कृष्ण म्हणे द्रौपदीसी काय पातक तुझ्या पदरी नां । नको करू मनाची चोरी संकट जडले नां । चढते जांभूळ वरुन खाली पडले नां ॥धृ॥
भीम धावतो अंगावरी, धर्म म्हणे धर्म म्हणे थांब क्षणभरी, अर्जुन म्हणे पांडव कडकडले ना ॥१॥
द्रौपदी म्हणे कृष्ण श्रीहरी, सहज आली कर्णाची स्वारी, मन गेले त्यावरी, हेच खरे घडले नां ॥२॥
ब्रह्मांडाचा सूत्रधारी, त्रैलोकी ह्याची थोरी, जांभूळ गेले वरी उलटे जडले नां ॥३॥
प्रेमदास म्हणे मन वैरी, ह्याला लावा सत्वाची दोरी । जाताल देवा घरी भविष्य पुढले नां ॥४॥