मिठापीठाचा जोगवा, चलग सयानो दरबारी । मला जायचंय दुरवरी बाई तुळजापूरच्या बाजारी, तुळजापुरला जाईन, हळदी कुंकू घेईन, आईला मी वाहीन, लवकर परत येईन बाई, लवकर परत येईन ॥१॥
मला जायचय दुरवरी बाई कोल्हापूरच्या बाजरी कोल्हापूरला जाईन हिरवा खण घेईन, आईची ओटी भरीन लवकर परत येईन ॥२॥
चलग सयानो दरबारी मला जायच दुरवरी बाई माहुरगडच्या बाजारी, माहुरगडला जाईन पिवळा शालू घेईन, खण नारळ घेईन आईची ओटी भरीन लवकर परत येईन बाई लवकर परत येईन ॥३॥
मला जायचय दूरवरी बाई, मरी आईच्या बाजारी, मरी आईला जाईन, हार गजरे घेईन, आईला मी वाहीन लवकर परत येईन बाई लवकर परत येईन ॥४॥
चलग सयानो दरबारी मला जायचय दूरवरी बाई चतुःशृगीच्या बाजारी, चतुःशृगीला जाईन डोळे भरून पाहीन आईच दर्शन घेईल लवकर परत येईन ॥५॥