देहाचा करूनी शिंणगार आपुले मनी, तुम्ही ऐका गे साजनी चित्त देवूनी । नऊ खंड काजळ ल्याली आपुले नयनी, हिने कपाळी लाविले कुंकू सव्वा लक्ष गोणी । हिने कुठूनी आणले वस्त्र चोळ्या लुगडी । आम्ही देखिली सुन्दरा खेळतां फुगडी, हिला नलगे मायबाप नलगे कोणी न लगे कोणी एका ईश्वरावांचूनी झाले निर्वाणी झाले निर्वाणी ॥१॥
नऊ खंड तारा भांगी ओवूनी मोती ओवूनी मोती, नऊ ग्रहाची केली फणी ऐका साजणी ऐका साजणी चित्त देवूनी इंद्र चंद्र वक्रदंत कर्ण फुल कानी पातळाचा काढीला शेष घडविली बुगडी घडविली बुगडी ॥२॥
कंचुकी धरूनी हनुवटी करुनी वैराट करून वैराट । घडविले बिचे बिचे सजाविले बोट सजाविले बोट । तोडे घडूनी गोजिरे नीट गोजिरे नीट कुंभकर्ण वाक्या वळी बळकट बळी बळकट । कंसाची करूनी जोडवी वाचे चुटचुट भिष्म अंगे धरुनी मारुनी केली बांगडी केली बांगडी ॥३॥
शेषाची करुनिया सरी सर्वही दान सर्वही दान हे रामलक्ष्मण दोन्ही भुजेचे बाजुबंद भुजचे बाजुबंद सितेची करुनी बांगडी नक्षी खाशी नक्षी खाशी रावण मारुनी केला झगा शेवटी उघडी शेवटी उघडी आम्ही देखीली सुन्दरा खेळता फुगडी ॥४॥