अन्नं देवातिथिभ्योऽर्पितममृतामिदं चान्यथा मोघमन्नं यश्चात्मार्थं
विधत्ते तदिह निगदितं मृत्युरूपं ह्हि तस्य ।
लोकेऽसौ केवलाधो भवति तनुभृतां केवलादी च यः
स्यात्त्क्त्वा प्राणाग्निहोत्रं विधिवदनुदिनं योऽश्नुते सोऽपि मर्त्यः ॥२०॥
अन्वयार्थः-‘देवातिथिभ्यः अर्पितं इदं अन्नं अमृतं (भवति) च अन्यथा मोघं अन्नं (भवति)-’ देव किंवा अतिथि यांना अर्पण केलेलें अन्न अमृत होतें. आणि तद्विपरीत अन्न व्यर्थ होतें. ‘यश्व आत्मार्थें विघत्ते तत् तस्य मृत्युरूपं निगदितं-’ जो केवळ आपल्या स्वतः करितां अन्न तयार करितो, तें अन्न त्याचया मृत्यूसारखें सांगितलें आहे. ‘लोके यः केवलादी स्यात् असो तनुभृतां केवलाघः (भवति)-’ जो पुरुष ह्या जगामध्यें केवल स्वतःचें उदर भरणारा असतो त्याला सर्व प्राण्यांमध्यें मूर्तिमंत पापाचा पुतळा असें म्हणतात. ‘च विधिवत् प्राणाग्निहोत्रं त्यक्त्वा अनुदिनं यः अश्नुते सः अपिमर्त्यः-’ तसेंच शास्त्रोक्त प्राणाग्निहोत्रादि कर्में न करितां जो प्रतिदिवशी भोजन करितो तोही मरणाराच असतो. गिृहस्थाश्रमाला अवश्य असलेले पंचमहायज्ञ न करितां ‘‘ये पचंत्यात्मकारणात्’’ या भगवद्धचनाप्रमाणें जे स्वतःकरितां अन्न शिजवितात ते पापपुरुष होत असें येथें सांगितलें आहे. वैश्वदेवादिक कर्मे करून, अतिथिपूजन करून, देवांना व प्राप्त झालेल्या अतिथींना अन्नसमर्पणानें तृप्त करून नंतर अवशिष्ट राहिलेलें अमृतसंज्ञक अन्न प्रत्येक गृहस्थानें भक्षण करावें अशी शास्त्रमर्यादा आहे. पण असे न करितां ह्ये ‘‘देवान् भावयतानेने म्हo देवांपासून प्राप्त झालेल्या पदार्थांनीं देवांची वृद्धि करा’’ इत्यादि भगवद्ववचनाप्रमाणें देवतासंतर्पण न करितां, देव व अतिथि यांना फसवून ठेविलेलें जें अन्न तें निष्फळ होय. शिवाय पुरुष केवल आपलाच पिंड पुष्ट करण्याकरितां जें अन्न शिजवितो, तें अन्न तर त्याच्या मृत्यूसारखेंच आहे. कारण त्या अन्नाचा दुसर्या कोणासही उपयोग न झाल्यामुळें परिणामीं तें अन्न विषासारखें होत असतें. जो पुरुष स्वतः एकटाच अन्न भक्षण करितो त्याला केवल पापराशी असें म्हणतात. तसेंच जो पुरुष शास्त्रोक्त पंचमहायज्ञ, अग्निहोत्र इत्यादि नित्यकर्में न करितां प्रतिदिनीं भोजन करितो तोही एक दिवस मरणाराच असतो. भगवंतांनींही ‘‘अघायुरिंद्रियारामो मोघं पार्थ स जीवति । म्हणजे तो इंद्रियतर्पक पापी पुरुष ह्या जगांत व्यर्थ जिवंत रहातो.’’असें म्हटलें आहे. ह्या श्लोकांत आचार्यांनीं ‘‘मर्त्य’’ हा शब्द सहेतुकयोजिला आहे. कारण अग्निहोत्रादिक कर्मे, ह्या देहाचा त्याग केल्यानंतर उत्तम लोकप्राप्ति करून देत असतात. पण त्याकरितां दुसर्या कोणाला अन्न न देतां स्वतःचेंच उदर जो भरतो तोहि शेवटी मरतोच. त्यामुळें शास्त्रविहित अन्नदान न करितां स्वदेह पुष्ट केल्यानें तो अजरामर होतो, असें मुळींच नाहीं.] २०.