अहो माझ्या दत्तात्रयाची देवाची बँक तुम्ही ऐका ॥धृ॥
नाम मुद्दल ठेवा देह कारणी लावा, नाही खचियला लागला पैका ॥१॥
नेका पुण्य घडे नोंद जमेकडे, सत्य धर्माचे वर्म तुम्ही ऐका ॥२॥
भक्ती कागद घ्या निष्ठा शाईने लिहा चेक वटेल बघता बघता ॥३॥
बँक मँनेजर आहे शिरजोर, हिशोब ठेवती कारकुनासारखा ॥४॥
धनिक असाल जरी नाही स्मरला, हरी बँक खाते बंद होईल बरे का ॥५॥
अहो माझ्या दत्तात्रमाची तुम्ही ऐका ॥