मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|काशी खंड|
अध्याय ६३ वा

काशीखंड - अध्याय ६३ वा

स्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.


॥ श्री गणेशाय नमः ॥ स्वामी म्हणे गा मित्रावरूणसुता ॥ ऐसी विश्वकर्म्यासी वर्तली चिंता ॥ तंव कोणी एक तापसी अवचितां ॥ द्दश्य जाहाला तयासी ॥१॥
दुरोनि येतां देखिला जी कैसा ॥ कोटी विद्युल्लता न तुळती प्रकाशा ॥ कीं मार्तंड उजळला पूर्वदिशा ॥ तैसा येतां देखिला ॥२॥
विश्वकर्मा देखतसे ऋषीश्वर ॥ म्हणे कोण हा महातपीश्वर ॥ कीं या नाम व्योमीं दिवाकर ॥ उदेला अकस्मात ॥३॥
कीं हा होईल महगुरूत्तम ॥ कीं हा पंचानन दग्धी काम ॥ कीं फेवया माझे चित्ताचा भ्रम ॥ द्दश्य जाहाला मज ॥४॥
कीं हा माझिया पूर्वार्जिताचा शैल ॥ कीं माझिया चिंतार्णवा वडवानळ ॥ कीं हा धन्वंतरी महाचिंताव्याळ ॥ निर्विष करावया ॥५॥
असो जवळी आला तो मुनी ॥ देखूनि विश्वकर्मा हर्षला मनीं ॥ मग नमस्कार केला त्या चिया चरणीं ॥ क्षितीं मौळीं ठेवूनियां ॥६॥
विश्वकर्मा वदे जी मुनिवरा ॥ तूं मज अनाथाचिया दातारा ॥ महा पृच्छे चिया परिहारा ॥ द्दश्य जाहालासी मज ॥७॥
तरी अवधारा जी माझा प्रश्न ॥ मी बंधांत असें गुरूच्या ऋणें करून ॥ तरी तें मुक्त करावया बंधन ॥ सांगिजे उपाय मज ॥८॥
तंव बोलिला तो महा ऋषी ॥ विश्वकर्म्या तूं कासया शिणसी ॥ जंव सेविली नाहीं ते वाराणसी ॥ तंवचि बंधन तुज ॥९॥
त्रैलोक्यांत दुर्लभ तें शिवस्थान ॥ जेथें पंचत्व इच्छिती गीर्वाण ॥ तें सिद्धिदायक वन ॥ काशीपुरी ते ॥१०॥
कोणे विषयींची नाहीं चिंता ॥ तेथें सिद्धि स्फुरलिया बहुता ॥ तेथीं चिया सामर्थया निष्फळता ॥ स्वन्पींही नाइकिजे ॥११॥
त्रिलोकीं तें अगाध स्थळ समर्थ ॥ तेथें सिद्धि होईल गा सर्वार्थ ॥ सुफळ व्हावया मनोरथ ॥ न देखोंचि ऐसी पुरी ॥१२॥
तापस वदे गा चिंतातुरा ॥ तुवां प्रश्न केला बरवा साचारा ॥ तरी माझिया सत्यार्थ विचारा ॥ अंगीकारीं तूं ॥१३॥
सत्य मिथ्या प्रश्र करी भलतैसा ॥ परी निरूपिता नव्हे पिसा ॥ अनृत कथितां प्राप्त होय फांसा ॥ कृतांताचा ॥१४॥
म्हणूनि वेदांचें अगोचर भाषण ॥ पुराणीं पाहतां प्रत्यक्ष प्रमाण ॥ तो शब्द केला जी निरूपण ॥ विश्वकर्मिया तुज ॥१५॥
विश्वनाथाची भक्ति करीं ॥ निर्वाणाची खाणी ते काशी पुरी ॥ सद्धाव कल्पोनि अंतरीं ॥ सेवीं आनंदवन ॥१६॥
तेथें मुक्ति पावताती पशुजंतु ॥ मग तुझा मनोरथ तो किंचितु ॥ जैसा परीस वेधी सप्तधातु ॥ तैसी तत्काळ सिद्धि ॥१७॥
मग तो विश्वकर्मा आणि ऋषी ॥ वेगें येते जाहाले वाराणसीं ॥ नमस्कारावया काशी नाथासी ॥ विश्वंभर जो ॥१८॥
मग विश्वकर्मा लिंगस्थापना करी ॥ षोडशोपचारीं पूजा करी ॥ तप साघ्य केलें बहुकाळवरी ॥ विश्वकर्मेश्वरीं ॥१९॥
नित्य मणि कर्णिकेचें स्नान ॥ विश्वकर्मेश्वरीं पूजन ॥ ऐसें तेणें केलें जी अनुष्ठान ॥ शत एक संवत्सर ॥२०॥
मग तो कैवल्याचा दानी ॥ लिंगीं प्रकट जाहाला शूळपाणी ॥ विश्वकर्म्या नाभीं नाभीं नाभीं म्हणोनि ॥ द्दश्य जाहाला ॥२१॥
म्हणे माग माग रे गुरु भक्ता ॥ तुज मी प्रसन्न जाहालों आतां ॥ तरी या काशी पुरीसी असतां ॥ चिंता बाधेल कवणातें ॥२२॥
तूं गुरूचिये भक्तीसी तत्पर ॥ गुरू भक्तीस्तव पूजिला शंकर ॥ तरी प्राप्त जाहालासी अभय वर ॥ मजपासाव तूं ॥२३॥
तूं जें जें मागसी ये काशीस्थळीं ॥ तें तुज प्राप्त करीन तत्काळीं ॥ तुज न द्यावें ऐसें कोणे काळीं ॥ न वाटे मज मानसीं ॥२४॥
तुझें भविष्य कळलें आम्हांसी ॥ तूं सूष्टीचें मंडन करिसी ॥ सर्व कळसूत्रविद्या तुजसी ॥ समर्पीन आतां मी ॥२५॥
तुज नाम ठेविलें विश्वकर्मा ॥ तूं सृष्टिकर्ता होसी द्वितीय ब्रह्मा ॥ त्रैलोक्याचे सूत्रधारकर्मा ॥ अधिकार तुझा ॥२६॥
सर्व देव ऋषि अमरगण ॥ तुज श्रेष्ठ केला म्यां पूर्ण ॥ जैसा वासुकी मौळीं देदीप्यमान ॥ कौस्तुभ होता ॥२७॥
तो मंदरा चलावा अंतर्जात ॥ वक्षःस्थळीं मिरवी लक्ष्मीकांत ॥ तैसा तूं विरिंचिनाथाचा सुत ॥ वंध केलासे देवां मध्यें ॥२८॥
इतुकें प्राप्त केलें गा तुज प्रती ॥ आतां माग भासे जे तुझें चित्तीं ॥ इतुकें अनुवादला पशुपती ॥ विश्वकर्म्यासी ॥२९॥
तंव वदता जाहाला विश्वकर्मा ॥ जें तुझें स्मरण पुरुषोत्तमा ॥ सुरेंद्र विधीं चिया मनोधर्मा ॥ सुफळकर्ता तूं ॥३०॥
हे निजप्रिया तुमची काशी ॥ येथें मुक्ति होतसे सर्व जंतूंसी ॥ मग ते मुक्ति नरां मानवांसी ॥ कां प्राप्त नोहे ॥३१॥
प्रलयीं अविनाश हे अविमुक्ती ॥ ऐसें आम्हां समजलें वेदांतीं ॥ अष्टादश पुराणें हेंचि बोलती ॥ अविनाश काशी ॥३२॥
महार्णवींचीं पशुजंतें ॥ तींही तेथें प्राप्त होती निर्वाणातें ॥ ऐसीं महा ऋषींचीं अगाध मतें ॥ ऐकिलीं आम्हीं ॥३३॥
विश्वकर्मा म्हणे जी त्रिनयन ॥ जैसा महारण्यीं असतां तरुचंदन ॥ तो जैसा आपुले गुण प्रमाण ॥ तरी आपणा सारिखे वृक्ष ॥३४॥
कीं जैसीं सप्तद्वीप्वतीचीं नीरें ॥ समुद्रीं मिळती प्रत्यक्षाकारें ॥ तीं शुभा शुभ परी सागरें ॥ केलीं आपणा सारिखीं ॥३५॥
पृथ्वी जनांचे शुभा शुभ दोष ॥ ते स्वर्ग सरितेचे होतील ग्रास ॥ सर्व ही भक्षितां नाहीं प्रयास ॥ त्या गार्हपत्याग्नीसी ॥३६॥
कीं जैसा जलार्णव सागर ॥ विपत्ति साहोनि केला उपकार ॥ रत्नें देऊनियां सुरेश्वर ॥ संतोषित केला ॥३७॥
कीं जैसा तो द्रोणाद्रि उपकारी ॥ अमृतवल्ली समर्पी देवां माझारी ॥ तो समुद्रीं टाकिला महा असुरीं ॥ साहिली विपत्ति तयानें ॥३८॥
कीं जैसी हे पृथ्वी परोपकारी ॥ सप्त समुद्र अष्टकुला चल गिरी ॥ कीं शेषें फणेवर धरिली धरित्री ॥ घेतलासे सर्व भार ॥३९॥
कीं जैसा तो कर्दमसुत ॥ जल वृष्टि पृथ्वी वरी करीत ॥ तो परोपकारीं न विचारीत ॥ पात्र अपात्र ऐसें ॥४०॥
तैसाचि परोपकारी समीर ॥ कीं मेरुप्रदक्षिणा करी दिवाकर ॥ तमासी ग्रासूनि परोपकार ॥ करी सर्व जंतूंसी ॥४१॥
ऐसी वाखाणूं तुमची स्तुती ॥ तरी हें तुमचेंचि देणें पशुपती ॥ तुम्हींचि निर्मिली हे अविमुक्ती ॥ परोप कारार्थ ॥४२॥
तेथें तार कब्रह्म तुमचें गुरुत्व ॥ ये अविमुक्तीचें अत्यंत सत्त्व ॥ आणि मणि कर्णिकेचें थोर महत्त्व ॥ ऐसा तूं त्रिशुद्धी ॥४३॥
येथें मुक्ती होतसे सर्व जीवां ॥ पशु कर्मजंतु नरां मानवां ॥ एकचि उपदे शगुरु सर्वां ॥ प्राप्त कर्ता तूं ॥४४॥
ऐसा तूं विश्वनाथ अगोचर ॥ हरि-विरिंचीं सकळ पार ॥ आतां मज स्मरावया पूर्ण वर ॥ ते तुम्हां आधींचि स्मरतसें ॥४५॥
दीर्घ वर मागणें तुम्हां श्रुत ॥ आतां माझी वांच्छा शेष किंचित ॥ ते सुफळ करावया त्वरावंत ॥ बहु जी तुम्ही ॥४६॥
विश्वकर्मा म्हणे जी त्रिनयना ॥ जे म्यां केली येथें लिंगस्थापना ॥ त्या लिंगा चिया पूजा विधिस्नपना ॥ येती जे महाभक्त ॥४७॥
मज प्राप्त केला जैसा पूर्ण वर ॥ तैसाचि द्यावा त्यांसी नाभीकार ॥ शिवा हा युगा नुयुगीं प्रतिकार ॥ असों दीजे येथें ॥४८॥
शिव म्हणे गा ब्रह्म कुमरा ॥ तूं प्राप्त झालासी इच्छितवरा ॥ आतां या लिंगा चिया प्रतिकारा ॥ असों दींजे येथें ॥४९॥
आतां तूं जाई गुरू चिया भेटी ॥ गुरु दक्षिणा देऊनि करीं संतुष्टी ॥ मग विद्या सर्व रत्नांची पेटी ॥ साध्य होईल तुज ॥५०॥
सर्व विद्याभ्यास कीजे गुरु पासीं ॥ गुरु दक्षिणा अप्राप्त गुरुसी ॥ तंव वरी विद्या निष्फळ शिष्यासी ॥ जिर्जरीं असाध्य ॥५१॥
तरी परिसें गा विधि कुमरा ॥ विद्या निष्फळ असारा ॥ जैसे त्या इक्षुदंड आणि पोखरा ॥ फळ अफळिता ॥५२॥
कीं शाखा-पत्र-पुष्पविरर्हित द्रुम ॥ कीं गोदुग्धविराहित होम ॥ कीं सोम-सूर्यांविरहित व्योम ॥ कीं जळें विण सरिता ॥५३॥
कीं जैसें मंत्र विरहित अवदान ॥ कीं जैसें अंबरा विरहित चांदण ॥ कीं ज्ञान विरहित लावण्य ॥ वृथाचि निष्फळ ॥५४॥
कीं जैसा पक्षेंविण पक्षीश्वर ॥ कीं प्रभु विरहित जैसें नगर ॥ कीं आत्मयाविण शरीर ॥ वृथाचि असाध्य ॥५५॥
तैशा गुरु दक्षिणेविण विद्या ॥ त्या सर्वत्रीं नव्हती वंद्या ॥ सुफळ नाहीं विद्या ॥ महत्त्व केलिया विण ॥५६॥
मग विश्वकर्मा गेला गुरुभेटी ॥ गुरुकांतापुत्र केले संतुष्टी ॥ प्रसन्न करूनियां धूर्जटी ॥ सुफळ केली विद्या ॥५७॥
स्वामी म्हणे गा अगस्ति ऋषी ॥ मग अत्यंत रचना काशी ॥ अद्यापि विश्वकर्मलिंगापाशीं ॥ ध्यानस्थ असे सदाशिव ॥५८॥
तंव अगस्ति वदे जी शिवसुता ॥ माझे करीं सुफळ मनोरथा ॥ तरी आतां प्रश्न असे महाभक्ता ॥ तो फेडावा संदेहो ॥५९॥
वीरेश्वरलिंगाची जे मूळकथा ॥ ते भवानीनें प्रश्निली विश्वनाथा ॥ आणि तें लिंग कैसें उद्भवलें जी समर्था ॥ निरूपा स्वामी ॥६०॥
स्वामी म्हणे तें लिंग सांगों कैसें ॥ त्याचीं लिंगें असती चतु र्दशें ॥ त्या लिंगाचा प्रादुर्भाव ऐसा प्रकाशे ॥ महामान्य काशी ॥६१॥
तीं चतुर्दशलिंगें गा अगस्ती ॥ पुढें निरोपूं तुजप्रती ॥ आतां वीरेश्वर लिंगाची उत्पत्ती ॥ परियेसीं एकाग्रमनें ॥६२॥
अगस्ति जैं मज होती बालदशा ॥ तैं मी अत्यंत प्रियोत्तम होतों महेशा ॥ भवानीनें प्रश्निलें आदि पुरुषा ॥ हे कथा काशीखंड ॥६३॥
तैं मी शिव-दाक्षायणी जवळा ॥ सर्व काळ क्रीडतसें बाललीला ॥ मग हे कथा दाक्षायणीला ॥ सांगीतली ॥६४॥
दाक्षायणी वदे जी त्रिनयना ॥ त्रिपुरांतका शेष भूषणा ॥ काशी निर्मिलिया आनंदवना ॥ प्रभु स्वामिया ॥६५॥
तरी या काशीच्या ठाय़ीं नीलकंठा ॥ वीरेश्वर लिंगाची महाप्रतिष्ठा ॥ तरी हे कथा मज गंगा जूटा ॥ कथिजे भाव पूर्वक ॥६६॥
त्या वीरेश्वरीं तत्काळ सिद्धी ॥ बहुतां स्फुरलिया मंत्र सिद्धी ॥ किंचित भक्तीनें महासिद्धी ॥ साध्य झालिया ॥६७॥
मग भवानीसी वदे पशुपती ॥ तुझे प्रश्न कांते शुद्ध बीजें होती ॥ तीं रोपिलीं माझे मनक्षितीं ॥ उद्भवती अंकुर ॥६८॥
तरी ते अंकुर कैसे यथार्थता ॥ कीं ते होतील काशीखंडकथा ॥ कीं ते दाक्षायणी उद्भवली यथार्था ॥ तुझिया सत्येंचि ॥६९॥
ऐसें अनुवादला वृषभ ध्वज ॥ तरी हें दाक्षायणी श्रुत करूं तुज ॥ जैसें उष्णकाळीं अंबु सहज ॥ समर्पिजे तृषावंता ॥७०॥
मग शिव म्हणे शैलनंदिनी ॥ मित्रजितराजा होता मेदिनीं ॥ सर्व विद्या प्रवीण महाज्ञानी ॥ महाशूर धीर तो ॥७१॥
सर्व विद्या अभ्यासिल्या तेणें ॥ महापुण्यशीळ उदार मनें ॥ महाबळी धैर्य सत्त्वगुणें ॥ व्योम जैसें ॥७२॥
ऐसा तो पृथ्वीचा राज्यकर्ता ॥ सर्व पट्टणींच्या घेतसे वार्ता ॥ त्या कैशिया शैलजे आतां ॥ निरोपूं तुज ॥७३॥
जंव पर्यत सर्वही क्षितीं ॥ शास्त्रें पुराणें शिवा चिये भक्ती ॥ सहस्त्रनामा वळी उच्चारिती ॥ श्रीहरिभक्त जे जे ॥७४॥
घरोघरीं विप्रांचा वेद ध्वनी ॥ जन पारमार्थिक सर्व मेदिनीं ॥ वेदनिर्घोष नाइके जो श्रवणीं ॥ तयासी दंड करी राजा ॥७५॥
वार्तिक भ्रमती ग्रामो ग्रामीं ॥ श्रीमंत देखती सर्व धामीं ॥ भावें रत जाहा लिया सहस्त्रनामीं ॥ त्या लोकां राजा मानी ॥७६॥
न करिती हरिहरांचें स्मरण ॥ जे द्विज नेणती वेदा ध्ययन ॥ नेणती षट्‍कर्माचरण पूर्ण ॥ त्यांसी राजा दंडीत ॥७७॥
हाचि दंड सर्व राज्यामाझारी ॥ विद्याभ्यास नाहीं ज्या घरीं ॥ स्वामि भक्तीतें न देखती ज्या नारी ॥ त्यांसी राजा पीडा करी ॥७८॥
जितेंद्रिय महा सद्‍बुद्धी ॥ दोषेम अलिप्त निर्मुक्तव्याधी ॥ तो महामान्य राज्यामधीं ॥ परम योगीश्वर ॥७९॥
ऐसें सर्वही महीतळ ॥ त्या राजानें राज्य केलें बहुकाळ ॥ तो मित्रजित महाभूपाळ ॥ सर्व महीचा ॥८०॥
तंव कोणी एक समयावसानीं ॥ तेथें आला नारदमुनी ॥ तंव मित्रजित भद्रासनीं ॥ बैसला होता ॥८१॥
तेथें आला ब्रह्मकुमर ॥ रायें सन्मानें केला आदर ॥ षोडशोपचारें द्विजवर ॥ पूजिला रायें ॥८२॥
तंव मित्रजित प्रश्न करी ॥ माझे पूर्व भाग्यें पूर्ण ब्रह्मचारी ॥ जे तुम्ही आलेति मंदिरीं ॥ परम भाग्यें ॥८३॥
तरी प्रश्न असे जी ब्रह्मसुता ॥ तुम्हांसी त्रिलोकीं भ्रमण करितां ॥ श्रुत झाली असेल अपूर्व वार्ता ॥ ती कथावी स्वामिया ॥८४॥
तंव तो आनंदाचा महापूर ॥ नारद त्रिलोकींचा वार्ताकर ॥ इच्छा प्रवाहे जैसा दिवाकर ॥ तम ग्रासावया ॥८५॥
राजा प्रश्न करी नारदासी ॥ तंव तो उचंबळला पूर्ण मानसीं ॥ म्हणे गा मित्र जिता परियेसीं ॥ नको वदूं मौनें राहा ॥८६॥
माघारें सांदिलें राजयाचे प्रश्ना ॥ आपण कथी पुढें दश गुणा ॥ म्हणे परियेसीं गा नृप नंदना ॥ अपूर्व वार्ता ॥८७॥
नारद म्हणे नृप नंदना ॥ तूं एकाग्र माझिया प्रतिवचना ॥ मी क्रमितां पाताल भुवना ॥ देखिले महा आश्चर्य ॥८८॥
पश्चि मेसी गंध मादन गिरिवर ॥ तेथें गंधर्व असे विद्याधर ॥ त्या विद्या धराची कन्या महा सुंदर ॥ मलय गंधिनीनामें ॥८९॥
कपाल केतु नामा महा असुर ॥ कंकाल केतु नामें त्याचा कुमर ॥ तो गंध मादन पर्वतीं चोर ॥ संचरला पैं ॥९०॥
तेणें त्या विद्या धराची कुमरी ॥ नेली मलय गंधिनीनामें सुंदरी ॥ घेऊनि गेला पाताळ विवरीं ॥ कंकालकेतु तो ॥९१॥
वैशाख शुद्ध तृतीया दिन ॥ पुढें असे तियेचें शुभ लग्न ॥ तरी तियेसी भवानी जाहाली प्रसन्न ॥ वर दिधला तियेनें ॥९२॥
भवानीनें दिधला वर ॥ आणि तो घेऊनि गेला असुर ॥ म्हणो नियां मी तत्पर ॥ सांगा वया तुज आलों ॥९३॥
तियेसी प्रसन्न जाहाली दाक्षा यणी ॥ तुजी मित्र जिता ते कामिनी ॥ तस्करें नेली पाताळ भुवनीं ॥ हे लज्जा तुज राया ॥९४॥
राया अहो रात्र ती चित्तीं ॥ तुझेंचि नाम स्मरत होती ॥ ऐसी ते नेली अव चितीं ॥ महा असुरें ॥९५॥
पाताळीं चंपावती नगर ॥ तेथें आहे महा असुर ॥ महापरा क्रमी शूर धीर ॥ दैत्य कुमर तो ॥९६॥
मी पाताळीं भोगा वतीचे तीरीं ॥ पूजा विधीसी गेलों हाट केश्वरीं ॥ सप्त अहो रात्र तो त्रिपुरारी ॥ पूजिला आम्हीं ॥९७॥
त्या दैत्य गृहीं नाहीं काळाचा प्रवेश ॥ राया तूं परियेसीं माझा उपदेश ॥ सहस्त्र नामें स्मरतां महेश ॥ कार्य सिद्धी होईल ॥९८॥
शिवाचें दर्शन घेत लिया ॥ वाम देवासी स्मर लिया ॥ सिद्धि प्राप्त होय सर्व कार्या ॥ सफल सदा मनोरथ ॥९९॥
शिव दासासी दीर्घ प्रतीती ॥ तत्काळ मनोरथ सफळ होती ॥ आतां विलंब न करीं गा भूपती ॥ मित्र जिता तूं ॥१००॥
ऐसा नार दमुनीचा उपदेश ॥ रायें मनीं धरिला उत्कर्ष ॥ मग करिता झाला प्रवेश ॥ पाताळ भूवनीं ॥१०१॥
शिव नामाचा उच्चार वैखरीं ॥ क्रमीत पूर्व समुद्राच्या पारीं ॥ मग तो राजा बैसोनि सागरीं ॥ प्रवेश केला ॥१०२॥
जान्ह वी घेऊनि पूर्ण भद्रा ॥ पाताळीं गेली भेदूनि समुद्रा ॥ राजा प्राप्त जाहाला तया छिद्रा ॥ जान्ह वी चिया ॥१०३॥
त्या गंगा द्वारें पाताळ विवरीं ॥ गेला चंपावती नाम नगरीं ॥ तेथें धुंडी तसे कुमरी ॥ विद्या धराची पैं ॥१०४॥
दैत्य गेला होता कार्य कारणा ॥ राजा संचरला त्या चिया भवना ॥ तंव देखता जाहाला ती अंगना ॥ मलय गंधिनी ॥१०५॥
तंव ते अव लोकी राजेश्वर ॥ राजा देखिला अति सुकुमार ॥ म्हणे भवानी प्राप्त कां न करीचि वर ॥ या ऐसा मज कारणें ॥१०६॥
मग तयासी वदे ती सुंदर ॥ तूं तंव पुरुष लावण्ये सुकुमार ॥ कवणें सांगितलें तुज हें नगर ॥ याव यासी पैं ॥१०७॥
विमुख जाहाले माझे शुभ दिन ॥ मी चुकलें भवानीचें पूजन ॥ तरीचि हें महादैत्याचें भवन ॥ प्राप्त जाहालें मजलागीं ॥१०८॥
तूं स्वस्थ असतां शरीरीं ॥ कां आलासी या काळाचे मंदिरीं ॥ आतां दैत्य नाहीं तंव तूं विचार करीं ॥ शीघ्र गम नाचा ॥१०९॥
माझा विपत्तीचा आला समय ॥ जैसा तो ग्रहणीं पीडे सोम-सूर्य ॥ त्या दैत्यासी कोण करी क्षय ॥ तरी त्यासी मी वरितें ॥११०॥
ऐसा माझिये मनींचा संकल्प ॥ कवण हरील दैत्याचा दर्प ॥ माझी विपत्ति देखो नियां कोप ॥ येईल कवणासी दैत्याचा ॥१११॥
तंव मित्र जित राजा महा बळी ॥ म्हणे मी त्यासीं झुंजेन समफळी ॥ उपडून टाकीण क्षितितळीं ॥ ताडा ऐसा पैं ॥११२॥
मग वदली ते मलय गंधिनी ॥ म्हणे गा राया मी तुझीचि कामिनी ॥ मज प्रसन्न जाहालीसे भवानी ॥ तो वर काय तूंचि होसी ॥११३॥
मग राव वदे प्रतिवचन ॥ आम्ही आलों येथें पुरुषार्थ धरून ॥ तुझें मुक्त करावया बंधन ॥ तूं प्रिय होसी आम्हांतें ॥११४॥
आतां दैत्यासीं घेईन समफळी ॥ त्याचा क्षय करीन बाहुबळीं ॥ तुज घेऊन जाईन तत्काळीं ॥ आपुल्या भवना ॥११५॥
मग आनंदली ते विद्या धरी ॥ मग रायासी वदली प्रत्युत्तरीं ॥ आतां गुप्त राहावें मंदिरीं ॥ तुम्हीं या दैत्याचे ॥११६॥
मग महा अस्त्रांचें जें मंदिर ॥ अस्त्रशस्त्रें होतीं जेथें अपार । तेथें गुप्त केला राजेश्वर ॥ मित्र जित तो ॥११७॥
पाहा हो भेद कैसा वर्तला ते काळीं ॥ भेदें अशक्त होय महा बळी ॥ भेदें जिंकू शके मही तळीं ॥ राजिया पासाव रंक ॥११८॥
तरी तो स्त्रीभेद जे मंदिरीं ॥ तें गृह जाणावें महार्ण वा माझारी ॥ विघ्नकाळ संचरतां क्षणभरी ॥ नाहीं जी धीरत्व ॥११९॥
भेद सुबाधे उरगासी ॥ पिपी लिका बंधन करी मातगासी ॥ भेदें सहस्त्र पुरुषांसी ॥ एक स्त्री समर्थ ॥१२०॥
आतां असो हे द्दष्टांत युक्ती ॥ भेदासी न चले उपाय शक्ती ॥ हे सर्वज्ञ श्रोतयां व्यक्ती ॥ आधींचि असे पैं ॥१२१॥
तंव आला दैत्य महा असुर ॥ मलय गंधिनीसी वदे शब्दोत्तर ॥ दीर्घ शब्द घर घरित कंठस्वर ॥ कंकालकेतु तो ॥१२२॥
म्हणे मी गेलों होतों रत्न खाणीं ॥ म्यां तुज आणिले अविंध मणी ॥ हे यत्नें ठेविजे तुझिया लग्नीं ॥ पाहिजेत आतां ॥१२३॥
आतां जवळी आलें स्वयंवर ॥ तुजला पाहिजे दिव्य श्रृंगार ॥ तरी हे दिव्य मणी तेजाकार ॥ असों दीजे प्रयत्नें ॥१२४॥
आतां आणीन तुज दिव्यांबरें ॥ शुद्ध हिरण्याचीं माझीं मंदिरें ॥ आतां तूं मजसीं भोग भोगीं निरंतरें ॥ सोडोनियां विकल्प ॥१२५॥
दिक्पाळांची संपत्ति आणुनी ॥ संग्रह करीन तुझे भवनीं ॥ त्या ऐश्वर्याची तूं स्वामिनी ॥ भोगीं महा सुखातें ॥१२६॥
दिक्पाळां चिया कांता कुमरी ॥ महा पतिव्रता लावण्य सुंदरी ॥ त्या सहस्त्र एक आणीन मंदिरीं ॥ तुज दासी करावया ॥१२७॥
ऐसीं उत्तरें अनु वादला ॥ मग मंच कावरी वळंघला ॥ नावेक सेजे निद्रीत झाला ॥ कंकाल केतु तो ॥१२८॥
त्रिशूखळवक्त्र दिधलें तियेपाशीं ॥ मग ते निद्रा घोर जाणोनि त्यासी ॥ अस्त्र घेऊनि आली राज यापाशीं ॥ लपविला होता जेथें ॥१२९॥
शस्त्रें देऊनि काढिला बाहेरी ॥ राजा नाभीकार देतसे सुंदरी ॥ म्हणे हा मारूनि तुझा वैरी ॥ हरीन संदेह तुझा ॥१३०॥
मग तो राजा काय करी ॥ दैत्य हाणीतला चरण प्रहारीं ॥ म्हणे ऊठ रे असुरा युद्धा करीं ॥ घेईं शस्त्र हातांत ॥१३१॥
चरणा घातें उठविलें त्या दैत्या ॥ मग राजा झाला त्यासी वदता ॥ आपुली शक्ति स्मरें रे आतां ॥ होईं साव चिता ॥१३२॥
धाड घातलीसी कवणे भुवनीं ॥ आणि कवणाची कुमरी आणिली चोरूनी ॥ पाताळपुटीं आलासी पळूनी ॥ महातस्करा तूं ॥१३३॥
निद्रा विसर्जन केली समस्त असुरें ॥ राजा द्दष्टीं देखिला एकसरें ॥ मग धूम्र वमी नासाद्वारें ॥ महा असुर तो ॥१३४॥
रक्तांबर दिसे नेत्रवाटीं ॥ घूम्रवास कोंदला नासा पुटीं ॥ न उतरे मंचकातळवटीं ॥ करी प्रत्युत्तर ॥१३५॥
म्हणे कवण हा झाला रे भ्रमित ॥ रुसला काळ कृतांत ॥ जो माझे मंदिरा महा आवर्त ॥ पाहों आलासी ॥१३६॥
देव विमुख झाला कवणा वरी ॥ कवणाची खूंटली सूत्रदोरी ॥ जो मज देखतां माझे मंदिरीं ॥ संचार केला ॥१३७॥
तुज ओढवली असेल उदर चिंता ॥ मार्ग चुकलासी व्यवसाया जातां ॥ प्राण स्वस्थ घेऊनि जाय रे मागुता ॥ स्वदेशा तूं ॥१३८॥
मज अंगीं कृपा न उपजावी ॥ परी देखिला तुज नर मानवी ॥ दिक्पति असता तरी स्वभावीं ॥ दाखवितों यमपंथ ॥१३९॥
जरी असेल तुझें मनोगत ॥ तुवां नवसिलें असेल दैवत ॥ जे माझेनि हातें व्हावा मृत्यु ॥ हा मनोरथ तुझा ॥१४०॥
तंव राजा म्हणे निर्लज्जा चोरा ॥ हाणितलासी चरण प्रहरा ॥ कां न येसी मंदिरा बाहेरा ॥ आतां न सोडीं मी तुज ॥१४१॥
प्रकटे महा मृगेशाचा वारा ॥ तेणें जंबुकासी सुटे भेदरा ॥ कीं केसरी आलिया नगरा ॥ तो न निघे बाहेरी ॥१४२॥
कीं शार्दू लाचिया पक्षवातें ॥ केवीं धीर धरिजे कपोतें ॥ जैस द्रुम उत्पाटे कुठार घातें ॥ तैसा पाडीन क्षितीसी ॥१४३॥
मग दैत्य खवळला कोपें ॥ तेणें त्रिशूळ मागीतला साक्षेपें ॥ क्रोधें उठावला महा प्रतापें ॥ परी स्त्री नेदीचि अस्त्र ॥१४४॥
तंव दैत्य म्हणे हा मानवी अशक्त ॥ यासी काय मी करूं शस्त्र घात ॥ मग वज्र मुष्टी वळूनि हात ॥ उभारिला हाणावया ॥१४५॥
असो त्या दैत्य पाणि प्रहारें ॥ राजा हाणीतला निर्घा तकरें ॥ जैसा सूर्य लोपिजे जळ धरें ॥ अभ्रपटा माजीं ॥१४६॥
मग विष्णु कवचाचा मंत्र जप ॥ तीन वेळां जपिन्नला तो नृप ॥ राज यासी स्फुरला तो प्रताप ॥ विष्णु मंत्राचा ॥१४७॥
मग दैत्य हाणीतला वज्र मुष्टीं ॥ मूर्च्छागत पाडिला क्षितितळवटीं ॥ पाहे दैत्य व्यंकटाद्दष्टी ॥ तैसाचि उठिला ॥१४८॥
विष्णु कवच मंत्र जपतांचि राजा ॥ तयासी जाहाल्या चार भुजा ॥ दैत्य पाहे तों गरुड ध्वजा ॥ सारिखाचि देखिला ॥१४९॥
तैसाचि घननीळ मेघवर्णु ॥ श्यामकांति कमळलोचनु ॥ दैत्य म्हणें तूं दिसतोसी विष्णु ॥ कपटरूपें आलासे ॥१५०॥
म्यां आणिली तुझी अंगना ॥ हे सिंधूची नंदिनी जाणा ॥ तरी तुझीचि ठेवीं नाराय़णा ॥ तूं सत्य दैत्यारी ॥१५१॥
एक भासतसे माझें मनोगत ॥ तुझ्या ह्स्तें ॥ मज होय मृत्यु त्वरित ॥ ऐसें वेद पुराणीं निभ्रांत ॥ जाणतों आम्हीं ॥१५२॥
दैत्यकुळ मर्दिसी लक्ष्मीपती ॥ आतां क्षय करीन रे तुज प्रती ॥ कीं तूझेनि हातें मुक्ति होय मज प्रती ॥ तेंही अपार सुख ॥१५३॥
तंव राजा विचारी अतिबळ ॥ हा दुष्ट मारिजे तत्काळ ॥ हर्षें दाटेल भूमंडला ॥ न कीजे आतां विलंब ॥१५४॥
मग रायें करीं घेतलें चक्र ॥ छेदिलें तत्काळ त्याचें शिर ॥ जैसा तो वज्र प्रहारी शक्र ॥ भेदी गिरिश्रृंग ॥१५५॥
युद्ध जरी सांगावें सविस्तर ॥ तरी वृथाचि कासया ग्रंथपसर ॥ पाल्हाळ वाढवितां अपार ॥ होईल ग्रंथा विलंब ॥१५६॥
रायें दैत्य पाडिला मेदिनीं ॥ तंव आनंदली मलय गंधिनी ॥ तत्काळ प्रगटला नारदमुनी ॥ ब्रह्मसुत ते वेळीं ॥१५७॥
तैं वैशाख शुद्ध तृतीया दिनीं ॥ लग्न लाविता जाहाला महामुनी ॥ मग राजा आणि ते कामिनी ॥ आलीं काशी पुरीसी ॥१५८॥
स्वामी म्हणे गा अगस्तिमुनी ॥ विश्वेश्वराची उत्पत्ति येथूनी ॥ पूत्र प्रसवली मलय गंधिनी ॥ ते कैसी आतां ॥१५९॥
या अध्यायाची दीर्घ फलश्रुती ॥ अपुत्रिकाचे गृहीं पुत्रसंतती ॥ या अध्याप श्रवणें प्राप्त होती ॥ सद्‍गुण सुंदरी ॥१६०॥
महादोष दग्धावया कारणें ॥ या अध्यायाचे श्रवणपठनें ॥ तत्काळ दोषा वेगळें होणें ॥ म्हणे शिवदास गोमा ॥१६१॥
इति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे वीरेश्वरवर्णनं नाम त्रिषष्टितमाध्यायः ॥६३॥
श्री सांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

॥ इति त्रिषष्टितमाध्यापः समाप्तः ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP