यत्रानन्दाश्च मोदाः प्रमद इति मुदश्चासते सर्व एते
यत्राप्ताः सर्वकामाः स्युरखिलविरमात्केवलीभाव आस्ते ।
मां तत्रानंदसांद्रे कृधि चिरममृतं सोम पीयूषपूर्णां
धारामिंद्राय देहीत्यपि निगमगिरो भ्रूयुगांतर्गताय ॥७२॥
अन्वयार्थ-‘मोदाः च प्रमदः च मुदः इति एते सर्वे आनंदाः यत्र आसते’ (मनुष्य, पितर व देव यांचे) मोद, प्रमद व मुद या नांवांचे सर्व आनंद जेथें आहेत; ‘यत्र सर्वकामाः आप्ताः स्युः-’ अन्वयार्थ- ‘मोदाः च प्रमदः च मुदः इति एते सर्वे आनंदाः यत्र आसते’ (मनुष्य, पितर व देव यांचे) मोद, प्रमद व मुद या नांवांचे सर्व आनंद जेथें आहेत; ‘यत्र सर्वकामाः आप्ताः स्युः-’ जेथें सर्वहि तृष्णा पूर्ण होतात; ‘(यत्र) अखिलविरमात् केवलीभावः आस्ते-’ सर्व कार्यांचा लय होत असल्यामुळें जेथें कैवल्य असतें ‘तत्र आनंदसान्द्रे हे सोम मां चिरं अमृतं कृधि-’ त्या आनंदपूर्ण पदीं, हे सोम, मला चिरकाल मरणधर्मरहित कर; ‘भ्रूयुगांतर्गताय इंद्राय पीयूषपूर्णां धारां देहि निगमगिरः अपि (प्राहुः)-’ आणि भ्रूयुगुलाच्या मध्यें असणार्या जीवात्म्याला पूर्ण अमृतधार दे असेंच श्रुतीहि सांगतात. पिूर्वनिर्दिष्ट अर्थाचेंच प्रतिपादन करणार्या ऋग्वेदाच्या सातव्या अष्टकांतील ‘‘यत्रानंदाश्चमोदाः’’ इत्यादि श्रुतीचें तात्पर्य या श्लोकांत सांगतात- ज्या परमानंदामध्यें सर्वहि उत्तरोत्तर अधिक असणारे मनुष्यादिकांचे आनंद रहातात; ज्या परमानंदामध्यें सत्यलोकप्राप्त्यादि सर्व कामना पूर्ण होतात; व ज्या ठिकाणीं सर्व स्थूलसूक्ष्म प्रपंचाचा लय होत असल्यामुळें कैवल्य (केवलभाव) राहतें; त्या परमानंदपूर्ण स्थलीं, हे षोडशकलारूप सोम (चंद्ररूप परमात्म्या), जीवदशेला प्राप्त झालेल्या मला घेऊन जा; व तेथें नेऊन मला अमर कर. तसेंच ह्या जीवात्म्याला अमृताची पूर्ण धार दे. तो जीवात्मा दोन्ही भूवयांच्या मध्यभागीं राहतो. अनेक श्रुतींनीं असेंच वर्णन केले आहे. शिवाय मुक्त (समाधिस्थ) साधकांच्या तालूंतील सोमनांवाच्या चक्रापासून अमृतस्राव होत असतो असें योगशास्त्रांतहि प्रसिद्ध आहे] ७२