प्रापश्यद्विश्वमात्मेत्ययमिह पुरुषः शोकमोहाद्यतीतः
शुक्रं ब्रह्माध्यगच्छत्स खलु सकलवित्सर्वसिद्ध्य़ास्पदं हि
विस्मृत्य स्थूलसूक्ष्मप्रभृतिवपुरसौ सर्वसंकल्पशून्यो
जीवन्मुक्तस्तुरीयं पदमधिगतवान्पुण्यपापैर्विहीनः ॥४४॥
अन्वयार्थ-‘इह शोकमोहाद्यतीतः अयं पुरुषः आत्मा इति प्रापश्यत्’ या देहामध्यें असतांच सर्व शोक व मोह यांचा त्याग करून हा पुरुष हें विश्व आत्मा आहे, असें पाहतो. ‘(तथा) शुक्रं ब्रह्म अध्यगच्छत्-’ त्याचप्रमाणें िहिरण्यगर्भनांवार्च्यों शबलब्रह्माची त्याला प्राप्ति होते.तथा सः खलु सकलवित् सर्वसिद्ध्य़ास्पदं हि जातः-’ खरोखर तो सर्वज्ञ पुरुष सर्व सिद्धीचें स्थानच होतो. ‘असौ स्थूलसूक्ष्मप्रभृति वपुः विस्मृत्य सर्वसंकल्पशून्यः सन् तुरीयं पदं अधिगतवान्-’ तसेंच हा पुरुष स्थूल-सूक्ष्म इत्यादि शरीरांस विसरून सर्वहि मनोवासनांचा त्याग करून तुरीयपदाची प्राप्ति करून घेतो. ‘(ततः) पुण्यपापैः विहीनः जीवन्मुक्तः (भवति)-’ नंतर तो पुण्यपापरहित होऊन जीवन्मुक्त होतो. पिूर्वनिदिष्ट जीवन्मुक्ताचें प्रतिपादन करणार्या ‘‘यस्मिन्त्सर्वाणि भूतानिे’’ ह्या ईशावास्योपनिषद् श्रुतीचा अनुवाद करून आचार्य सांगतात-हा पुरुष ह्या देहामध्यें असतांनाच सर्वहि सांसारिक शोक व मोह ह्यांचा त्याग करून हें सर्वहि विश्व आत्माच (म्हणजे ब्रह्मरूप) आहे असें पहातो. म्हणजे त्या सूक्ष्मदृष्टि पुरुषाचा मोह सर्वथैव नष्ट झाल्यामुळें, केवळ भ्रमानें भासणारें हें जगत् त्याला जगद्रूपानें न दिसतां ब्रह्मरूपानें दिसतें व अभ्यासानें त्याची दृष्टि ह्या सर्व सृष्ट पदार्थांत अत्यंत गुप्त असणार्या तत्त्वाला पहाण्याइतकी सूक्ष्म झाल्यामुळें सर्वहि जगत् स्वात्मरूप आहे असें तो पहातो. म्हणूनच हिरण्यगर्भ नांवाच्या शबल ब्रह्माची त्याला प्राप्ति होते. म्हणजे तो स्वतःच हिरण्यगर्भ (सूत्रात्मा) होतो. त्यामुळेंच त्याचे ठिकाणीं सर्वज्ञत्व येतें व अणिमा, लधिमा इत्यादिक यौगिक अष्ट सिद्धि त्याला प्राप्त होतात. त्याचप्रमाणें हा पुरुष स्थूल, सूक्ष्म आणि कारण हीं शरीरें विसरून व सर्वहि शुभाशुभ वासना सोडून शुद्ध व निरंतर अशा आत्मसुखाचा अनुभव घेतो. नंतर इतक्या सर्व गुणांनीं युक्त असणार्या ह्या जीवन्मुक्त पुरुषाला पुण्यपाप स्पर्शहि करीत नाहीं. म्हणजे त्याचीं संचित व क्रियमाण कर्में दग्ध होतात. वर निर्दिष्ट केलेल्या ईशोपनिषंदांतील श्रुतीचें बहुतेक तात्पर्य ह्याश्लोकामध्यें आलेंच आहे. म्हणून विस्तार करीत नाहीं. [ईशोपनिषद्भाष्यार्थ पहा] ४४.