यत्किंचिन्नामरूपात्मकामिदमसदेवोदितं भाति भूमौ
येनानेकप्रकारैर्व्यवहरति जगद्येन तेनेश्वरेण ।
तद्वत्प्रक्ष्छादनीयं निभृतरशयना यद्वदेव द्विजिह्णः
तेन त्यक्तेन भोज्यं सुखमनतिशयं मा गृधोऽन्यद्वनाद्यम ॥४१॥
अन्वयार्थ-‘यत् किंचित् असत् एव उदितं इदं नामरूपात्मकं (जगत्) भूमौ येन भाति-’ जें हें कांहीं मिथ्याच उत्पन्न झालेंलें नामरूपात्मक जगत् या व्यवहारांत ज्याच्यामुळें भासतें, ‘येन जगत् अनेकप्रकारैः व्यवहरति-’ ज्याच्यायोगानें प्राणी अनेक प्रकारें व्यवहार करितात, ‘तेन ईश्वरेण यद्वदेव निभृतरशनया द्विजिह्णः तद्वत् प्रच्छादनीयं-’ त्या ईश्वरानें रज्जु जशी सर्पाला झांकून टाकिते, तसे हें झांकून टाकावें. सारांश ह्या प्रमाणें, ‘तेन त्यक्तेन (च) अनतिशयं सुखं भोज्यं-’ जगदाभासाचा त्याग करून अत्युत्तम सुखाचा भोग घ्यावा व ‘अन्यत् धनाद्यं मा गृधः’ धनादि अन्य विषयांची इच्छा करू नये. पूर्व श्लोकांत प्रथमतः वैराग्यसंपत्ति व नंतर त्यापासून ज्ञान असा क्रम सांगितला आहे. आतां त्या उपदेशक्रमाला आधार असणार्या ईशावास्यामिद सर्वे.... मा गृधः कस्यस्विद्धनं’ इत्यादि ईशावास्य श्रुतीचा येथे अनुवाद करितात.शिंपीच्या ठिकाणीं भ्रमानें जसा रुप्याचा उदय होतो, तसेंच हें केवल स्वज्ञानानें नामरूपांनीं व्यक्त झालेलें जगत् ज्याच्यामुळें प्रतीतीला येतें व ज्याच्यामुळें यांतील सर्व जन व्यवहार करितात, त्या ईश्वराच्या योगानें हें साधकानें झांकावें. म्ह० व्यवहार करितात, त्या ईश्वराच्या योगानें हें साधकानें झांकावें. म्ह० व्यवहारांत दोरीचें ज्ञान न झाल्यानें हा सर्प आहे अशी आपणाला प्रतीति येते; पण दोरीचें यथार्थ ज्ञान झालें असतां जसा तो सर्प दोरींत लोपून जातो (दोरीनें त्याला झांकल्यासारखें आपणाला वाटतें) तसेंच हें भा्रमक जगत् ब्रह्मांत झांकून टाकावें. हें सर्व जगत् सर्वप्रवर्तक जें ब्रह्म, तद्रूप आहे असें पहावें आणि अशा भावनेनें सर्व जगदाभास सर्वथैव नष्ट झाला असतां, सर्वोत्कृष्ट सुखाचा येथेच्छ अनुभव घ्यावा. पण धनादि अन्य विषयांची पुनः कधींहि इच्छा करूं नये. कारण त्यांच्यायोगानें साधक स्वरूपज्ञानापासून भ्रष्ट होतो. सारांश १ ईश्वरमय सर्व जगत् पहावें; २ त्यामुळें अत्यंत सुख भोगावें; ३ विषयांची इच्छा करूं नये; असे तीन उपदेश या श्लोकांत केले आहे] ४१.