मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ३१

शतश्लोकी - श्लोक ३१

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


एकाक्यासीत्स पूर्वं मृगयति विषयानानुपूर्व्यान्तरात्मा
जाया मे स्यात्प्रजा वा धनमुपकरणं कर्म कुर्वंस्तदर्थम्
क्लेशैः प्राणावशेषैर्महदपि मनुते नान्यदस्माद्ररीयस्त्वेकाला-
भेप्यकृत्स्त्रो मृत इव विरमत्येकहान्याकृतार्थः॥३१॥

अन्वयार्थ-‘सः अंतरात्मा पूर्वं एकाकी आसीत-’ हा अंतरात्मा पूर्वीं एकटाच असतो. ‘(अतः परं प्रथमं) मे जाया स्यात् प्रजा उपकरणं  धनं वा (इति) आनुपूर्व्या विषयान् मृगयति-’ नंतर प्रथम मला स्त्री असावी मग पुत्र व्हावा व त्यांनतर संसाराचें साधन जें धन तें मिळावें अशा अनुक्रमानें विषयांना हुडकितो (त्यांच्या विषयीं संकल्प करितो.) ‘प्राणावशेषैः क्लेशैः तदर्थे कर्म कुर्वन् अन्यत् महत् अपि अस्मात् गरीयः न मनुते-’ धन मिळविण्यास्तव प्राण व्याकुळ होईतों क्लेश सहन करून कर्म करितो; व दुसरी एखादि मोठी वस्तुही ह्या विषयांहून अधिक आहे, असें मानीत नाहीं.‘एकलाभेऽपि अकृत्स्त्रः सन् मृत इव विरमति (तथा) एकहान्या ।अकृतार्थः (भवति)-’ ह्यापैकीं एखादा विषय न मिळाला तरी मी अपूर्ण आहे (असें समजून) मृतपुरुषासारखा स्तब्ध होऊन बसतो; व एखाद्या विषयाची हानी झाली तर हा अकृतार्थ होतो. प्रिथमतः हा अंतरात्मा एकटाच असतो. त्यावेळीं स्त्री, पुत्र इत्यादिक विषय त्याच्यापाशीं नसतात. पुढें प्रथमतः माझा विवाह व्हावा अशी तो इच्छा करितो. नंतर मला पुत्र असावेत अशी त्याची भावना होते. नंतर त्या सर्वांच्या निर्वाहाचें साधन, व व्यवहारांत अवश्य लागणारें जें धन तें मिळावें अशी तृष्णा उत्पन्न होते, व तें धन मिळविण्याकरितां मरेमरेतों क्लेश भोगूनही सेवा, कृषि (शेतकी), वाणिज्य (व्यापार) इत्यादि कर्में करितो व हे धनादिविषय प्राप्त झाले असतां आत्म्यासारख्या महद्वस्तूंचेंही त्यांपुढें त्याला महत्त्व वाटत नाहीं. ह्याप्रमाणे स्त्री-पुत्र-धनादि अनेक विषयांपैकीं बहुतेकमिळून एकदाच न मिळाल्यास तो आपणाला अपूर्ण समजतो. (अतृप्त होतो.) उदाहरणार्थ एखाद्या गृहस्थास स्त्री व पुत्र असून वित्त किंवा स्त्री व धन असून पुत्र नसला अथवा पुत्र व धन असून दैवयोगानें स्त्री नष्ट झाली तर तो, हाय ! हाय ! माझा सर्वस्वी घात झाला, माझें घर बसलें इत्यादि प्रकारांनीं आक्रोश करितो. सारांश विषयप्राप्ति होऊन त्यांपैकीं एकाचाच नाश झाला तरी हा स्वतःला अभागीच समजतो; व इच्छिलेल्या अनेक विषयांपैकीं एखादा न मिळाला तरी अतृप्तच असतो. ह्या श्लोकाला ‘‘आत्मैवेदमग्रआसीत् एक एव सो कामयत’’ इत्यादि बृहदारण्यकश्रुति आधार आहे; व त्या श्रुतीचा सर्व अर्थ वर स्पष्ट झाला आहे] ३१.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP