शतश्लोकी - श्लोक २६
’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ
चत्वारोऽस्याः कर्पदा युवतिरथ भवेन्नूतना नित्यमेषा
माया वा पेशला स्यादघटनघटनापाटवं याति यस्मात् ।
स्यादारंभे घृतास्या श्रुतिभववयुनान्येवमाच्छादयन्ती
तस्यामेतौ सुपर्णाविव परपुरषौ निष्ठतोऽर्थप्रतीत्या ॥२६॥
अन्वयार्थ-‘अस्याः चत्वारः कपर्दाः (संति)-’ ह्या मायेचे चार उत्कर्ष आहेत (ते असे-) ‘अथ एषा माया नित्यं नूतना (अतः) युवतिः भवेत्-’ १ ही माया नित्य नूतन (तरुणी) असते म्हणून ही युवति होय. ‘यस्मात् अघटनघटनापाटवं याति तस्मात् पेशला वा-’ २ ज्याअर्थीं ही अत्यंत दुर्घट अशीं कृत्यें करिते त्याअर्थीं ही अति कुशल आहे. ‘आरंभे घृतास्या स्यात्-’ ३ प्रथमतः ही मोठी रमणीय वाटते. ‘एवं श्रुतिभववयुनानि आच्छादयन्ती-’ ४ व उपनिषदांतील प्रतिपादनाला हि आपल्या शक्तीर्नें झांकून टाकिते. ‘तस्यां अर्थप्रतीत्या एतौ परपुरुषौ सुपर्णौ इव तिष्ठतः-’ तसल्या ह्या मायेमध्यें दोन पक्ष्यांप्रमाणें जीव व शिव हे दोघे विषय भोगीत राहतात. ह्या श्लोकांत, पूर्व श्लोकांत सांगितलेल्या ‘तम’ नांवाच्या ह्या मायेचे चार उत्कृर्ष आहेत असें प्रतिपादन करितात.जी ही माया आपल्या विलक्षण शक्तीनें हें सर्व जगत् निर्माण करून पुनः त्याचा लय करिते तिचे चार उत्कर्ष मुख्य गुर्णें आहेत. १. ही सर्वदा नवी असते. ती कधींच वृद्ध होत नाहीं. यास्तव विद्वान् तिला युवति असें कृत्य करण्यांत ही मोठी पटु आहे. ही माया चैतन्य व जड पदार्थ यांचें ऐक्य तिादार्त्म्यें करून दाखविते.पण हें कृत्य प्रकाश व अंधकार यांचें ऐक्य करून दाखविण्याइतकें विलक्षण व अलौकिक आहे. म्हणून वस्तु एकप्रकारची असतां ती भलत्याच प्रकारची करून दाखविण्यात ही माया फार चतुर असल्यामुळें हिला कुशल असें ह्मणतात. ३ ही सकृदृर्शनीं पुरुषाला मोठी रमणीय वाटते. पण परिणामीं त्याला मोठ्या अनर्थांत पाडिते.विषय दुःख देणारे असून ते प्रथमतः किती सुखकर वाटतात? पण मोठ्या आनंदानें केलेल्या दुष्कृत्यांचे परिणाम जेव्हां रडत भोगावे लागतात, तेव्हां त्यांचें खरे स्वरूप समजतें. ही सर्वदा आपल्या मोहक रूपानें सर्व प्राण्यांना मोह पाडून आपल्या अधीन करून घेते; व नंतर त्यांना जन्ममरणगर्तेत (खड्ड्य़ांत) लोटते, यास्तव हिला घृतास्या (तुपानें माखलेल्या तोंडाप्रमाणें रमणीय दिसणारी) असें म्हणतात. ४ उपनिषद्भागामध्यें सर्वत्र जो उपदेश व प्रतिपादन केलेलें आहे त्याला आवरण घालून ह्मणजे आपल्या मोहक रूपानें प्राण्यांना भुलवून ‘‘उपनिषदांतील सर्व प्रतिपादन खोटें आहे त्यांत कांहीं तथ्य नाहीं, ती सर्व पोटभरू ठक ब्राह्मणांची जगाला फसविण्याची विद्या आहे’’ असें भासविते. असे हे हिचे चार उत्कर्ष असून दोन पक्षी ज्याप्रमाणें एका वृक्षाचा किंवा एका शाखेचा आश्रय करून राहतात; त्याप्रमाणें जीव व शिव हे दोघे विषयाचा अनुभव घेत हिचा आश्रय करून राहतात; माया जड असल्यामुळें ती कोणत्याही पदार्थाचें ज्ञान करून देत नाहीं, तर अंधकाराप्रमाणें सर्व पदार्थांना झांकून टाकीत असते; व परमात्मा चिद्रूप असल्यामुळें सर्व पदार्थांना प्रकाशित करितो. (ह्मे त्यांचें ज्ञान करून देतो. ) प्रथम उत्कर्षानें ह्या मायेचें सर्वदा एकरूप, द्वितीय उत्कर्षानें हिची विक्षेपशक्ति, तृतीय उत्कर्षानें हिचें मोहकत्व व चतुर्थानें हिची आवरणशक्ति व्यक्त करून दाखविली आहे. अंधार्या रात्रीं पुढें असलेला वृक्ष मुळींच दिसत नाहीं हें आवरण, व तो अंधुक दिसत असल्यामुळें हा कोणी पुरुष किंवा पिशाच आहे असें वाटतें, हा विक्षेप; ह्मणजे पदार्थांचें मुळींच ज्ञान न होऊं देणें याला आवरण व तो मूळ पदार्थाहून भलताच कांहीं पदार्थ आहे असें भासविणें याला विक्षेप असें ह्मणतात. माया आपल्या आवरणशक्तीनें आत्म्याचें स्वरूपज्ञान होऊं देत नाहीं; व विक्षेपशक्तीनें देह हाच आत्मा आहे असें किंवा तो सुखी आहे, दुःखी आहे, कुशल आहे असें भासविते. जीव हा भोग भोगणारा व शिवभोग भोगविणारा होय. मायेच्या योगानेंच हे दोन भेद झाले आहेत. शुद्ध चैतन्याला ही माया जीव बनविते व ह्या मायाकृत जीवांचा कर्मफलदाता ईश्वरही हिच्यामुळेंच तें चैतन्य होते]२६.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP