मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ६०

शतश्लोकी - श्लोक ६०

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


भूतेष्वात्मानमात्मन्यनुगतमखिलं भूतजातं प्रपश्येत्प्रायः
पाथस्तंरंगान्वयवदथ चिरं सर्वमात्मैव पश्येत् ।
एकं ब्रह्माद्वितीयं श्रुतिशिरसि मतं नेह नानास्ति
किंचिन्मृत्योराप्नोति मृत्युं स इह जगदिदं यस्तु नानेव पश्येत् ॥६०॥

अन्वयार्थ-‘भूतेषु आत्मानं आत्मनि च अखिलं भूतजातं पाथस्तरंगान्वयवत् अनुगतं प्रायः प्रपश्येत्-’ अनेक भूतांमध्यें एक आत्मा व एका आत्म्याचे ठिकाणीं, जल आणि त्याचे तरंग यांच्या संबंधाप्रमाणें, हें समग्र भूतजात ओतप्रोत भरलेलें आहे, असें पहावें. ‘ब्रह्म एकं अद्वितीयं (च) श्रुतिशिरसि मतं (अतः) अथ्ज्ञ चिरं सर्वं आत्मा एव पश्येत्-’ ब्रह्म अद्वितीयं (च) श्रुतिशिरसि मतं (अतः) अथ चिरं सर्व आत्मा एव पश्येत्-’ ब्रह्म अद्वितीय व एकच आहे असें उपनिषदांत सांगितलें आहे; म्हणून सर्वदा सर्वहि सृष्टि आत्माच आहे असें पहावें. ‘यः तु इदं जगत् नाना इव पश्येत् स मृत्योः मृत्युं आप्नोति (यतः) इह किंचित् नाना न अस्ति-’ जो ह्या जगाकडे द्वैतरूपानें पाहतो तो मृत्युपरंपरेमध्यें सांपडतो; कारण ह्या जगामध्यें अनेक असें कांहीं नाही. ह्या श्लोकांत ब्रह्म एक आहे असें प्रतिपादन करणार्‍या अनेक मूलभूत श्रुतींना पुष्टि देणार्‍या ‘यस्तु सर्वाणि ’ न विजुप्सते’ या ईशावास्यश्रुतीचा व ‘जगांत नानात्वाची भावना ठेवणारा पुरुष मृत्यूच्या परंपरेंत सांपडतो’ असें सांगणार्‍या ‘मृत्योः स मृत्युमाप्नोति ’ इत्यादि कठश्रुतीचा अनुवाद केला आहे. ज्याप्रमाणें एकाच उदकांत हजारों तरंग दिसतात व त्यांत एका उदकांवांचून अन्य कांहीं नसतें; त्याचप्रमाणें जड व चर असे अनेक पदार्थ आपणाला जगांत दिसतात, पण त्या सर्वांमध्यें एक आत्मा भरून राहिलेला आहे व ही सर्व भूतें आत्म्यामध्यें भरून राहिलीं आहेत. शिवाय अनेक श्रुतींमध्यें आत्मा सजातीय-विजातीयादि भेदरहित आहे असेंच प्रतिपादन केलें आहे. यास्तव साधकानें तात्त्विक दृष्टीनें सर्वत्र एक आत्मतत्त्वच आहे, अशी भावना ठेवावी. पण या अनुशासनाविरुद्ध जो जगांत परमार्थतः अनेकत्वाची भावना ठेवितो तो देहाभिमान नष्ट न झाल्यामुळें जन्ममरणपरंपरेंत पडतो. सारांश परमार्थदृष्टीनें सर्वत्र अद्वैतभावना ठेवणें परम श्रेयस्कर आहे]६०.


References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP