काशीखंड - अध्याय ७२ वा
स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.
॥ श्री गणेशाय नमः ॥ हिमाद्री आश्चर्य करी काशीचें ॥ म्हणें अपार सामर्थ्य गौरीचें ॥ आम्ही कल्पीतसों दीर्घत्व आमुचें ॥ तंव तें न्यून कल्पकाळीं ॥१॥
आम्हीं आणिले भांडार मुक्तामणी ॥ दीर्घ प्रयासें बहु काळ संचूनी ॥ तंव येथींच्या प्रासादीं चिंतामणी ॥ जडिले असंख्यात ॥२॥
आम्हीं वस्त्रें आणिलीं बरविया वोजा ॥ तें आंदण द्यावया कन्येच्या काजा ॥ तंव याचे प्रासादीं मिरवती ध्वजा ॥ दिव्यांबरां चिया ॥३॥
भृत्य आणिले द्यावया आंदण ॥ तंव याचे चौसष्ट कोटी गण ॥ नखाग्रें उत्पाटिती त्रिभुवन ॥ निमिषमात्रें ॥४॥
कन्या जामातां कारणें ॥ आम्हीं आणिलीं सुगंध चंदनें ॥ तंव याचे गृहीं अनंत वनें ॥ कल्प वृक्षांचीं ॥५॥
कन्या जामातां चिया ममता ॥ आम्ही आणिल्या धेनू सालं कृता ॥ तंव याचे गृहीं असंख्य गणितां ॥ दिसती काम धेनू ॥६॥
आम्हीं आणिल्या दिव्य सुंदरा ॥ तंव याचे गृहीं दिव्यांगना अप्सरा ॥ आणि षोडश सहस्त्र अवधारा ॥ गद्यपद्य निधी अवध्याही ॥७॥
आम्हीं कल्प काळीं न्यून यासी ॥ सरिता केवीं तुळें जलार्ण वासी ॥ सान गिरी तो सुवर्णा चलासी ॥ केवीं पां स्पर्धा करी ॥८॥
गौरीसी न तुळे समर्थ पण ॥ ते झालीसे त्रैलोक्य स्वामीण ॥ तियेसी काय दीजे आंदण ॥ लज्जावंत लोकीं ॥९॥
आतां ईश्वराची भेटी ॥ त्यासीं केवीं व्हावें समद्दष्टीं ॥ काय दाख विजे हे मुखवटी ॥ लज्जावंतें शिवासी ॥१०॥
आतां तो स्मरावा पंचानन ॥ तोचि क्षराक्षर सगुण निर्गुण ॥ जे साक्ष देताती श्रुति शास्त्रें पुराण ॥ ते सत्यचि कीं ॥११॥
तो प्रत्यक्ष देखिजे विश्वात्मा ॥ एवढें सामर्थ्य कैंचें जी आम्हां ॥ तो अगम्य सुरेंद्र पुरुषोत्तमां ॥ ब्राह्मादिकांसी ॥१२॥
तव पश्चिमेसी क्रमी दिवाकर ॥ अर्ध बिंबें देखिला संज्ञावर ॥ जाहाला सायंकाळ संध्या अवसर ॥ षट्कर्मिकांचा ॥१३॥
ब्राह्मणीं सारिलें संध्या स्नान ॥ दिधलें गभस्तीसी अर्ध्यदान ॥ तेणें परा भविले महा दारुण ॥ मंदेहादि महा राक्षस ॥१४॥
मग जाहाला निशीचा प्रवर्त ॥ भागीरथीस्नाना आला हिमवंत ॥ तेथें लिंग स्थापिलें उमाकांत ॥ तया नाम शैलेश्वर ॥१५॥
पाचारिला विश्वकर्मा सूत्रधारी ॥ प्रासाद उभविला बहु कुसरी ॥ कळसीं दिव्य मण्यांची ॥ प्रभा थोरी ॥ हेमबंध उभवणी ॥१६॥
शैलेश्वर नाम उभविलें प्रासादीं ॥ तो हिमाद्रीनें पूजिला साक्ष वेदीं ॥ सर्वही शैलांसी लिंग आदि ॥ अगाध पूज्यमान ॥१७॥
ऐसी रात्रींत केली उभवणी ॥ मग जे उरले रत्नमणी ॥ ते त्या शैलेश्वरा पुढें करूनी ॥ महा राशी माणिकांच्या ॥१८॥
तेथें रत्नें स्थापिला रत्नेश्वर ॥ माणिकें स्थापिला माणिकेश्वर ॥ मग रात्री माजी हिमाद्रि गिरिवर ॥ क्रमी आपुले स्थानीं ॥१९॥
मग उदय जाहाला उदया चळीं ॥ सूर्य़कर प्रवाहले भूतळीं ॥ तंव प्रासाद देखिला तेजाळी ॥ शिवा चिया गणीं ॥२०॥
तो प्रासाद देखोनि आनंदले ॥ एक शिवासी सांगावया गेले ॥ तंव शंकर होते बैसले ॥ त्रिलोचनेश्वरीं ॥२१॥
शैलादि गण वदे जी स्मरारी ॥ प्रासाद उभविला जी रात्री माझारी ॥ रत्नमणी जडिले बरव्या परी ॥ प्रासाद मंडळी ॥२२॥
सायंकाळवरी नव्हता देखिला ॥ रत्नीं प्रकाशतांचि द्दश्य जाहाला ॥ उत्तर मानसीं असे निर्मिला ॥ जैसा भूमीं कैलास ॥२३॥
ऐसें परिसोनि दूतवचन ॥ मग उत्कंठित जाहाला पंचाचन ॥ सज्ज करविला निज वहन ॥ त्रिविधाकार नंदी ॥२४॥
मग भवानीसी वदे शंकर ॥ वेगें चलावें सज्जिला नंदिकेश्वर ॥ उत्तर मानसीं प्रासाद थोर ॥ कवणें निर्मिला असे ॥२५॥
मग शैलेश्वरा आलीं उमा हर ॥ रचना देखिली परिकर ॥ मंडपीं नंदी करो नियां स्थिर ॥ शिव गेला प्रासादीं ॥२६॥
तंव अक्षरें देखिलीं प्रासाद मंदिरीं ॥ गणां करवीं पढवी त्रिपुरारी ॥ येथें आला होता हिमाद्रि गिरी ॥ तेणें स्थापिलें लिंग ॥२७॥
तंव विश्वनाथ वदे दाक्षायणी ॥ कैसी हे प्रासादाची उभवणी ॥ रत्नमणी जडिले खाणो खाणीं ॥ यथोक्त पंक्तीं ॥२८॥
मग तीं अक्षरें पाहे शैलजा ॥ जांबूनदीं लिहिलें बरविया वोजा ॥ म्हणे येथें येणें जाहालें होतें पूर्वजा ॥ हिमाद्रीसी पैं ॥२९॥
यानंतरें शिव म्हणे गोरीसी ॥ हिमाद्रीनें वंचिलें आम्हांसी ॥ येथें येऊनि सहपरिवारेंसीं ॥ भेटी न घेचि आमुची ॥३०॥
तेणें दीर्घ आवगिलें थोरिवें ॥ म्हणोनि आम्हां न भेटे स्वभावें ॥ बोलों इतुकें सरतांचि महा देवें ॥ तंव प्रार्थिती जाहाली गौरी ॥३१॥
हैमवती वदे जी महारुद्रा ॥ हा स्वभाव नाही जी गिरींद्रा ॥ तेणें कल्पिलें पूर्ण भद्रा ॥ परिसा जी सदा शिवा ॥३२॥
तेणें जाणोनि आपुलें न्य़ूनपण ॥ मग तो न घे तुमचें दर्शन ॥ एवढें सुफळ भाग्य त्याकारण ॥ कैंचें जी शिवा ॥३३॥
पाहातां तुच चिया चतुरर्था ॥ केवीं पां स्पर्धा तुळे त्या गिरिनाथा ॥ ऐसें तुम्हां जाणोनि विश्वनाथा ॥ शंकला हिमाद्री ॥३४॥
जरी तुम्हांसी न भेटता अहं भाव ॥ तरी लिंग स्थापण्याचा काय स्वभाव ॥ इतुकें परिसोनि महा देव ॥ हास्य केलें पंचाननें ॥३५॥
तंव प्रार्थिला हैमव तीनें ॥ हें लिंग स्थापिलें माझे पतयानें ॥ तरी स्वामी या लिंगा कारणें ॥ पूर्ण वर दीजे तुम्हीं ॥३६॥
मग शिव पार्व तीचे उत्तरा ॥ वर देता जाहाला त्या शैलेश्वरा ॥ शिव म्हणे गा शैलादि गण वीरा ॥ परियेसीं लंबोदरा साक्ष तूं ॥३७॥
असिजे दूर देशांतरीं जाणा ॥ कल्पिजे शेलैश्वराचे स्मरणा ॥ तरी त्रिविध ताप मुक्ति सर्व जनां ॥ होइजे तेचि क्षणीं ॥३८॥
शैलेश्वराचें कीजे दर्शन ॥ तोय पुष्पीं कीजे पूजन ॥ तरी कोटि जन्मांचें दोषदहन ॥ होय तेचि क्षणी ॥३९॥
शैलेश्वर पूजिजे स्वस्थमन ॥ तेथें समर्पिजे सवत्स गोदान ॥ शक्तीं दीजे मुष्टि धान्य ॥ परियेसीं तें पुण्य ॥४०॥
जंव शैलेश्वर काशी मधीं ॥ जंव पृथ्वी मध्यें सप्तही उदधी ॥ तंववरी वोळंगती अष्टही सिद्धी ॥ कैला सदेव सभे ॥४१॥
जे अष्ट कुला चल धरिती मेदिनी ॥ दिक्पतींनीं धरिली अष्ट कोनीं ॥ त्रिशतें साठी गंगा पुण्य जीवनीं ॥ ते या लिंगाची शक्ती ॥४२॥
दक्षिणेचा जो त्रिशंख नाम धरू ॥ उत्तरेचा उत्तान चरण कुमरू ॥ त्यासी आठ कोटी योजनें व्योमीं धुरू ॥ तया लिंगाची शक्ती ॥४३॥
नव ग्रह त्वरावंत गमन ॥ मेरु प्रदक्षिणेसी करिती भ्रमण ॥ ते बळवंत शक्ति परिपूर्ण ॥ या लिंगा चेनि पैं ॥४४॥
विश्वनाथ वदे गौरी प्रती ॥ या लिंगाचा महिमा सांगों किती ॥ स्वामी म्हणे गा ऋषी अगस्ती ॥ परियेसी आश्चर्य थोर ॥४५॥
जैं नव्हतीं पंच महा भूतें ॥ तैं हें लिंग सप्तपाताळीं होतें ॥ आणि या लिंगा चिया मन्मतें ॥ होतीं लिंगें दोनी ॥४६॥
तो रत्नेश्वर माणिकेश्वर प्रसिद्ध ॥ हीं त्रयलिंगें पाताळीं होतीम अगाध ॥ परी हिमाद्रीचे भक्तीस्तव प्रसिद्ध ॥ प्रकटलीं मृत्यु मंडळीं ॥४७॥
शैलेश्वराहूनि द्क्ष गुण ॥ या रत्नेश्वराचा महिमा जाण ॥ त्याहूनि लक्षशत गुण ॥ माणिकेश्वर तो ॥४८॥
स्वामी म्हणे गा ऋषी अगस्ती ॥ या लिंगाचा महिमा सांगों किती ॥ मग तेथेंचि उमा पशुपती ॥ राहिलीं अद्यापि ॥४९॥
आतां तुझा मनोरथ मज भासला ॥ कथेपरीस तूं श्रोता वहिला ॥ आतां जो अर्थ असे इच्छिला ॥ तो प्रश्नी वेगेंसीं ॥५०॥
ऐसें षडाननाचें प्रत्युत्तर ॥ ऋषीनें ऐकिलें शुचिकर ॥ मग त्याचा जो वियोग अंगार दाखवी अधिकत्व पणें ॥५१॥
अगस्ति वदे जी कृपा निधी ॥ षडानना स्वामी सर्व सिध्दी ॥ एक प्रश्नितों मी मंद बुद्धी ॥ अल्प विवेकी मी ॥५२॥
वियोगवन्हीचें उष्णत्व पण ॥ तें शरीरासी करीतसे दहन ॥ तेथें समर्पि तोसी अवदान ॥ शिव कथा मृताचें ॥५३॥
तें याग कुंड झालें माझ्या शरीरीं ॥ तेणें तेजें संसप्त झालों भारी ॥ तरी शिव कथा मृत समुद्रा भीतरी ॥ प्राप्त करीं मज ॥५४॥
त्या वियोगत माचा तूं दिनोदय ॥ निमिष मात्रें करिसील क्षय ॥ तेणें मज प्राप्त होईल जय ॥ अविमुक्तियात्रेचा ॥५५॥
तरी परिसा जी शिव नंदना ॥ अष्ट दश भुजा भुवना ॥ पृच्छा परिहारा महा प्राज्ञा ॥ उरगरिपुयानी ॥५६॥
तरी काशी मध्यें दुर्गा भवानी ॥ महादैत्यारी ते दीर्घ दाक्षा यणी ॥ हे कैसी निर्मिली दीर्घदोष दहनी ॥ तें निरूपा जी मज ॥५७॥
मग वदता झाला तो षड्वक्री ॥ म्हणे परिसें गा ऋषि महा मंत्री ॥ हे दुर्गा भवानी प्रत्यक्ष क्षेत्रीं ॥ काशीच्या ठायीं ॥५८॥
परियेसीं तियेचें मूळ अवसान ॥ श्रोतीं एकाग्र कीजे श्रवण ॥ महाक्ले शांसी होतसे दहन ॥ आजन्म पर्यंत ॥५९॥
दिति काश्यपांचे जे कुमर ॥ हिरण्य कशिपु हिरण्याक्ष असुर ॥ या दोघांसी दोन पुत्र महाधीर ॥ झाले महाद्भुत ॥६०॥
हिरण्य कशिपूचा प्रल्हाद हरि भक्त ॥ हिरण्याक्षा पासूनि झाला रौरवदैत्य ॥ त्या रौरवा पासूनि जन्मला सुत ॥ त्या नांव दुर्गा सुर ॥६१॥
तेणें उग्र तप केलें दारुण ॥ मग प्रसन्न झाला चतुरानन ॥ दुर्गा सुरासी दिधलें वरदान ॥ विरिंचिदेवें ॥६२॥
तूं होसी रे त्रैलोक्याधिपती ॥ शक्र अव्हेरील अमरावती ॥ तुझिया आयुष्याची जे गती ॥ ते निरोपूं तुज ॥६३॥
स्वर्ग मृत्यु पाताळ भुवनीं अधिकारी नाहीं तुजहुनी ॥ जो अत्यंत वीर पौढ त्यालागुनी ॥ अजित तूं ॥६४॥
स्वर्ग मृत्यु पाताळांचे पोटीं ॥ जे जे वीर महाहटी ॥ विमुख होती तुझिया द्दष्टीं ॥ स्त्रियांवां चुनी ॥६५॥
आणि हरी विरिंचि शिव ॥ यांचा तूं करिसील परा भव ॥ मग येर सुरगणांचा ठाव ॥ उरेल कैसा ॥६६॥
ऐसा विरिंचि देवाचा पूर्ण वर ॥ होतां आनंदला रौरव कुमर ॥ मग पृथ्वी पालटी तो असुर ॥ वरदानबळें ॥६७॥
ध्यावया पूर्वजांचें उसण ॥ दुर्गा सुरें हांकारिलें सैन्य ॥ आलीं दैत्यदळें दारुण ॥ दुर्गा सुराजवळीकें ॥६८॥
आलीं दैत्यदळें महात्वरें ॥ कीं व्योमीं जैसीं गंधर्वनगरें ॥ आलीं आपुलाले मेळिकारें ॥ दळें पाताळ पुटींचीं ॥६९॥
मग जो भृगूचा कुमरू ॥ जो दळाधिपती दैत्य गुरू ॥ तो शुक्र नाम अधिकारू ॥ संजीवनी मंत्राचा ॥७०॥
तो दुर्गा सुरासी कथी विचार ॥ म्हणे आले जी महा असुर ॥ आतां किमर्थ करितां उशीर ॥ पृथ्वी जिंकावया ॥७१॥
सत्रा नरकास्रुर महाबळी ॥ जेणें युद्धीं मानविला चंद्र मौळीं ॥ ताल जंध नामें पाताळीं ॥ तोही आला स्वभारेंसीं ॥७२॥
कपिस्कंध आला गजोदर ॥ नमुचि दैत्य करटासुर ॥ कुंभकर्ण आणि कुंभोदर ॥ आले मेळिकारेंसीं ॥७३॥
चरणाक्ष आला दमचंड ॥ भस्मासुर गज कर्ण राहु स्कंद ॥ हय ग्रीव खंडद्शन प्रचंड ॥ आले महाबळी ॥७४॥
आतां असो हे नाम गुण वाणी ॥ हें सांगतसे एक नयनी ॥ तंव दुर्गा सुराची दीर्घध्वनी ॥ गर्जिली वाद्योत्तरें ॥७५॥
निघाले महा असुर बळी ॥ कंपाय मान झाली महीतळी ॥ कीं वृष्टि व्हावया पूर्णजळीं ॥ उद्भवलीं अभ्रें ॥७६॥
कीं अष्ट कुलाचल एक झाले ॥ हिमालयाग्रीं स्वयंवरासी आले ॥ तैसे दैत्य भार आनंदें निघाले ॥ अमर पुरावरी ॥७७॥
दुर्गा सुरें वेढिली अमरावती ॥ इंद्रें जाणोनि तयाची शक्ती ॥ युद्ध ध्यावयासी केली सज्जुती ॥ महा शस्त्रांची ॥७८॥
शक्रें हांकारिले दिक्पती ॥ आधीं गुरु आला वाचस्पती ॥ अश्व पालाणूनि शुभ्र कांती ॥ आला मंत्र सिध्दी तो ॥७९॥
अग्नि यम वरुण निशाकर ॥ सोम सूर्य मारुत कुबेर ॥ तेहतीस कोटी देव सुरेश्वर ॥ प्रवर्तले युद्धासी ॥८०॥
अपार त्या दुर्गा सुराची शक्ती ॥ के उता गीर्वाण सुरपती ॥ सविस्तर सांगों जरी युद्धगती ॥ तरी ग्रंथ विस्तारेल ॥८१॥
वेद शास्त्रें बोलती महा हुकारें ॥ तीं दर्भुतुल्य मानिलिं असुरें ॥ जैसें तरु पर्ण वाता गिरिवरें ॥ शरीरें मानिजे ॥८२॥
उचलिती शिळा महागिरी ॥ दैत्य टाकिती सुरसेनेवरी ॥ देवांसी आकान्त जाहाला भारी ॥ पडिले मूर्च्छित तत्काळ ॥८३॥
त्यांसी देव गुरु उपचारिता ॥ निघालासे द्रोणा गिरिपर्वता ॥ अमृतवल्ली आणोनियां मागुता ॥ उठवी देवां प्रती ॥८४॥
शुक्र म्हणे परियेयीं माझा संकेत ॥ सकळ असुर ते आज्ञाकित ॥ देव जे जे होती प्राणातीत ॥ त्यां उपचारूनि उठवी बृहस्पती तो ॥८५॥
तो गेला द्रोणपर्वता ॥ ऐसी वार्तिकीं आणिली वार्ता ॥ तरी दैत्याधिपा ऐसियासी आतां ॥ देखिजे विचरणा ॥८६॥
ऐसें अनुवादला एक नयनी ॥ मग असुर काय करी ते क्षणीं ॥ दैत्यें पाठविले कोटि दोन्ही ॥ धरावया बृहस्पतीसी ॥८७॥
गुरु आणितां अमृत औषधी ॥ दैत्यें हरिलिया सर्व सिद्धी ॥ मग बांधोनिधी नेला तो मंत्रनिधी ॥ देव गुरु ॥८८॥
भृत्यांकरवीं पाविला पाताळा ॥ तेथें दुर्गासुरा चिया बंदिशाळा ॥ तेथें गुरु बद्ध केला शृंखळा ॥ लावूनियां गात्रीं ॥८९॥
तंव देवांसी जाणविली वार्ता ॥ म्हणती गुरु गेला होता पर्वता ॥ तो दैत्यांनीं नेला औषधी आणितां ॥ बंदीं घातला पाताळीं ॥९०॥
ऐसें जंव सांगती वार्ताहर ॥ तंव उठावले अस्रुरभार ॥ शक्तिमंद जाहाले सर्वही सुर ॥ नेला देवगुरु ॥९१॥
तंव पुढें जाहाले अष्टही दिक्पती ॥ यम वरुण तरणी तारापती ॥ मारुत कुबेर दिव्य दीप्ती ॥ कृशानु तो ॥९२॥
त्यांहीं युद्ध केलें महाद्भूत ॥ तें असो आतां सांगों संकलित ॥ नमुचि कपिस्कंदें समस्त ॥ धरिले प्राणें स्वस्थ पैं ॥९३॥
तेव्हां सहस्त्राक्ष जाहाला पुढारी ॥ ऐरवत प्रेरिला महागिरी ॥ यानंतर दुर्गासुर काय करी ॥ तें परिसा श्रोते हो ॥९४॥
ऐरावत धरिला वामकरीं ॥ तो सहज टाकिला सिंधुतीरीं ॥ कंपायमान झाली धरित्री ॥ क्षितीं आणिला शक्र तो ॥९५॥
तो धरिलासे नरकासुरें ॥ मग काय केलें जयंत कुमरें ॥ वाजी आणिला महात्वरें ॥ पाचारी दैत्यांसी ॥९६॥
तंव धांवला द्रुमचंड ॥ दक्षिणकरीं तुळित वज्रदंड ॥ तो महागिरी जैसा प्रचंड ॥ सिंहनादें गर्जतसे ॥९७॥
दोघे झुंजिन्नले महाबळी ॥ जयंत पाडिला क्षितितळीं ॥ बांधोनि आणिला इंद्राजवळी ॥ मागिल्या हस्तीं ॥९८॥
ऐसे सर्व सुर जिंकिले दैत्यीं ॥ दुर्गासुरें घेतली अमरावती ॥ सप्तद्वीपवतीचे जे नृपती ॥ केले शरणागत ॥९९॥
ऐसे क्रमिले सहस्त्र संवत्सर ॥ इंद्रपद भोगिते जाहाले असुर ॥ मग आरंभिते जाहाले विचार ॥ शुक्राचार्यांसीं ॥१००॥
दुर्गासुर वदे जी भार्गवा ॥ आपण परा भविलें देवां ॥ आतां ठावूकें करावें महादेवा ॥ आणि पुरुषोत्तमा ॥१०१॥
तंव भार्गव वदे दुर्गासुरासी शिव पंचानना तो कैलासीं ॥ शार्ङ्गधर तो क्षीरर्णवासी ॥ शेषपृष्टीं निद्रित ॥१०२॥
तरी परिस जी रौरवसुता ॥ मृत्यु मंडळीं चिया पुर्या समस्ता ॥ त्या जिंकिल्या परी एक आतां ॥ राहिली वाराणसी ॥१०३॥
तेथें सर्व गणेंसीं त्रिपुरारी ॥ सांपडेल तो विरिंची हरी ॥ मग त्रैलोक्या माझारी ॥ तूंचि स्वामी ॥१०४॥
ऐसें भार्गव कथी ॥ दुर्गा सुरा ॥ तंव देवांगना आलिया अप्सरा ॥ गंधर्व कुमारी विद्याधरा ॥ नृत्य करिती शुभ गुणा ॥१०५॥
तेथें सभाधीश दुर्गासुर ॥ जैसा भद्रजातींमाजीं महा कुंजर ॥ कीं पर्वतां मध्यें महाथोर ॥ हिमाल्य तो ॥१०६॥
मग श्रूति फुंकिल्या किन्नरीं ॥ सरी ठाकळ्ले टाळधारी ॥ तंव त्रिग्रामीं गर्जती विद्याधरी ॥ वसंत तो ॥१०७॥
आतां असो हे गंधर्व गायनी ॥ नृत्य कारियांची झाली पैखणी ॥ त्यांसी दुर्गासुरें बहु सन्मानीं ॥ दिधलीं वस्त्रें अलंकार ॥१०८॥
मग सर्वभारेंसीं दुर्गासुर ॥ ते उतरले मेरूच्या पाठारावर ॥ शुक्राचार्य संजीवनीधर ॥ महामंत्री सिद्ध ॥१०९॥
ऐसे आले आनंदवना ॥ ते पंचक्रोशी चिया भुवना ॥ दुर्गासुरें देखिली रचना ॥ कशीपुरीची ॥११०॥
दैत्य प्रवाहले पृथ्वीवरी ॥ त्यांहीं विध्वांसिले ऋषी ब्रह्मचारी ॥ ते यागकर्ते गिरिकंदरीं ॥ रिघाले वेगें ॥१११॥
तंव त्रिदेवीं केला एक विचार ॥ या दुर्गासुरासी असे वर ॥ स्त्रियांवांचूनि जितुका नर ॥ त्यांसी अजिंक्य हा ॥११२॥
ऐसें हरि विरिंची विचारिती ॥ शिवाजवळी वृत्तान्त कथिती ॥ एक योजिली असे युक्ती ॥ दैत्यासी वधावयाची ॥११३॥
तुमची अंगना जी निज प्रिया ॥ शिवा ते शैलजा महामाया ॥ तीं देवी वेदवाक्यें जोजिली यया ॥ दुर्गा सुराच्या हननीं ॥११४॥
तरी शिवा दैत्यकुलाचलावरी ॥ भवानी वज्र मोकलीं झडकरी ॥ दैत्यदळ कुंजरासी केसरी ॥ नाहीं अंबोविण ॥११५॥
हेचि जी दैत्यवन कुठार ॥ हेचि दैत्यतमा दिवाकर ॥ दैततृण जाळावया अंगार ॥ आणिक नाहीं शिवा ॥११६॥
दुर्गा सुराचे शक्तिपुटीं ॥ बंदीं घातले देव तेहतीस कोटी ॥ त्यांसी जय देऊनि निरवडी ॥ करील हे सत्य ॥११७॥
मग शिव आज्ञा घेऊनि हेमवती ॥ रथीं आरूढली महा शक्ती ॥ मग कैसी आंर भिला सज्जुती ॥ युद्धाची तिनें ॥११८॥
जो शिवाचा त्रिशूळ त्र्यंबक ॥ तें भवानीनें वाहिलें पिनाक ॥ मंत्र विधिनें घेतले अनेक ॥ जे होते शिवा जवळी पैं ॥११९॥
ल्याली शिवाची सर्व भूषणें ॥ मग सखियांसी केलें हांकरणें ॥ जेथें पंचक्रोशीचें होतें प्रमाण ॥ तेथें आली रथारूढ ॥१२०॥
अठयायशीं आणिल्या काळरात्री ॥ दीर्घदशनी विक्राळवक्री ॥ त्या पिंगटजटा विशाळनेत्री ॥ आल्या स्वभारेंसीं ॥१२१॥
आल्या महा याक्षिणी जाखिणी ॥ भैरव आले विकटाननी ॥ महादेवी आल्या योगिनी ॥ चौसष्ट कोटी ॥१२२॥
आल्या छपन्न कोटी चामुंडा महामाया ॥ त्या भवानीच्या गात्रीं उद्भवलिया ॥ महापराक्रमी आथिलिया ॥ दीर्घयक्षिणी पैं ॥१२३॥
ऐसें जुडले शक्तींचे भार ॥ भवानी अवलोकी अस्रुर ॥ जैसे अष्ट कुलाचल गिरिवर ॥ वेढिली पंचक्रोशी ॥१२४॥
दुर्गा सुराची अद्भुत शक्ती जाणा ॥ इंद्रादिक घातले आंकणा ॥ तो पावता झाला अवसाना ॥ आयुष्या चिया ॥१२५॥
सहस्त्र वर्षें केली तप साधना ॥ मौनें आराधिलें चतुरानना ॥ मग स्वामी केला त्रिभुवना ॥ दहा सहस्त्र वर्षें ॥१२६॥
द्विसहस्त्र वर्षें तपत होता पाताळीं ॥ त्रिसहस्त्र वर्षें होता मृत्यु मंडळीं ॥ जें इंद्रपद भोगिलें आनंदकल्लोळीं ॥ पंचसहस्त्र वर्षें ॥१२७॥
आतां आलासे मृत्यूचे घडे ॥ जैसा पतंग दीपज्वाळेवरी पडे ॥ कीं दीपघटीं सांपडे ॥ कुरंग जैसा ॥१२८॥
तरी पंचक्रोशीचे प्रमाणी ॥ सज्ज झालीसे भवानी ॥ असुरभार देखतसे नयनीं ॥ जैसें प्रळयीं अंबु ॥१२९॥
आतां सावधान जी श्रोतोत्तमां ॥ हे कथा परिसा पुण्यागमा ॥ सत्य मिथ्या मज करा क्षमा ॥ म्हणे शिव दास गोमा ॥१३०॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दुर्गासुरविजयवर्णनं नाम द्विसप्ततितमाध्यायः ॥७२॥
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु
॥ इति द्विसप्ततितमाध्यायः समाप्तः ॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2011
TOP