मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|शतश्लोकी|
श्लोक ७३

शतश्लोकी - श्लोक ७३

’शतश्लोकी’ हा गुरु-शिष्य संवादात्मक आत्मज्ञानाचा उपदेश करणारा ग्रंथ


आत्माकंपः सुखात्मा स्फुरति तदपरा त्वन्यथैव स्फुरन्तो
स्थैर्यं वा चंचलत्वं मनसि परिणतिं याति तत्रत्यमस्मिन्
चांचल्यं दुःखहेतुर्मनस इदमहो यावदिष्टार्थलब्धिस्तस्यां यावत्स्थिरत्वं
मनसि विषयजं स्यात्सुखं तावदेव ॥७३॥

अन्वयार्थ-‘आत्मा अकंपः सुखात्मा स्फुरति-’ आत्मा निष्कंप (चलनरहित) व आनंदरूप आहे असा प्रत्यय येतो.तदपरा तु अन्यथा एव स्फुरन्ती-’ (परंतु) त्याच्याहून निराळी जी प्रकृति ती तर त्याच्याहून विपरीतच आहे व त्याच्यामुळेंच ती अनुभवाला येणारी आहे. ‘तत्रत्यं स्थैर्यं चंचलत्वं वा अस्मिन् मनसि परिणतिं याति-’ त्यांच्या (आत्म्याच्या व प्रकृतीच्या) ठिकाणचें स्थैर्य व चंचलता हीं ह्या मनामध्यें परिणत (व्यक्त) होतात. ‘अहो यावत् इष्टार्थलब्धिः तावत् प्रयत्नशताकुलस्य मनसः इदं चाञ्वल्यं दुःखहेतुः (भवति)-’ अहो इष्ट विषयाची प्राप्ति होईपर्यंत तदर्थ अनंत प्रयास करून थकलेल्या मनाचें हें चांचल्य दुःखाला कारण होतें. ‘तस्या सत्यां मनसि यावत् स्थिरत्वं तावदेव विषयजं सुखं स्यात्-’ व ती इष्टप्राप्ति झाली असतां जेवढा वेळ मनाची स्थिरता असते तेवढा वेळच विषयजन्य सुख होतेंःिआतां याविषयीं -परमानन्द, हें अतींद्रिय सुख व विषयानन्द हें इंद्रियजन्य सुख असा ह्या दोन सुखांत विलक्षण भेद अनुभवसिद्ध असतांना ह्याच परमानंदाच्या अंशाचा आश्रय करून अन्य प्राणी सुख भोगितात असें कसें म्हणतां येईल?- अशी कोणी शंका घेईल म्हणून आचार्य ह्या व पुढच्या श्लोकांत त्याचें समाधान करितात. आत्मा कंपरहित व सुखरूप आहे. ह्याविषयीं ‘विज्ञानमानन्दें’ ही श्रुति व सुषुप्तींतील प्रत्येकाचा अनुभव हीच दोन उत्तम प्रमाणें आहेत; आणि असा त्याचा प्रत्यय येतो ह्मणूनच ‘स्फुरति’ (स्फुरण पवतो, अनुभवाला येतो) असें श्लोकांत म्हटलें आहे. तसेंच त्याच्यापेक्षां विलक्षण जी माया ती त्याच्या विरुद्ध (हो  चांचल्य, दुःख इत्यादि) धर्मांनी युक्त आहे असें सांगितलें आहे; व आत्म्याच्या आश्रयानेंच तिचा अनुभव येतो. तात्पर्य त्या आत्म्यामध्यें व मायेमध्यें असणारे (स्थिरता व चंचलता हे) गुण मनामध्यें स्पष्टपणें प्रतीत होतात. कारण चैतन्य व जडवर्ग या दोघांची ग्रंथि (संधि) ह्मणजेच मन होय. सारांश, इष्ट विषयाची प्राप्ति होईपर्यंत अश्रांत श्रम करणार्‍या मनाचें चांचल्य प्राण्याला दुःख देतें; व एकदा विषयप्राप्ति झाली कीं, मी कृतकृत्य असें जीवाला वाटल्यामुळें जोपर्यंत त्याचें मन स्थिर असतें तोंपर्यंतच विषयांपासून त्याला सुख होतें. तात्पर्य मानांतील स्थैर्य हा आत्म्याचा गुण असून त्यापासून आनंद, व चांचल्य हा प्रकृतीचा गुण असून त्यापासून दुःख प्राप्त होतें.] ७३


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP