली तो पराशरू ॥ मग तो आला लिंगस्थापना करूं ॥ त्या नांव पराशरेश्व पैं ॥१७४॥
त्या लिंगासी वर वदला शंकर ॥ तेथें एक अंजळी स्नपितां गंगानीर ॥ तरी शरीरीं शत जन्मांचें परद्वार ॥ दहती हत्यादि दोष ॥१७५॥
जांबुवंत ब्रह्मयाचा अवतार ॥ तेणें काशीमध्यें तप केलें थोर ॥ लिंग स्थापिलें उमाहर ॥ जांबुवंतेश्वर त्या नांव ॥१७६॥
पैल ऋक्षराजयाचा कुमर ॥ तो सुग्रीव सूर्याचा अवतार ॥ तेणें काशीमध्यें स्थापिला शंकर ॥ त्या नांव सुग्रीवेश्वर ॥१७७॥
तेथेंचि भारद्वाजेश्वर अगाध ॥ अरुणेश्वर तो मोक्षाचा निध ॥ वामदेवेश्वर पूजितां सिद्ध ॥ तत्काळ होय योगीश्वर ॥१७८॥
तेथेंचि पृथ्वीश्वर पूजितां ॥ पृथ्वीसामर्थ्य होय पावता ॥ कलीनें स्थापिलें उमाकांता ॥ त्या नांव कलियुगेश्वर ॥१७९॥
षण्मुख म्हणे गा अगस्ती ॥ तेथें लिंगे स्थापिलीं कर्मजंतीं ॥ शिवकृपें आली गा कपोती ॥ तें लिंग कपोतेश्वर ॥१८०॥
आणिक परियेसीं आश्वर्य थोर ॥ जंबुकीं स्थापिला जंबुकेश्वर ॥ महार्णवींहूनि आले कुंजर ॥ तें लिंग मातंगेश्वर ॥१८१॥
तेथें आलिया अष्टदिशा ॥ त्याहीं लिंग स्थापिलें महेशा ॥ आणि आश्चर्य परियेसा ॥ तृणें तृणेंश्वर स्थापिला ॥१८२॥
स्वामी म्हणे गा महाऋषि अगस्ती ॥ ऐसीं तीर्थें लिंगे सांगों किती ॥ ह्यांच्या श्रवणपठणें होय प्राप्ती ॥ दर्शनाची त्या लिंगांचिया ॥१८३॥
य अध्यायाची फळश्रुति सांगतां ॥ परियेसीं गा मित्रावरुणसुता ॥ पंचमहादोषियां होय मुक्तता ॥ वाराणसीमार्गें ॥१८४॥
ऐसें वृषभध्वजतीर्थ काशीस्थळीं ॥ इतुकीं लिंगें तीर्थें त्याजवळी ॥ तो दिन क्रमिला जी चंद्रमौळीं ॥ वृषध्वजतीर्थीं ॥१८५॥
आतां काशीप्रवेश करील शिव ॥ अगस्तीस निरूपील कूपोद्भव ॥ शिवदास गोमा म्हणे ठेव ॥ एकाग्र परिसा कथेची ॥१८६॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे शिवकाशीप्रवेशवर्णने ढुंढिराजवर्णनं नाम एकष्टितमाध्यायः ॥६१॥
॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP