आळंदी गाव पुण्य क्षेत्र ज्ञानोबा राजे पवित्र । साधा साधा आपुले हीत शुद्ध करा भावे चित्त । जाईल जाईल नरदेह वाया । तारी तारी सद्गुरुराया जन्मूनी गेले मी वाया ॥१॥
पंच पल्लव औदुम्बर छाया समाधि दिली वड पिंपळानी । सावली केली दत्तोपंतांनी व्यवस्था केली लक्ष्मण गांजाला । पूजा दिली देवळाचे काम । नेमिले पाणी मागे फुलबाग । घाटाची शोभा फार अन्न शांती झाली फार लाडू, जिलेब्या, मोतीचुर तृप्त झाले विप्र ब्राह्मण । तृप्त झाल्या बाया बापुड्या । तारी तारी सद्गुरु राया जन्मूनी गेले मी वाया ।